Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर ५१६

भोग आणि ईश्वर  ५१६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  या संपूर्ण जगतावर असलेलं मायेचं आच्छादन, अनेक गोष्टी असाध्य करतं किंवा अनेक गोष्टीत बाधा निर्माण करतं. या मायेमुळेच, भ्रम व विस्मृती होते की, हा देह, काही काळा साठीच असून, त्या काळात वा त्या जन्मात, काय साधायचं आहे,याची मुळात  कल्पना, जडजीवाच्या मनाला स्पर्षच करत नाही की, आपण का आलोय, याचा आधी शोध घ्यावा. हा प्रश्न पडतच नाही की, मी खरा कोण आहे, आतील आत्मा वा चैतन्य, जो देह चालवतो किंवा देह, ज्यायोगे आत्मा काही साध्य करू शकतो.  मुळात हा प्रश्न न पडण्याचं कारण म्हणजे त्यावाचून काही अडतच नाही. हा प्रश्न आयुष्यात एकदाही न पडलेले अनंत जिवात्मे, करोडो वर्ष, या जगतात, जन्मो जन्मीचं दुःख, भोग, उपभोग, सुख, त्रास, आनंद हे सर्व, अनंत जन्म मागील पानां वरून पुढे असं निष्फळ आयुष्य जगतात. देहात येतात, मायेत गुंततात आणि पुन्हा विदेही होऊन, या जगतात परत परत येण्या साठी पुढील देह मिळण्याची वाट पहात राहतात.  ज्यावेळी आपली बुद्धी चालत नाही, त्यावेळी, आपण आपल्या पेक्षा बुद्धिमान, विचारी जनांची मदत घेतो. अर्थात ज्यांना त्या विषयात...

भोग आणि ईश्वर ५१५

भोग आणि ईश्वर  ५१५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  अर्पण या शब्दाचा आज जरा सखोल विचार करूया. अर्पण या शब्दाचा मराठीत अर्थ होतो सुपूर्द वा स्वाधीन करणे किंवा इंग्लिशमध्ये to assign. म्हणजे एखाद्याला हक्क वा जबाब दारी किंवा काही कर्तव्य देऊ करणं, म्हणजे अर्पण करणे किंवा स्वाधीन करणे. स्वाधीन करणे म्हणजे स्वतःला त्याच्या आधीन करणे. आता आधीन करणे म्हणजे आपल्या जबाबदारीतून काही भाग वा हिस्सा दुसऱ्याला करायला देणे.  आता व्यवहारात आपण अनेकदा, बाहेरगावी जाताना काही चीजवस्तू किंवा कार्यालयात कामाचं वाटप करताना कामाचं नियोजन व आखणी करून, त्यातील काही भाग, हाताखालच्या किंवा आपल्याच पातळीवर नवीन खात्याकडे सुपूर्द करतो. या व्यावहारिक गोष्टीत, जबाबदारीसोबत काही प्रमाणात हक्काचं सुद्धा विभाजन होऊन, त्याचंसुद्धा वाटप केलं जातं. आता या मध्ये सुपूर्द करणे किंवा स्वाधीन करणे हा भाग व्यावहारिक अर्थाने येतो.  म्हणजेच देणारा आणि घेणारा यांना एकमेकांना कामाच्या स्थिती बाबत अहवाल वा स्थितीचा वृत्तांत पोचवणं वा मागून घेणं, हे क्रमप्राप्त असतं. तरच देणार्याने जे कार्य सुपूर्द केलं आहे, ते ...

