Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर १३०

भोग आणि ईश्वर  १३०   आपल्या कर्माच्या वाचेच्या व  मनातील तरंग व लहरी यावर आपण मागे  चर्चा केली. आज पुन्हा त्यांचा मागोवा घेऊया.  या तरंगांचा प्रसार आसमंतात व विश्वात आणि समस्त ब्रह्मांडात होत असतो. त्यांच्या तीव्रतेनुसार त्या कार्यरत असतात आणि त्याचप्रकारच्या ब्रह्मांडातील लहरींशी त्यांचा संयोग अर्थात आकर्षण व विरुद्ध लहरींशी प्रतिकर्षण होतं. त्याच्या परिणामस्वरूप ज्या लहरी निर्माण होतात, त्या पुन्हा परावर्तित होऊन, मूळ स्थानी परत येतात. हेच आपल्या कर्माचं फलस्वरुप आपल्याला प्राप्त होणारं भाग्य वा भोग असतं.  मागे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या तीव्रतेवर, त्यांचं आकर्षण व प्रतिकर्षण अवलंबून असतं. नकारात्मक लहरींची तीव्रता ही प्रचंड असते आणि त्या तितक्याच ताकदीने समान लहरींना आकर्षित करतात आणि विरुद्ध शक्तींच्या लहरींना प्रतिकर्षित करतात अर्थात भेदतात. म्हणूनच नकारात्मक विचार आले की तीव्र वेगात संपूर्ण मनाचा आणि वातावरणाचा ताबा घेतात. कारण त्यांची शक्ती अफाट असते. आता आसमंतातून घरात येऊ.  जर नकारात्मक लहरी ब्रह्मांडातील लहरींना इतक्या तीव्रतेने आकर्षित करत ...

भोग आणि ईश्वर १२९

भोग आणि ईश्वर  १२९   मनाची सकारात्मक अवस्था टिकवणं हे नित्य करावं लागणारं कार्य नाही हे सर्वात प्रथम लक्षात घ्या. कारण सर्वसामान्यपणे प्रत्येकजण सतत निराश वा हताश वा निरुत्साही असेल असं नाही. मुळात यामध्ये आपली मनोवृत्ती बदलणं हे सर्वात प्रथम अपेक्षित आहे. जेंव्हा मन हे पाऱ्यासम असतं, तेंव्हाच ते परिस्थितीनुसार हेलकावे खातं आणि नित्य कोणत्याना कोणत्या प्रभावा खाली असतं. आलेल्या परिस्थितीला जुळवून वा टक्कर देऊन पुढे जाण्याची वृत्ती वा प्रवृत्ती ज्यांची असते, त्यांना परिस्थिती तील बदल फार फरक करत नाहीत. या प्रकारात मी अजून एका वृत्तीच्या लोकांना मोजीन. ज्यांची साधनेवर आणि सद्गुरूंवर ठाम श्रद्धा असते असे कोणत्याही स्थितीला वा परिस्थितीला खंबीरपणे तोंड देतात आणि आपल्या साधनेवरील व सद्गुरुंवरील दृढ विश्वासाच्या जोरावर, मनाचं संतुलन राखून पुढे जात राहतात. त्या श्रद्धेचा,  विश्वासाचा भरभक्कम आधार मनाला बांधून ठेवतो आणि कोणत्याही वादळात मन द्विधा होत नाही. मग बाकीच्यांनी काय करायचं हा प्रश्न उरतो. मुळात इथे काही गोष्टी लक्षात घ्या. मन हे निर्गुण निराकार आकाश आहे. बाह्य स्थिती म्ह...

