राम अनुज भरत भाग ७६ श्रीराम जयराम जय जयराम!! श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले सर्वजण अयोध्येला परतून जात असलेले,एकटक पहात, आपल्याच विचारात हरवलेला भरत, निश्चल उभा होता. सर्वांनी प्रस्थान ठेवलं आणि सोबतचा सर्व गोतावळा दूर गेला, ज्येष्ठ भ्राता श्रीराम, देवी सीता व अनुज लक्ष्मण, दूर चित्रकूट येथील वनात,तातश्री महाराज दशरथ स्वर्गस्थ प्रस्थान करते झालेले आणि बाकी सर्व परिवार अयोध्येत गेलेला. आता भरत एकटाच उरला होता. अश्या परिस्थितीत स्वतःला सावरून, संध्या समयाच्या स्नानादी नित्य कर्म आणि पादुकांच्या नित्य पूजना साठी, भरत, जवळ असलेल्या गंगेच्या तीरावर, स्नानाची तयारी करून, निघाला. मध्यांहीचा सूर्य आता अस्ताला जाण्याचा समय झाला होता. उन्ह परतीला निघाली होती. ती पूर्ण क्षितिजाच्या पलिकडे जाण्याआधी, स्नान करून,संध्या विधी करून, पादुका पूजन करण्याच्या लगबगीने, भरत, गंगेच्या तिराकडे निघाला. नदीच्या एका बाजूला नगराच्या जवळ, राजा रघुच्या वंशातील, सर्व कुलदीपक राजांनी,गंगा नदीच्या किनाऱ्या वर, दोन्ही बाजूंना, उत्तम असे घाट, त्या घटां...