Skip to main content

Posts

सुभद्राहरण १३

सुभद्राहरण १३ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll   अर्जुन बैठक सोडून हनुमंताजवळ जाऊन नमस्कार करतो. हनुमंत अर्जुनाकडे पाहतो. ध्यानस्थ असतो तो नेत्रकवाडे उघडून एक स्मितवदन कटाक्ष अर्जुनाकडे टाकून त्यास कोण, कुठून आलास, कुळ काय का आलास इत्यादी प्रश्न विचारतो.  अर्जुन त्याला आपला परिचय देतो.  आजूबाजूचा परिसर व त्याची महती हनुमंताकडून जाणून, अर्जुनाने हनुमंतास पृच्छा केली. हा येथून जाणारा सेतू कुठपर्यंत विस्तारला आहे, तो कोणी बांधला आणि कींकारणम् बांधला.  हनुमंताची नजर शून्यात जाते. त्रेतायुगातील माता सीतेसाठी केलेली पराकाष्ठा हनुमंताच्या नजरेसमोर येते. गतकाळाच्या आठवणीतून वास्तवात येत हनुमंत वदतो  " याच ठिकाणाहून प्रभूंनी, सागरात श्रीरामेश्वरपासून लंकेपर्यंत श्रीरामसेतून बांधून,  सागर ओलांडून लंकेत प्रवेश केला, माता सीतेच्या सुटकेसाठी."  अर्जुन म्हणाला " क्षमा करा, परंतु श्रीराम एवढे सर्वश्रेष्ठ धनुर्धर असूनसुद्धा बाणांचा सेतू न बांधता हा सेतू का बांधला"   हनुमंत म्हणाला " हे अर्जुन , कदाचित त्या बाणाने माझ्यासह अनेक बलवान, महाकाय...

सुभद्राहरण १२

सुभद्राहरण १२ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll   अर्जुनाचं धनुष्यातील कौशल्य आणि निपुणता पाहून निषाद संतोषला.  निषादाच्या भात्यातील सर्व बाण व अस्त्रांना अर्जुनाने अचूक प्रत्युत्तर दिलं होतं. अर्जुनाच्या या धनुष्य कौशल्याने अत्यंत हर्षित झालेल्या निषादाचे  स्वरूप बदलून प्रत्यक्ष उमापती कैलासेश्वर समोर उभे राहीले. अर्जुन ते पाहून क्षण एक स्तब्ध झाला, स्तंभित झाला पण लगेच सावरून शिवशंकरांना चरणांवर मस्तक ठेवून पूर्ण श्रद्धेने नमन करून हात जोडून उभा राहिला. अर्जुनाच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू झाल्या. ते पाहून भगवान शंकर अर्जुनाला म्हणाले  " हे वीरपुरुष तू कोण आहेस, तुझा परिचय काय आहे आणि कीं कारणम् येथे आला आहेस. तू उत्तम धनुर्धर आहेस, तुझे गुरुकुल कोणते आहे आणि तुझ्या नेत्रातून अश्रू का येत आहेस."  भगवान शंकराच्या आश्वस्त बोलने भानावर येत हात जोडलेल्या स्थितीत अर्जुन म्हणाला " हे त्रिलोचन , भगवान महेश्वर, सर्वप्रथम मला आपण क्षमा करावी, अजाणता मी आपल्यावर शस्त्र चालवून आपल्यासमवेत द्वंद्व केलं आणि अत्यंत उद्दंडतेने आपल्याला आव्हानीत केलं. मी त्या...

