अथर्वशीर्षातील मुख्य गाभा असलेल्या श्लोकाचा अर्थ. गेले काही दिवस अथर्वशीर्ष यावर विचार करत असताना आज जे सुचलं ते मांडत आहे. यावर चिंतन व्हावं. खरंतर गहन विचार करत असताना आज अचानक हा गाभा सापडला, जे संपूर्ण अथर्वशीर्षांचं सूत्र असावं असा माझा कयास आहे. प्रत्येक देवतेचा एक बीजाक्षर मंत्र असतो. श्रीगणेशाच्या बाबतीत तो काय आहे याचा उल्लेख अथर्वशीर्षामध्ये या सातव्या श्लोकात सापडतो. त्याचं विस्तृत विवेचन पुढे मांडत आहे. गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं। अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं। तारेण ऋद्धं। एतत्तव मनुस्वरूपं। गकार: पूर्वरूपं। अकारो मध्यमरूपं। अनुस्वारश्चान्त्यरूपं। बिन्दुरूत्तररूपं। नाद: संधानं। सं हितासंधि: सैषा गणेश विद्या। गणकऋषि: निचृद्गायत्रीच्छंद:। गणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नम:।।७।। श्रीगणेशाच्या अद्याक्षरातील ग् ज्याला अ हा वर्ण जोडून त्यावर अनुस्वाररूप बिंदू देऊन त्याचा अनुनासिक उच्चार केल्यानन्तर जो नाद निर्माण होतो त्याला ओंकार जोडला की जो बीजाक्षर मंत्र तयार होतो त्याला श्रीगणपती देवतेच्या नामाने युक्त करून जो गायत्रीमंत्र तयार होतो तो मनातील...