Skip to main content

Posts

आम्ही छाताडावर करतो नाच

आम्ही छाताडावर करतो नाच  करोनाच्या छाताडावर करतो नाच  उभे घेतो अंगावर विषाणू  शास्त्रज्ञच सारे आम्ही जणू  आम्ही विष पचवतो आज  आम्ही छाताडावर करतो नाच  आले वादळ झेलले आम्ही  त्याला पळवून लावले आम्ही  आम्ही त्याचाही उतरवला माज  आम्ही छाताडावर करतो नाच  साऱ्या देशात अव्वल आम्ही  ठेवला आलेख वाढता आम्ही  आम्ही राज्याची उंचावली मान  आम्ही छाताडावर करतो नाच  मोठ्या पदाची आशा लागली  पीएम पदाची खुर्चीच आपली  शिवसैनिकाला घालू सरताज  आम्ही छाताडावर करतो नाच    कवी : आपलेच आठवले  १९/०६/२०२०

#श्रीकृष्णनीती #भाग३६

#श्रीकृष्णनीती #भाग३६ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! धर्म हि संकल्पना मुळातच जगण्याच्या संकल्पनेशी निगडित आहे. त्यावर त्या त्या धर्माची संस्कृती ठरते. रूढार्थाने खरतर सनातन धर्म हा मूळ, धर्म या व्याख्येत बसणारा सर्वात जुना धर्म आहे. कारण बाकी बहुतेक सर्व धर्मांच्या स्थापनेबद्दल निश्चित तिथी माहीत आहे वा ज्ञात आहे. परंतु सनातन धर्म ज्याला हिंदू धर्म म्हणूनही म्हटलं जातं, त्याच्या स्थापनेबद्दल वा मूळ तिथीबद्दल काहीही सांगता येणार नाही इतका तो जुना आहे. अर्थातच मूळ आणि सनातन असल्यामुळे  जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचा धर्म हा,  सनातन धर्मच असतो. कारण तो जन्मतः धारण केला जातो. अर्थात पंचमहाभूत देहात आत्मा प्रवेशल्यानंतर सर्वप्रथम पुरुषार्थ जो आत्म्यातून देहात प्रवेशतो तो धर्म.   सनातन धर्मात चार पुरुषार्थ स्वीकारले आहेत. ज्यामध्ये धर्म प्रमुख आहे.  बाकी तीन पुरुषार्थ आहेत - अर्थ, काम और मोक्ष। गौतम ऋषि म्हणतात  - 'यतो अभ्युदयनिश्रेयस सिद्धिः स धर्म।' (जे कर्म केल्याने  अभ्युदय और निश्रेयस यांची  सिद्धि होईल  तो  धर्म आहे ), अर्थात अभ्युदय ...

प्रतिभेचा वेणूनाद

प्रतिभेचा वेणूनाद गुंजला आत्म्यांतरी  कृष्णगीत विरही राधा सखीचे प्रकटले  तो कृष्ण सोडून साद गेला एक बासरीचा  सप्त सूर उमटून राधेच्या हृदयी विसावले   दिव्य रागदारी मग ऐकली वृन्दावनाने  रास भक्तीचा असा मग रंगला अद्वैत  गुंग झाला आसमंत पाहता हि रासलीला  भाव सारे बंधमुक्त मग्न सोडून  द्वैत  मृत्यूलोकीचे नव्हे ते आत्मरंगी दोन्ही  स्वर्गलोकातून उतरून आलेले  उभय  प्रेम देहातीत केले जाणले ते दोघांनी  दोन ज्योती एक जाहल्या होऊन अभय  कृष्णराधा देह जरी दो एकची आत्मा  जाणले ज्याने तयाला सर्व उमगेल  षडरीपूंची बंधने तोडून देहापार तो  मोक्षास जाणून ध्येय तया साधेल  कवी : प्रसन्न आठवले  १८/०६/२०२० १६:३९

#श्रीकृष्णनीती #भाग३५

#श्रीकृष्णनीती #भाग३५ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! भरतवर्षाची गौरवशाली परंपरा खरतर सहाव्या सातव्या शतकापर्यंत सुरु होती. म्हणजेच सिकंदराच्या परत जाण्याच्या सुमारास म्हणजेच २३४२ वर्षांपूर्वी चंद्रगुप्त मौर्य याने आचार्य विष्णुगुप्त अर्थात आर्य चाणक्य यांच्या मार्ग दर्शनाखाली सार्वभौम सत्ता स्थापन केली. प्रथम त्याने मगधनरेश धनानंद याचा पराभव करून आर्य चाणक्याची प्रतिज्ञा पूर्ण केली. त्यानंतर त्याने पश्चिम आणि  वायव्ये कडील सर्व यवन राजांचा पराभव केला. साधारण २३३७ वर्षांपूर्वी म्हणजेच फक्त पाच वर्षात अफगाणिस्तान ते इराणपर्यंतचा प्रदेश काबीज करून मौर्य साम्राज्याचा विस्तार केला.  कलिंग प्रांत आणि खाली दक्षिण भारत सोडला तर संपूर्ण भारतवर्ष आणि इराण पर्यंत चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्याच्या सीमा पसरल्या होत्या. त्याने बावीस वर्ष वयाचा आपला  पुत्र बिंदुसार याला राज्यावर बसवून आपण सन्यास घेऊन वान प्रस्थाश्रमाचा स्वीकार केला. तदनंतर बिन्दुसाराने दक्षिणेत कर्नाटकपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. फक्त अति दक्षिणेकडील आताचं तामिळनाडू आणि केरळ या राजांशी असलेल्या मैत्री...

