भोग आणि ईश्वर २२० सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज, अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।। सर्व धर्मांचा अर्थात कर्तव्याचा त्याग न करता, त्यातील आसक्ती व फलाची इच्छा, यांचा मोह त्यागून, मला एकट्याला शरण जा. इये भगवंत एक तत्व सुंदररीत्या सांगतात. ते म्हणजे माम एकम म्हणजे मला एकट्याला. यात भगवंतांना असं सुचवायचं आहे का मी एकटाच आहे आणि बाकीचं देवरूपात प्रकटलेलं चैतन्य हे भिन्न आहे किंवा त्याच्याशी माझा संबंध नसल्यामुळे, फक्त माझा एकट्याचा विचार करा आणि मला एकट्यालाच शरण जा. मला असं वाटतं की, भगवंतांनी यातसुदधा एक सुंदर विचार , एका शब्दात मांडला आहे. यातील भावार्थ आणि गर्भितार्थ आता आपण समजून घेऊया. ब्रह्मांडाच्या निर्मितीत आणि विश्वाच्या रचनेतून, युगांच्या चक्रातून काळाची गती फिरताना, अनेकानेक रूपातून, सगुण अवतारातून एकरूपी विश्वाचालक व पालक, प्रकट होत गेला. प्रत्येक रूपाचं, आवताराचं कार्य, महत्व ज्याप्रकारे होतं, त्याप्रकारे ते स्थापित करून, त्या त्या कार्यासाठी त्या स्वरूपाचा उपयोग, जगतकल्याणासाठी, श्रीमहाविष्णूनी करून घेतला. सू...