Skip to main content

Posts

अध्यात्म विराम १०६

अध्यात्म विराम १०६ रामजन्म हा अनेक अर्थानी अलौकिक जन्म आहे. मर्यादांचे, नियमांचे अनेक गुणदर्शनाचे रसाळ व्यक्तित्व म्हणजे प्रभू श्रीराम. स्वतः प्रत्यक्ष श्री महाविष्णू यांचा अवतार असूनही आपण मानवी देहाच्या, धर्माच्या सर्व बंधनांच मर्यादा पालन करत, रावण वध घडवून आणला. त्यासाठी नर आणि वानर यांचा अद्भुत मिलाफ घडवला. या दोन जीवांना,खिजगणतीत न धरता,रावणाने आपल्या वरदानातून यांना बाजूला केलं होतं. हा मायेचा प्रभाव आहे. याच त्याच्या मदाचा,उन्मत्तपणाचा लाभ घेण्या साठी घडून आलेला जन्म म्हणजे श्रीराम.  काल म्हटल्या प्रमाणे प्रभूंच्या जन्माच्या आधीपासूनच किंवा शिवशंकर समाधीत रममाण होताना श्रीराम यांच्याच नामाचं उच्चारण करतात. महादेवाचं अस्तित्व हे विष्णूंनी आपल्या संकल्पनेतून घडवलं, अशी मान्यता आहे. तरीही शिवांचा आदी हा अज्ञात आहे. आता प्रभू श्रीराम यांनी राम जन्मात, लंकेत जाण्यासाठी सिद्धता करत असताना, मार्ग मिळावा आणि आपण योजलेल्या कार्यात विजय प्राप्ती व्हावी यासाठी, सागर किनारी शिवांची स्थापना केली. प्रत्यक्ष श्री महाविष्णू, रुद्राच्या अर्थात भगवान शिवलिंगाची स्थापना करून, त्यांच्या पूजनान...

श्रीकृष्ण नीति ७

श्रीकृष्ण नीति ७ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!  कालच्या भागात श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्यातील साम्य आणि भिन्नता मुद्दाम बघण्याचं खासच कारण आहे .त्रेतायुग समाप्तीला श्रीराम अवतार संपला आणि द्वापारयुग समाप्तीला श्रीकृष्ण अवतार संपला. या मधे कितीक हजार वर्ष निघुन गेलेली आहेत. त्यामुळे त्रेता युगातील परिस्थिती आणि द्वापारयुगातील परिस्थिती, यात जमीन आकाश इतका फरक पडलाय. त्रेतायुगात मुख्य शत्रु समुद्रापार होता. तर द्वापारयुगात, हाच शत्रू प्रत्यक्ष्य घरातच आहे. जस श्रीकृष्णाबाबत कंस-मामा, , रुक्मी - मेहणा, शिशुपाल-- आतेभाऊ, पांडवांबाबत भीष्म - आजोबा, द्रोणाचार्य - गुरु, कर्ण - सख्खा भाऊ, कौरव सख्खे - चुलत भाऊ , शकुनी - कौरवांचा मामा .  असेच अनेक प्रकारचे घरातीलच शत्रू असेलेलं वातावरण म्हणजे पूर्ण भिन्न परिस्थिति. म्हणजेच जे आदर्श, जी तत्वे , जी मूल्य रामायणात जीवापाड जपली, त्याच मुल्यांच्या पूर्ण विरुद्ध वागावं लागणारा वा वागायला भाग पडणारा काळ. जूनी मूल्य मोडित काढून,नवीन मुल्यांना जन्म देणारा काळ. इथे दोनच शक्यता किंवा वाटा वा निर्णय सं...