#श्रीकृष्णनीती #भाग३४

#श्रीकृष्णनीती #भाग३४ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! या भरतखंडाने जगाला संकृती, ज्ञान, विज्ञान, ऋषीमुनी, विद्वान, धर्मपरायण सत्पुरुष, महायोगी, संत महंत, द्वैतअद्वैत भेदाभेद, सगुण निर्गुण ज्ञान, अष्टांग योगायोग, नवविधा भक्ती, मोक्षमुक्तीचा बीजमंत्र , वसुधैवकुटुंबकम हा जगतोधारक मार्ग शिकवला. नुसता शिकवला नाही तर त्यावर लाखो वर्ष अनेक युगं चालून दाखवलं. येथील सत्पुरुषांनी राजे महाराजे यांनी अमाप संपत्ती , वैभव, ऐश्वर्य, सुबत्ता, समृद्धी स्वबळावर प्राप्त केली, येथील व्यापाऱ्यांनीसुद्धा हाच वारसा जपत संपन्नता प्राप्त केली.  राजेरजवाडे, महाराजे, धनिक, ऐश्वर्यसंपन्न लोकोत्तर पुरुषांनी येथेच दानधर्म, श्रीमंत असलेल्यानी त्या संपत्तीचा एक तृतीयांश हिस्सा देवब्राम्हणांना, एक तृतीयांश हिस्सा दानधर्मासाठी खर्च करून उरलेल्या एक तृतीयांश हिश्श्याचा स्वतःसाठी विनियोग करावा, हा अर्थव्यवस्था सुरळीत चालवणारा मूलमंत्र, नुसता दिलाच नाही तर तो मंत्र अनेक युगं सूत्रबद्ध पद्धतीने कार्यांवित करून भरतखंडातील समस्त जनतेला या ऐश्वर्याचा लाभ कसा मिळेल हे पाहिले. खऱ्या अर्थाने येथे सुवर्णयुग निर्मा...

#श्रीकृष्णनीती #भाग ३३

#श्रीकृष्णनीती #भाग३३ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!  संस्कृती , ऐश्वर्य, सुबत्ता यांच्या मुबलकतेमुळे असेल कदाचित, पण  त्याचं महत्व वाटत नाही. किंवा रामायण काळापासून येथे असलेली अमर्याद संपत्ती , समृद्धी यांच्यामुळे एक प्रकारची सूज बुद्धीला आली असू शकते. ज्याला आपण एखादी गोष्ट गृहीत धरणं म्हणतो त्याच न्यायाने समस्त भारतवर्ष, जे अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश पर्यंत पसरलेलं होतं, परंतु वेगवेगळ्या राज्यात विभागलेलं होतं, त्यात मुख्य राजे वा सम्राट असलेल्या काही घराण्यांनी संस्कृती, धर्म यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी नक्कीच धीराने आणि निष्ठेने पार पाडली. प्रसंगी प्राण अर्पण करून पुढील पिढ्यांना प्रेरणासुद्धा दिली.  पण आज जो मुद्दा मी मांडणार आहे तो या निष्ठेला पायदळी तुडवून, परकीय शक्तींना मदत करून, वेळप्रसंगी त्यांना येथे, इथल्याच निष्ठावान राजाला पराभूत करण्यासाठी, पाचारण करणारे अस्तनीतले निखारे या भूमीने पोसले त्यांना कोणतीही शिक्षा न करून पुढील जयचंदांच्या वारसांना धडा घालून दिला नाही. त्यांना साथ देणाऱ्यांचा बंदोबस्त केला नाही. ज्यामुळे ही विषवल्ली कधीही नष्ट झाली न...

अजयमेरू उर्फ अजमेर

अजयमेरू उर्फ अजमेर उपलब्ध दस्तऐवजानुसार अजयराज चौहान या चौहान राजघराण्यातील राजाने या शहराची स्थापना करून तिला वैभवशाली नगरी बनवलं. त्यानंतरच्या चौहान घराण्यातील राजानी या नगरीला तलाव, बगीचे यांनी सुशोभित केलं. या नगरीची स्थापना २७ मार्च, १११२ साली अजयराज चौहान यांनी केली. त्यांच्या नावावरूनच या नगराला अजयमेरू हे नाव देण्यात आलं. अजय हे राजाचं नाव आणि मेरू म्हणजे शिखर वा उच्चस्थान. या शहराच्या सौन्दर्याबद्दल लिहिताना पृथ्वीराज चौहान यांच्या दरबारातील कवी जयनक कश्मिरी यांनी इंद्राची अलंकापुरी, श्रीकृष्णाची द्वारका आणि रावणाची लंका यांच्यापेक्षा सुंदर नगरी असं वर्णन केलं आहे.  या नगराच्या स्थापनेनंतर चौहान राजाने या नगराला आपल्या साम्राज्याची राजधानी केलं. या चौहान घराण्याने जवळ जवळ आठशे ते हजार वर्ष राज्य केलं. अजयराज चौहान या घराण्यातील तेवीसावा राजा होता. याच घराण्यातील शेवटचे राजे पृथ्वीराज चौहान होते,  ज्यांचा पराभव मोहम्मद घोरी अर्थात गझनीचा मोहम्मद याने केला आणि हजार वर्षांची चौहान घराण्याची सत्ता संपुष्टात आली.  याच पृथ्वीराज चौहान यांना छत्रपती शिवाजी महाराज, राजे ...