भोग आणि ईश्वर १२८

भोग आणि ईश्वर  १२८   कालपर्यंत आपण मनावरील धनभार ऋणभार यावर विस्तृतपणे चर्चा केली. मुद्दा बहुतेकांना समजला असेल आणि त्यावर कृती करायला सुरुवात केली असेल. काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या. मुळात आपण धनभारीत असणं हे आपल्या हिताचं आहे. जगाला काहीही देणंघेणं नाही, हे ध्यानात धरावं. इथे थोडा स्वार्थ मनात आणायचा. कारण प्रकृती उत्तम वा सर्वसामान्य असेल तर आलेले भोग, दुःख काळज्या चिंता यांना दूर सारून, सुदृढ मन देहाला त्याप्रमाणे,  तयार करेल वा देह त्याप्रमाणे कार्यरत होईल. पण अश्या काळात,  यामागचं बल, प्रेरणा, ऊर्जा हे मनाकडून मिळतं, हे लक्षात असुद्या.   आता मनाला मार्गदर्शन कोण करतं, तर विचार आणि विचार सुदृढ सशक्त सकारात्मक असतील तरच, ते मनाला आणि शरीराला, अश्या काळात विशेषतः, गरजेचे असतात. कारण  या वा अश्या काळात निराशा, विषण्णता इत्यादी मनावर अतिरिक्त बल निर्माण करतात आणि त्यायोगे देहाला सुस्त वा प्रभावहीन वा बलहीन करतात. म्हणून असं वाटायला लागलं की मनाला त्या बलापासून दूर नेणं जरुरी असतं. जे कार्य एखादं नाम, स्तोत्र, मंत्र यांनी केलं जातं. कारण अश्या नामाच्य...

भोग आणि ईश्वर १२७

भोग आणि ईश्वर  १२७   कालच्या विषयासंदर्भात अजून थोडं पुढे जाऊया.  मुळात धनभार आणि ऋणभार यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न सतत करण्याची आवश्यकता असावी की नसावी ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुळात हा समतोल राखण्याचं काम वा कसरत त्यांनाच करावी लागेल, ज्यांचं मन सतत दोलायमान असतं. म्हणजेच ज्यांच्या मनात कोणताही एक भार स्थिर वा कायम राहू शकत नाही किंवा ज्यांच्या मनावर नेहमी ऋणभार प्रभावी असतो.  ऋणभार त्यांच्याच मनावर प्रभावी असतो, ज्यांचं मन नकारात्मक विचार जास्त करतं किंवा ज्यांना निराशा, चिंता, काळजी ही पटकन प्रभावित करते. अशी मानसिकता ही सहसा कमी लवचिक आणि अति लवचिक नकारात्मक मानसिकता असणाऱ्या व्यक्तींची असते. यासाठी पुन्हा एकदा गुरुत्वाकर्षण सिद्धांताचा विचार करूया. गुरुत्वाकर्षण हे माणसाचं वजन जितकं जास्त, त्या प्रमाणात कार्य करतं. मागे आपण पाहिलं त्याप्रमाणे, सकारात्मक गोष्टी वा धनभार हा तुलनेने हलका असतो.  परंतु ऋणभार हा मनात वा मनाला जडत्व आणतो. मागेच दिलेलं एक उदाहरण परत पाहू म्हणजे कळेल. एक कप दुधात एक थेंब तिखट टाका, पूर्ण दूध लाल आणि तिखट होईल. हा नकारात...

भोग आणि ईश्वर १२६

भोग आणि ईश्वर  १२६   मनावरील ऋणभार, धनभार,  त्याचं महत्व पाहिलं. यातील ऋणभार हा काही अंशी आपल्या मनाची स्थिती, काही अंशी घडणाऱ्या घटना,येणारी संकटं आणि या सर्वाला आपण त्या त्या क्षणी देत असलेला सकारात्मक वा नकारात्मक प्रतिसाद आणि प्रतिक्रिया, यावर अवलंबून आहे. पण घडणाऱ्या घटनांच्या किंवा प्रसंगांच्या संदर्भात ते आपल्या नियंत्रणा बाहेर आहे. कारण त्या घटना वा ते प्रसंग आपल्या हातून घडून गेलेल्या कर्माचं फलस्वरुप आहे. त्या कारणाने ते आपल्या नियंत्रणाबाहेर आहे, पण आपणच भूतकाळात ते निर्माण केलं आहे, हे नक्की.  पण यामध्ये आपल्या नियंत्रणातील गोष्ट म्हणजे या ऋण भाराला कमी करून, समतोल राखू शकणारा धनभार निर्माण करणं वा वाढवणं, ही आपल्या हातातील गोष्ट आहे. तेवढी निदान आपण करावी वा आपल्याकडून व्हावी. आता धनभार निर्माण करणाऱ्या घटना वा गोष्टी कोणत्या. तर सकारात्मकता वाढवणाऱ्या आणि मनाला प्रफुल्लित व प्रसन्न करणाऱ्या गोष्टी जसं नामजप, चांगली भक्तीरसपूर्ण वा भावगीत प्रकारातील गाणी, चांगली निसर्गदृश्य असलेली चित्र अथवा व्हीडिओ इत्यादी.,  मुळात आपण ऋणभारित आहोत हे कसं ओळखायचं. ...

