Skip to main content

Posts

प्रेम अनामिक

प्रेम अनामिक  कळले न मला ते भाव सखया   मनातील त्या डोळ्यानी  जाणून आहे तरि लोचनी  प्रेम असे जे तूझ्या मनी उगाच वारा घेऊन येतो गन्ध अनामिक ओलावा उठती मनी या तरंग सखया अवचित प्रेमाची किमया उड़े धूळ जी घेऊन येते तव प्रेमाची साक्ष सख्या मधातील कारंज्यांना मग अवखळ साक्षी तूच हवा उत्तुंग मनोरथ केले नव्हते कधीच  मनात मी प्रेमाचे उणे अधिक या वाटेवरती स्वप्न  तू झ्या बस साथीचे भेटावे मज वाटे अविरत तूला चांदण्या रात्री रे हवाहवासा वाटे वारा धुंद मधूर  तू  साथी रे जरी गूलाबी कोड़े पडले सूटे न वाटे ते कधीही तूझ्या समीप येण्यासाठी  आतूर झाले मी कधीची दोष मनाचा काही असला तर तो आहे रे इतका तूझी ओढ़ ही वाटे मजला संग ऊरो  तव प्रेमाचा  कवी: प्रसन्न आठवले 

तुझ्याचसाठी

तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी जगते प्रिया रे  मनी माझिया हि प्रीत तुझी रे  तुझ्याचसाठी ...  हे बोलणे चांदणे जणू प्रिये  ग  स्वप्नातले भासते जग प्रिये ग  हे बोलणे ...  तुला पाहिले मानसी मी सखे ग  तुझी मूर्त डोळ्यात माझ्या सखे ग  तुझे चालणे भासते हंसिणी ग  हे बोलणे .....  तू स्वप्नात, सत्यात, हृदयात, माझ्या  तुझे गीत  झंकारते कानी माझ्या  तू जागेपणी भास दिसशी  प्रिया रे  तुझाचसाठी ....  आता या मनाला कसे सांगणे ते  पुन्हा  पाहुनी, फिरुनी  पाहणे ते  हवे वाटते  मीलनी चांदणे रे   तुझ्याचसाठी ...  हे बोलणे ....  कवी : प्रसन्न आठवले 

श्री गणेशा

श्री गणेशा  हेरंबा श्री मोरया गजवदना सुख कांचना  कृपा तुझी हि राहू दे आम्हावर गौरीनंदना  तुज स्मरता दिन उगवू दे दयाघन  चिंता तुज चरणी नतमस्तक राहूदे  वृत्ती स्मृती तुज वाहुनी शिवानंदन  तव नामाची मज एक ओढची लागू दे  आंद्या  तू अनार्या  तू चिंतामणी तू  इच्छित ते ते देसी सर्वा गुणग्राहक तू  वंदूं  तव सर्व काळी सर्वा आधार तू  तुझ्या कृपेचा राहो हस्तक सर्वार्थ तू  हे निजानंदा आत्मवंदा सर्ववृन्दा ब्रम्ह तू  भूमंडलाचा तू कलेचा साक्षी तू सर्वत्र तू  असशी ऐसा दीनानाथा आत्मतेजा श्वास तू  सर्वार्थ तू सारार्थ तू सुबुद्धी तू संजीव तू  लोचनी आणून मूर्ती पूजितो गणराज तूज  साहिले जे दुःख त्या सर्वात मी वंदिले तुज  माय तू मोक्षार्थ तू सारं सार्व वाहीन  तूज  पतित पावन परशुधारी हे कवन वाहियले  तुज                       कवी : प्रसन्न आठवले 

ऑडिटर

ऑडिटर  ऑडिटर ऑडिटर ऑडिटर  फक्त त्रासच त्रास जीवनभर कामच काम सतत धावपळ  प्रवास दगदग फक्त गोंधळ  उन्ह,गर्मी  पाऊस थंडी वारा  मिळेल तिथे करतो निवारा  खाण्यापिण्याचे हाल बेहाल  पोटाची वाट करतो एकच सवाल  कुठे तरी कुणी घर देता का घर  सतत फिरत राहायचं हॉटेलवर  आज इथे उद्या तिथे मिळेल त्या वाटे  थारा नाही, थांग नाही पत्ता नाही कुठे  काम केलं , निघालो परत काम करणे  आयुष्याची बेरीज वजा बाकी काही न उरणे  कायम टार्गेट कधी स्टाफ कडून  यांना खुश केलं तर क्लायंटकडून  कुणीही कधीहि यावं काही बोलावं   ढोल झालाय ढोल कुणीही बडवावं  विनातक्रार काम विनाआराम काम  बदल्यात शिव्याच विना स्वल्पविराम  कवी: प्रसन्न आठवले 

तूझे मनाचे बोल

तूझे मनाचे बोल  तू झे मनाचे बोल हे मी वाचले नयनी तुझ्या हसुनी मला तू पाहिले प्रतिसाद हा वदनी  तू झ्या त्या मुग्ध शीतल तारका जणू बोलती आलाप हा प्रीतीत त्या भेटीस जा जणू सांगाती  तू ज भाव हा मीही मनोरथ या मनी वदलो  तू ला सांगावया तू झे मनाचे ....... ती जीवघेणी विरहता सांभाळू आता का सखे ती भेट होईल आपुली मज वाटते आहे सखे या एकतेची जाण ती  मी वाहतो कवनात या तू झे मनाचे .......  कवी : प्रसन्न  आठवले 

अजूनही

        अजूनही  तिच्या बटानी झूलतो आहे अजूनही वाट मी बघतो आहे जूळले नसले धागे जरिहि अजूनही श्वास चुकतो आहे अजूनही वाट .... आठवल्या त्या वेण्या सुंदर मऊ मोकळ्या झूल केसांवर किंचित काळ्या गर्द भुवईचा अजूनही बाण दिसतो आहे तिच्या बटानी .... डोळे नभही हलवून टाकी जागी मजला खिळवून ठेवी अश्या नयनी त्या अड़कून आहे तिच्या बटानी ...... अजून जाणवे ओढ़ अनामिक दिसेल मजला श्यामल नासिक तिच्या नामी जग फिरते आहे अजूनही वाट ...... कितीकदा ती दिसली सुंदर मना वाटले बुडलो, सावर तरीही किनारी तरतो आहे अजूनही वाट ...... दिसेल मजला वर्षारंभी तिची छबी सर्वा आरंभी तिला पाहण्या झुरतो आहे अजूनही वाट ....... कवी: प्रसन्न आठवले 

वो बारिश और तुम

वो बारिश और तुम हल्की सी वो बारिश थी और हाथ में था हाथ तेरा बूंदों की रिमझिम पे भी साया जुल्फों का था तेरा हल्की सी ...... हर इक पल जो चूम रहा था कदमों की आहट को   गूजरा पल शर्माता था होश गवाता  चू मके तूझको ऐसे में बिजली का आना और लिपटना मूझसे तेरा हल्की सी ...... दिलकी बातें लब पर आकर रुक जाती पलको में मैं न बताऊँ तो तू जाने ऐसा होना ना किस्मत में या फिर जानके अंजाना सा आँखों का शर्माना तेरा हल्की सी ...... मैं तो हरदम तुझको चाहू दिलमे तेरी है तसवीर भी तू भी मूझको चाहे ऐसी होगी क्या मेरी तकदीर भी ख़्वाबों में तो आते हो पर चाहूं दिलसे साथ तेरा हल्की सी .....  कवी : प्रसन्न आठवले