श्रीकृष्ण नीति ६

श्रीकृष्ण नीति ६ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! आपला मूळ कथाभाग सोडून, आज प्रथम श्रीराम व श्रीकृष्ण या भिन्नप्रकृतीच्या अवतारांविषयी लिहावं, असं वाटतंय. पौराणिक वाङ्गमयानुसार दशावतारातील अनुक्रमे ७ आणि ८ वे अवतार असलेले हे देव विशेष आहेत. याच कारण आधीच्या ६ अवतारांमधे ५ वा वामनरूपी आणि ६ वा परशुराम हे दोनच मानवरूपी होते. यात देखिल वामन आणि भार्गवराम हे दोन्ही अवतार संसार न केलेले होते. म्हणजेच ब्रम्हचारी या सदरात येणारे होते. तद्वत तुलना ही फक्त ७ व ८ या दोन रितसर लग्नकार्य करून अवतार कार्याचे उद्दिष्ट साध्य करणारे, प्रभुश्रीराम आणि श्रीकृष्ण, यांच्यातच होऊ शकते. आता आपण या दोन्ही म्हणजेच श्रीराम व श्रीकृष्ण यांची साम्यस्थळे आधी बघुया :  १. दोन्ही अवतार हे राजघराण्यात जन्म घेतलेले होते. कारण कृष्ण नंदाघरी वाढला तरी यादवराज श्रीवसुदेव यांचे पुत्र होऊन आलेले आणि प्रभू श्रीराम रघू कुलात अवतार धारण करून आलेले.  २. दोघानाही राज्य भोग घेता आला. (श्रीरामांचा वनवासा नंतर, पूर्ण राज्याभिषेक होऊन, कित्येक वर्षे राज्यकारभार घडला)  ३. दोघानीही अ...

श्रीकृष्ण नीति ५

श्रीकृष्ण नीति ५ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! कृष्ण जन्माची बीजं रामजन्मात आहेत याचे काही दाखले देतो  १. राम जन्मात लंकेत प्रभूराम यांनी आपली भक्त असलेल्या चित्रसेना नांमक एका नागकन्येला (अहिरावण आणि महिरावण वधानन्तर) वचन दिल होतं की एक रात्र मी तुझ्या महाली येईन, परंतु ज्या मंचकावर मी बसेन, तो एक रात्र राहिला तर मी तुला वरेन. ही कथा रामानंद सागर यांच्या रामायणात देखील आहे. मग हनुमंत भुंग्याकरवी तो मंचक पोखरुन घेतो, ज्याद्वारे प्रभु आपल्या वचनातून मुक्त होतात. पण त्या स्त्रीला प्रभू, भक्तवत्सल असल्यामुळे वचन देतात की,मी तुला पत्नी रुप स्वीकारण्याचं वचन दिलं होतं, त्यामुळे पुढील जन्मी द्वापारयुगामध्ये कृष्णावतारात मी तुझ्याशी विवाह करून तुला माझी राणी करीन.ही कथा वाचल्याचं स्मरतय. हीच स्त्री पुढील जन्मीची सत्यभामा. हा अजून एक श्रीराम व श्रीकृष्ण अवताराचा संदर्भ. २. मागे प्रथम भागात उल्लेख केल्याप्रमाणे वाली वधा नंतर वाली प्रभुना विचारतो की काय कारणाने आपण मला मारलेत. त्यावेळी प्रभु त्याला त्याच्या पापांची आठवण करून देतात आणि सुग्रीव मला शर...

श्रीकृष्ण नीति ४

श्रीकृष्ण नीति ४ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! गेल्या भागात आपण एक राजकीय षडयंत्र या दृष्टीने बघितलं. पण यातून एक प्रश्न निर्माण होतो की यासाठी वसुदेव आणि देवकी यांचीच निवड का करण्यात आली असावी. यासाठी भारतीय मानसिकता, जी आताच्या काळात सुद्धा तशीच आहे, त्याचा प्रामुख्याने विचार करावा लागेल.  तुम्ही आताच्या काळातले किंवा ६०, ७० वर्षातले चित्रपट, किंवा मालिका हे पाहिलं, तर एक गोष्ट ध्यानात येईल. जेंव्हा एखाद्या सत्तेला आव्हान द्यायचं असेल, तेंव्हा तेंव्हा त्यांच्याच रक्ताचा प्रतिनिधी असेल तर सर्वमान्य नेतृत्व म्हणून स्विकारल जातं. ही मानसिकता उत्तरेत आणि बऱ्याच अंशी दक्षिणेत सुद्धा आहे.  दूसरी बाब जी प्रकर्षाने जाणवते ती ही की, ज्याला आव्हान द्यायचं असेल त्याची जास्तीत जास्त माणस आपल्या बाजूने वळवून घेणं सोप्प जात.हीच मानसिकता आजसुद्धा बऱ्याच प्रमाणात आढळून येते. वंशपरंपरेने येणाऱ्या क़ूवतीवर अजुनही, लोकांचा विश्वास आहे किंवा श्रद्धा आहे, हीच अतिश्रद्धा कधी कधी आत्मघाताला आणि पर्यायाने विनाशाला पण कारणीभूत ठरते. तो एक वेगळा विषय आहे. ...