भोग आणि ईश्वर १२५

भोग आणि ईश्वर  १२५   काल आपण पाहिलं की आकाशाप्रमाणे मनावर धन आणि ऋण भार तयार होऊन, त्यानुसार मनाचं कार्य चालतं. त्या त्या भाराच्या प्रभावानुसार, आपण आतल्या व बाहेरून येणाऱ्या विचारांना झेलतो, पेलतो आणि प्रतिक्रियारुप प्रकट होतो. म्हणजे मुळात काहीतरी भार हा मनावर कायम असतो. जन्मतः सुद्धा प्रत्येकजण काहिनाकाही भार घेऊनच आलेला असतो. हा कोणता भार म्हणजे धन की ऋण हे अर्थात,पुन्हा संचितानुसार ठरतं. म्हणजे या जन्मातील आपली विचारसरणी मृत्यूच्या समया पर्यंत जी व जशी असेल, त्यानुसार पुढील जन्मी, जन्म घेताना भार  प्राप्त होते. अर्थातच पुढील जन्मीची, जन्मते वेळी असलेली वा प्राप्त होणारी मानसिकता आज वा या जन्मात आपणच ठरवणार आहोत. म्हणूनच श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नेहमी सांगतात की मृत्यूच्या समयी जी वासना वा विचार मनात असेल, त्यानुसार पुढील जन्म प्राप्त होईल, म्हणून सतत नाम घ्या तरच मृत्यूसमयी ते मनात व ओठांवर येईल.  शास्त्रवचन सुद्धा तेच सांगतं, अंते मती सा गती. म्हणजे मृत्यू समयाला जी मती अर्थात बुद्धी व विचार असेल त्यानुसार गती म्हणजे मृत्यूनंतरचा जन्म व जग मिळेल. धनभार...

भोग आणि ईश्वर १२३

भोग आणि ईश्वर  १२३   खूपवेळा एखादी गोष्ट, वा मुद्दा वा विचार आपल्याला पडतो, पण मनाला तो पचवता येत नाही. याचा अर्थ इथे बुद्धी आणि मन यांत भेद निर्माण होतो. बुद्धी ही जडत्वाचं प्रतीक आहे. त्यामुळे तिला ज्ञान आणि अनुभव या आधारे वळवता येतं किंवा वळवावं लागतं. पण बुद्धीला एखादी गोष्ट पटली की बुद्धी त्यानुसार विचार करायला तयार असते. समस्या मनाची आहे. मन हे वायु आणि आकाशतत्वाचं प्रतीक आहे. त्यामुळे ते चंचल आणि अस्थिर आहे. ते कधीकधी कृष्णविवराप्रमाणे खोल वा गहन आणि अप्राप्य भासतं, तर कधी एखाद्या उथळ जलाशयातील प्रवाहाप्रमाणे अधीर, अस्थिर आणि अविचारी वाटतं.  हा मनाचा स्वभाव वा वृत्ती मनुष्याला चिकटवून, एखाद्याला आपण उथळ अविचारी म्हणून संबोधतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की, त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे त्याची बुद्धी चंचल वा अस्थिर असेलच असं नाही.  किंबहुना बरेचवेळा, त्या बुद्धीच्या स्थिरतेपेक्षा मनाची चंचलता कैकपट असल्यामुळे, बुद्धीच्या कार्याला वाव आणि वेळ मिळत नाही. सदर व्यक्तीचं मन कर्म करून घेतं आणि बुद्धी नन्तर विचार करून न्यूनगंड अथवा गिल्ट निर्माण होतो. या गिल्टचं मुख्य का...