सुभद्राहरण ११

सुभद्राहरण ११ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll एका सुंदर तळ्याकाठी एका मोठ्या वृक्षाखाली स्वच्छ केलेली जागा अर्जुनाच्या दृष्टीस पडली. अर्जुनाने त्या स्थानाची निवड विश्राम करण्यासाठी केली. अर्जुन त्या स्थानी स्थानापन्न झाला. खरतर ती जागा एका निषादाची होती, जो त्या जागी नित्य ध्यानधारणा करत होता. आपली नित्य कर्मे उरकण्यासाठी गेला होता. अर्जुन योगायोगाने त्याच वेळेत आला, त्यामुळे त्याला माहित नव्हतं की,  ही त्या निषादाची बसण्याची जागा आहे. अर्जुन स्थानापन्न झाल्यानंतर काही वेळाने निषाद आपली नित्यकर्मे पार पाडून त्या स्थानी पातला. आपल्या स्थानी एका यात्रीने स्थान ग्रहण करून  त्यावर आपले आसन मांडून तो तिथे स्थानापन्न झाल्याचे पाहून निषाद क्रोधीत होऊन आपले पिनाक उचलून त्या यात्रेकरुजवळ त्याच क्रोधाच्या आवेशात गेला . त्या यात्रेकरूच्या समीप जाऊन म्हणाला. "हे उदंड यात्री. तू माझ्या स्थानावर स्थानापन्न होऊन माझे स्थान ग्रहण केले आहेस. याचा काही विषाद नाही वाटत का तुला."  अर्जुन शांतपणे त्या निषादाला म्हणाला "हे पांथस्थ निषाद , मी या स्थानी आलो तेंव्हा हे स्थान र...

सुभद्राहरण १०

सुभद्राहरण १० ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll चित्रांगदेच्या गालावर ओघळलेले अश्रू पुसत अर्जुन पुढे बोलणार इतक्यात, स्फुंदत, आपले शिश अर्जुनाच्या स्कंधावर ठेवत  आणि अतिव्याकुळ स्वरात चित्रांगदा म्हणाली.  " मला आपण दूर जाणार याचं दुःख तेंव्हा झालं नसतं जर तुम्ही एखाद्या युद्धासाठी जाणार असतात.  कारण मी एक क्षत्रिय पुत्री आहे आणि त्याकारणे मी हे नक्कीच जाणते की एक क्षत्रिय युद्ध करण्यासाठी जात असेल तर नक्कीच त्याला साश्रु नयनांनी निरोप देऊ नये. परंतु आपण मला विरहाच्या अग्निमध्ये लोटून जात आहात आणि तरीही माझं सांत्वन करत आहात की, मी अश्रू ढाळू नये. आपण माझ्या वेदना जाणत आहात तरी हे म्हणत आहात की न जाणत असल्यामुळे हे म्हणत आहात."  चित्रांगदेच्या लोचनातून वाहणाऱ्या अश्रूंना पुसत अर्जुन तिच्याकडे पाहात म्हणाला " हे कल्याणी, मी तुझं दुःख खचितच समजू शकतो कारण,  मी स्वतः माझ्या प्रियजनांपासून दूर आलो आहे. परंतु जीवनात काही गोष्टी भविष्यातील सुखाचा विचार करून स्वीकाराव्या लागतात. आपल्या पुढील भेटीला फार काळ जाईल असं मला स्वतःला वाटत नाही. त्यामुळे तू विर...

रामायण ,उर्मिला त्याग , निष्ठा यांची मूर्ती

वाचण्यात आलेली रामायणातील हिंदी कथा माझ्या शब्दात आणि शैलीत मराठीत स्वैर अनुवादित !!  इंद्रजिताच्या शक्तीअस्त्राचा परिणाम होऊन भ्राता लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडले आहेत. प्रभू स्वतःच्या मांडीवर लक्ष्मणाचं मस्तक ठेवून विलाप करत बसले आहेत. हनुमंत विभीषणाच्या सांगण्यावरून वैद्यराज सुशेण याना ते झोपलेल्या पलंगासह  घेऊन येतो. वैद्यराजाना जागं करून विभीषण  परिस्थिती कथन करून लक्ष्मणाचा जीव वाचवण्याची विनंती करतात. . वैद्यराज लक्ष्मणाची नाडीपरिक्षा करून प्रभुंकडे हात जोडून पाहतात आणि म्हणतात " हे श्रीराम लक्ष्मणाला वाचवण्याचा एकच उपाय आहे हिमालयात संजीवनी नावाची वनस्पती आहे तिचा पाला काढून त्याचा काढा करून तो जर लक्ष्मणाला दिला तर त्याचा जीव वाचू शकेल. तेदेखील सूर्योदयाच्या आत, अन्यथा...... "  वैद्यराजांचे हे शब्द एखाद्या तीराप्रमाणे प्रभूंच्या हृदयात घुसले. नेहमी अविचल असणारे  प्रभू एक क्षण विचलित होतात . विभीषण आणि सुग्रीव यांनी प्रभुना धीर दिला. बंधू विरहात व्यथित झालेले प्रभू क्षणात अश्रू ढाळू लागले. प्रत्यक्ष प्रभुना अश्रू ढाळताना पाहून हनुमंत अत्यंत कष्टी झाला. त्य...