श्रीकृष्ण नीति ३

श्रीकृष्ण नीति ३ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! कृष्ण जन्माच्या आधी सुरु झालेली हि अद्भुतता आणि कृष्ण लीला एक विलक्षण अनुभूती आहे. ती कितीही वेळा वाचली तरी त्याची गोडी कमी होत नाही.एक कल्पना म्हणून असं समजूया कि कृष्ण कथा किंवा संपूर्ण महाभारत हि एक काल्पनिक कथा आहे. म्हणजेच व्यास विरचित नयनरम्य चित्रकथा आहे आणि आताच्या जमान्यातील प्रसार माध्यमांचे निकष त्याला लावले तर एक सुंदर कहाणी आहे, कृष्ण नावाच्या कोण्या राजाचे महत्व वृद्धिंगत होण्यासाठी. तरी त्यातून काही गोष्टी अचंबित करतात त्या येणेप्रमाणे : १. इतक्या पुराण काळात जिथे कोणतंही प्रसार माध्यम       वा संपर्कांचे साधन नसताना, उत्तरेतील एका     राज्याच्या कपोलकल्पित कथा, संपूर्ण भारतभर      प्रसारित होतात, त्याची देवळे बांधली जातात,       युगानुयुगे त्याचे पुजन केले जाते , २. कथांचा संदर्भ बऱ्याच अंशी तोच किंबहुना त्याच कथा      वेगवेळ्या भाषेत लिहिल्या गेल्यात. आज देखील     कोणत्याही भाषेतल्या कथांचं,भाषान्...

श्रीकृष्ण नीति २

श्रीकृष्ण नीति २ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)   श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! श्रीकृष्णाच्या रूपाचं, स्वरूपाचं , उद्देशयांचं , ध्येयांचं , संबंधांचं आणि महत्वाच म्हणजे व्यक्तित्वाचं आकलन होणं शक्यप्राय नाही. म्हणून काही महत्वाचे पैलूच आपण पाहूया. मुख्य उद्देश त्यातून आजच्या काळाला सुसंगत काही सापडततं का आणि ते कितपत आचरण योग्य आहे, याचा पण विचार करूया .  वास्तविक कृष्णलीलांची सुरवात ख़र तर त्याच्या जन्माच्याही आधीपासून सुरु झाली होती . कृष्ण जन्माचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्टीमागे कारण मीमांसा आहे. प्रत्येक घटनेमागे आधीच्या कोणत्याना कोणत्या तरी गोष्टीचा संदर्भ आहे. प्रत्यक्ष्य श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीला सुद्धा वालीच्या वधाची पूर्वपीठिका आहे.  हा भाग नन्तर विस्ताराने येईलच अन्यथा विचार करा की, एक महाकाव्य लिहिलं सत्ययुगात वाल्मीकि ऋषिनी आणि दूसरं महाकाव्य लिहिलं गेलय द्वापरयुगात पण काही संदर्भ आलेत. अजुन एक संदर्भ आहे तो म्हणजे रामायण हे महाकाव्य घड़ण्याआधी लिहिलं गेलय, कित्येक वर्ष आधी आणि महाभारत हे महाकाव्य सर्व घडून गेल्यावर व्यास मुनिनी लिहून घ...