भोग आणि ईश्वर ५१४

भोग आणि ईश्वर  ५१४  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  खरंतर आपल्यापेक्षा वयाने, मानाने, कर्तृत्वाने मोठ्या व्यक्तीं समोर नतमस्तक व्हायला, त्यांच्या पाया पडायला, त्यांचा आशीर्वाद घेण्यात एकप्रकारे वेगळाच आनंद मिळतो. यात शास्त्रीयदृष्ट्या महत्वाची गोष्ट म्हणजे नमस्कारानंतर  त्यांच्या मनातून निघालेल्या, सकारात्मक उच्च प्रतीच्या लहरी, आपल्या देह व मन याभोवती एक तर्हेचं सुरक्षा कवच निर्माण करतात.  या सुरक्षा कवचाचा लाभ आपल्या मनातील सकारात्मकता टिकून, त्यात वृद्धी होण्यात होतो. म्हणून अश्या ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्ती ज्या सकारात्मक विचारांनी भरलेल्या असतात, त्यांचा आशीर्वाद हा कायम लाभदायक ठरतो. यात कोणतीही अतिशयोक्ती वा अवास्तव काहीच नाही. हे जर वैज्ञानिक आधारावर सत्य।आहे की, आपल्या मनातून बाहेर पडणाऱ्या लहरींचा वातावरणावर इष्ट व अनिष्ट परिणाम होत असतो. जसा तो वातावरण प्रदूषित करणाऱ्या घटकांचासुद्धा होतो.  आपण कधी अनुभव घेतला असेल की, सर्व सकारात्मक माणसं जमलेली असताना, त्यात जर एखादा नकारात्मक वा अनिष्ट विचारांचा असेल तर, त्या एकट्याच्या नकारात्मक विचारांचा परिणाम ए...

भोग आणि ईश्वर ५१३

भोग आणि ईश्वर  ५१३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आता कर्म करून विसरायचं म्हटलं, तरीही त्यात दोन प्रकारच्या व्यक्तींची  शक्यता सांगता येते. एक म्हणजे कर्म करून चिंता न करणारे आणि दोन म्हणजे कर्म करून चिंता करणारे. दोन्ही प्रकारात पापी आणि पुण्य वान असे दोन्ही प्रकारचे लोक येतात. म्हणजे आपण पाप करत आहोत हे माहीत असूनही आणि माहीत असल्या मुळे, पण त्याचे निश्चित परिणाम कधी समोर येतील, तेंव्हा बघू, असं म्हणणारे किंवा आपलं कर्म कुकर्म, दुष्कर्म वा पापकर्म या सदरात न येणारं आहे, हे जाणणारे आणि त्यामुळे भयमुक्त असलेले.  दोन म्हणजे आपलं कर्म पुण्यकर्म वा पापकर्म हे जाणता येत नसलेले, अजाण,अज्ञानी  आणि त्यामुळे चिंता करणारे आणि दुसरे म्हणजे आपण परिस्थितीवश पाप कर्म वा वाममार्ग धरला आहे, असा भ्रम धरून, त्याबद्दल चिंता बाळगणारे. आता या चारही प्रकारच्या लोकांचा विचार करूया. मुळात एक निष्कर्ष काल आपण काढला त्याचा एकवार विचार करूया.  तो निष्कर्ष म्हणजे मनुष्य हा फक्त कर्माचा धनी आहे. आज यावर विचार करूया.  यात खूप मोठं सार दडलेलं आहे एक म्हणजे आपण फक्त कर्मच करू शक...

भोग आणि ईश्वर ५१२

भोग आणि ईश्वर  ५१२  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आता एक गोष्ट समजली असेल की, मृत्यूआधीची कोणतीही गोष्ट वा कर्म, पुढील जन्मात आठवत नाही, हे विधात्याने जडजीवावर किती उपकार केले आहेत. त्यातून एक निष्कर्ष नक्की काढता येईल,की विधात्याच्या या व्यवस्थेचा सरळसरळ अर्थ असा आहे, जेणेकरून या भूलोकी,जडदेहात वावरताना, आधीच्या कोणत्याही कर्माचा कोणताही लेखाजोखा मर्त्य मानवाने लक्षात ठेवण्याची गरज नाही.ते कार्य कर्मफल तत्वाला अनुसरून, आपलं कर्म आणि त्यासाठीची विधात्याची विश्वरूप व्यवस्था लक्षात ठेवेल.  बरं ही व्यवस्था आजपर्यंत कधी ढासळली किंवा त्यात कधी बाधा आली वा न्यून आलं, असं एकही उदाहरण नाही. यातून अजून एक निघणारा निष्कर्ष म्हणजे, ही कर्माच्या फलांची व्यवस्था संचित रुपात प्रारब्धात मांडून, ईश्वराने तेसुद्धा काम चोख केलंय. म्हणजे मानवाला काही लक्षात राहो वा न राहो, ईश्वरी कर्मफल संचित व्यवस्थेत,एका क्षणाचासुद्धा, कोणताही अडथळा येत नाही. म्हणजे आपण मनात, बुद्धीत जी विचारांची यादी किंवा षड्रिपुंची बीजं रुजवून वाढवतो, ती निरर्थक ठरतात. याच संचितात या जन्मात आपण केलेली कर्मसुद्धा भर...

