दुसरा सरदार पटेल अर्थात गृहमंत्री श्री अमितभाई शाह अर्थात मोटाभाई - भाग ४ पुढे खरतर आज ४था आणि अंतिम भाग करणार होतो. पण काल रात्रीच काश्मीर प्रश्नावर वाचत असताना काही लेख आणि त्या अनुषंगाने माहिती हाती लागली. म्हणून या विषयात तो विषय गुंतलेला असल्यामुळे थोडं विषयांतर होतंय पण ती माहिती देणं मी गरजेचं समजतो. म्हणजे काही गैरसमज वा अपसमज असतीलच तर ते दूर होतील. काश्मिरफ हे एक संस्थान होत. ब्रिटिश काळात ते ब्रिटिशांच्या अंमलाखाली होत. स्वातंत्र्याच्या वेळी काश्मीरचे राजे हरिसिंग होते हे सर्वांना ज्ञात असेल. साधारण १९३२ ला त्यावेळच्या काश्मीर संस्थानात घाटातील एक मुस्लिम नेता शेख अब्दुल्ला (फारुख अब्दुल्ला यांचे वडील) यांनी महाराज हरिसिंग हटाव मोहीम सुरु केली होती. याआधी हि मोहीम फक्त काश्मिरातील मुस्लिम लोकांसाठी सुरु करण्यात आली होती साधारण १९३९ ला अधिक तीव्र करण्यात आली. आणि पूर्वी जो पक्ष काश्मीर मुस्लिम कॉन्फरेन्स नावाने सुरु केला होता शेख अब्दुल्ला यांनी तो १९३९ मध्ये नॅशनल कॉन्फरेन्स नावाने बदलण्यात आला. १९४६ जुन मध्ये अब्दुल्ला यांनी काँग्रेस आंदोलनावरून प...