देवभूमी

आज या संकटात अनेक हातानी ईश्वरच सहाय्य करतो आहे. ही नक्कीच दैवभूमी आहे. म्हणूनच प्रत्येक संकटात पुण्यवान माणसांच्या जाणिवा जागृत ठेवून त्यांच्या करवी सहाय्य करवून घेऊन ईश्वर या भूमीला संकटातून सहजी बाहेर काढतो. आजसुद्धा या संकटातून वैद्यकीय सेवा देणारे, सुरक्षा सेवा देणारे, अत्यावश्यक सेवा देणारे, सरकारी अधिकारी जे घरी न बसता अहोरात्र आपल्यासाठीच झटत आहेत, त्या सर्व सेवार्थीच्या माध्यमातून स्वतः ईश्वरच या भूमीवर अवतरला आहे., अशी माझी धारणा आहे. त्यांच्या मनोबलाला आपण द्विगुणित करूया.  काही अपवाद वगळता बहुतांशी जनसामान्य घरीच राहून त्यांना व सरकारला सहकार्यच करत आहेत. त्या सर्वांना ईश्वररूप मानून खालील ओळी लिहिल्या आहेत. ईश्वर हा वेगळा सहाय्य करत नाही तर मानवरूपातील त्याच्या अंशातूनच तो मानवाला सहाय्य करतो. म्हणूनच त्या मानवरूपातील सर्व सेवार्थी ईश्वरअंशाला ही शब्दरूप पुष्पमाला सादर.  अनंताची शक्ती पाठीशी अनंत भजती ईश्वराला अनंतरुपे पाहतो ज्याला तोचि राखतो कृपे आम्हाला निष्काळजी न आम्ही कधी भक्ती करतो विधात्याची कुणी म्हणती स्वामी त्यांना महाराज म्हणती त्या स्वरूपाला अनंतरुपे प...

सुभद्राहरण ९

सुभद्राहरण ९ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll आमच्या चर्येवरील भाव आणि अंतःकरणातील पश्चाताप जाणून देवर्षी म्हणाले. दक्षिण समुद्र किनाऱ्यावर पाच रमणीय तीर्थे आहेत. तुम्ही विनाविलंब  तेथे प्रस्थान करा. तिथे विश्वातील सर्वश्रेष्ठ पुरुष धनंजय अर्थात पांडुपुत्र अर्जुन लवकरच येईल आणि तुमची सुटका करेल. त्यांचे बोल ऐकून आम्ही शीघ्र गतीने या तीर्थात आलो. हे अनघ, या बाकीच्या चार तीर्थात माझ्या चारही सख्या आहेत. मी तुम्हाला हात जोडून नम्रतेने विनंती करते की आपण त्वरित त्यांचीसुद्धा या शापातून मुक्तता करावी."  पांडुपुत्र अर्जुनाने वर्गाच्या विनंतीवरून त्या चारही ग्राह रूपातील अप्सरांना जलाबाहेर काढून त्यांना शापमुक्त केलं. बाहेर आल्याबरोबर  त्या पुनः आपलं आधीचं रूप प्राप्त कर्त्या झाल्या. अर्जुनाचे चरणस्पर्श करून त्या पाचही अप्सरांनी अर्जुनाचे आभार मानून पुनः नंदनवनात प्रस्थान करण्याची अनुमती घेतली. अर्जुन त्यांना अनुमती देऊन. त्या पाचही तीर्थात स्नानसंध्या करून पुनः मणिपूरला चित्रांगदेकडे परत आला. अर्जुन गेल्यानंतर अर्थातच त्याच्यापासून चित्रांगदेला झालेल्या अर्जुन...