भोग आणि ईश्वर ५११

भोग आणि ईश्वर  ५११  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालचाच विषय पुढे नेऊया. वास्तविक कर्मातून निवृत्ती ही आपल्याला भगवंताने एका वरदानाच्या स्वरूपात बहाल केली आहे. म्हणजे कसं तर, जन्ममरण शृंखला तयार करून. म्हणजे एका जन्मातून अर्थात त्या देहातून मुक्ती देऊन किंवा मुक्त करून पुढे कर्मफलानुसार नवीन।देह देऊन, मागील जन्मांच्या विस्मृतीचं वरदान दिलं आहे. विचार करा, जर जन्ममरण नसतं किंवा जन्ममरणोपरांत विस्मृती नसती तर, काय काय अघटित, आक्रीत घडलं असतं देवच जाणे.  याचसाठी मृत्यू पुन्हा जन्म यामधून आत्मा फिरत राहून, आधीच्या जन्मांतील कर्माचा विसर पडून, नवीन जन्मात नवीन कर्म व पुन्हा त्याची नवीन कर्मसाखळी, असा एक अद्भुत खेळ विधात्याने रचला. आता यातून काही गोष्टी अपरिहार्य आहेत, हे नक्कीच. जसं संचित, फल प्रारब्ध यातून सुटका नाही. म्हणजे कर्म विसरली तरी त्यांची फलं आपला पाठलाग करतातच. पण आधीचे भोग भोगताना आपण जसा खूप विचारमंथन करतो, की हे माझ्या वाट्याला का.  पण, तसा विचार दैवयोगाने, उपभोग, सुखप्राप्ती झाली तरी त्यावेळी, त्याचा  विचार करत नाही, किंवा तसा विचारही मनाला स्पर्...

भोग आणि ईश्वर ५१०

भोग आणि ईश्वर  ५१०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  विरक्ती ही मुळात मनाचं वासनेतून, क्रोधातून, कामातून, विवंचनेतून, निवृत्ती आहे. मुळात सर्वसंगपरित्याग म्हणजे विरक्ती हा थोडा संकुचित अर्थ आहे, असं माझं मत आहे. कारण सर्वसंगपरित्याग म्हणजे फक्त देहाची निवृत्ती नव्हे तर मनाला सर्व प्रकारच्या मोहातून, वासनेतून क्रोधातून विचारपूर्वक व विवेकाने निवृत्त करणं. म्हणजे मनाला मनापासून मोहात,मायेत,वासनेच्या फेऱ्यात अडकण्याचा मोह न होणं म्हणजे खरी निवृत्ती  याच निवृत्तीची पुढची पायरी म्हणजे विरक्त. विरक्त माणूस संसारपासून, त्यातील तापापासून, प्रपंचापासून लांबच असला पाहिजे हा गैरसमज आहे. विरक्त मनुष्य संसारात व प्रपंचात राहूनसुद्धा मनाने संयमी, निग्रही आणि विरक्त असू शकतो. याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे नाथमहाराज अर्थात शांतीब्रह्म श्रीएकनाथ महाराज. जे प्रपंचात असूनही मनाने निवृत्त, वृत्तीने विरक्त होते. अर्थातच ही विरक्तवृत्ती, हा देखील एका तपाचा साधनेचा आणि एकाग्रतेचा परिणाम असतो.  म्हणजे आधी मनाची निवृत्ती, मग त्यातून विरक्ती साध्य करण्या साठी, तपसाधना मनाचा संयम, निग्रह, लक्ष ...