विश्वनियंत्याची प्रार्थना जगतोद्धारक जगत्पालक प्राणरक्षक विश्वरूप आधार विश्वाचा तू तूच भवभूत भावस्वरूप उद्धारक आत्म्याचा अंश तुझ्याच मी तेजाचा तुझ्या प्रेरणेने होई कर्म देह हा पंचमहाभुताचा अगम्य गुह्य विश्वनिर्मितीचे बुद्धीस न साधे तू जयाचा उद्गाता ते गूढ जडबुद्धीला न साधे मी फक्त एक सहस्त्रांश तव निर्मित ब्रह्मांडाचा अगणित जीव तू निर्मिले पिता तूच देवा तयांचा मी न जाणू शके रहस्य माझ्या लक्ष जन्मांचे तू साक्षीभूत माझ्या या जन्मातील लक्ष चुकांचे तुझ्या पूजनासत्व मी जे अर्पिन ते तूच निर्मिले म्हणुन मी जे बुद्धीने जाणले त्या मिशे पूजिले न्यून काही असे राहिले त्यास्तव क्षमा प्रार्थितो तुज हे सर्वात्मका विश्वकल्याणा शीश नमितो होऊन उदार देसी स्थान उदरात मम पातकाना जे इष्ट ते देसी मज या इहलोकी जाण भावनांना कवी : प्रसन्न आठवले २५/०७/२०२० १९:००