Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर भाग ६५६

भोग आणि ईश्वर भाग ६५६ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले  सूक्ष्म देह हा, स्थूल देहात प्रवेश केल्यावर, गर्भात असताना, कोणत्याही बाह्य गोष्टींचा परिणाम किंवा कोणत्याही बाह्य विषयाशी संबंध आलेला नसतो. त्यावेळी तो शुद्ध स्वरूपात असतो आणि आपल्या आधीच्या कर्मांची माहिती असल्यामुळे, ईश्वराची क्षमायाचना करून, केलेल्या चुकांचं आणि अपराधांचं परिमार्जन करण्याच्या आणाभाका घेत असतं. कारण मृत्यू पश्चात आत्म्यासह गेलेल्या सूक्ष्म देहाला गत जन्मातील गोष्टींचं स्मरण असतं.  हे स्मरण स्थूल देहात असताना, देहाच्या मर्यादेमुळे विस्मृतीत गेलेलं असतं. म्हणजेच गर्भात तेच स्मरण शिल्लक असतं. पण गर्भरुपातून, बाह्य जगतात येताच, पुन्हा विस्मृतीचा पडदा पडतो. अर्थातच याला देहाच्या, ज्ञानेंद्रियांच्या, कर्मेंद्रियांच्या मर्यादा कारणीभूत आहेत. एकदा बाहेर आलेला बालक या जगताचा होईपर्यंत त्या स्मृती शिल्लक असतात. पण जसजसा देह वाढत जातो. सूक्ष्म देहाला या जगाच्या मर्यादांचा, मायेचा, अतृप्त इच्छा वासना, इत्यादी सहा शत्रूंचा पाश वेधून टाकतो. त्या क्षणापासून तो जीव गत जन्मातील कर्मांचा हिशोब विसरून, प्राप्त देहाच्...

भोग आणि ईश्वर भाग ६५५

भोग आणि ईश्वर भाग ६५५ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले  सूक्ष्म देह आणि स्थूल देह या दोन्हींनी कर्म होतात हे आपण पाहिलं. पण प्रत्यक्षात सूक्ष्म देह इच्छा, वासना, क्रोध, इत्यादी. भाव निर्माण करतो. पण त्यांचं शमन हे स्थूल देहा मार्फतच होतं. त्या अर्थाने सर्व कर्म ही स्थूल देहाने केलेली असल्यामुळे, खरंतर फलरूप शिक्षा किंवा बक्षीस हे त्या देहालाच व्हायला हवंय. पण प्रत्यक्षात जी कर्म फलरूपाला पक्व होत नाहीत ती, संचित रूपात गंगाजळीत शिल्लक राहतात.  हिशोबाच्या भाषेत सांगायचं झालं तर, करंट म्हणजे चालू काळाची व संचितातील परिपक्व फळांची देणी व घेणी चालू काळात वसूल होऊन, ते चालू काळात (अर्थात सध्याच्या जन्मात) भोग व उपभोग रूपात समोर येतात. त्याचं नफातोटा पत्रक म्हणजे आपलं या देहातील, या जन्मातील जीवन. जे भोगून होणार नाही किंवा अपूर्ण अथवा अपरिपक्व फल असेल ते पुढील जन्मासाठी संचित स्वरूपात ताळेबंदात शिल्लक राहील.  ते सूक्ष्म देहात साठवून आत्मा, शरीर सोडताना पुढील जन्मासाठी घेऊन जाईल. आता प्रश्न तरीही अनुत्तरित राहतो की, जर सर्व भाव भावना सूक्ष्म देहातील मन बुद्धी चित्त आणि अहंकार...

भोग आणि ईश्वर भाग ६५४

भोग आणि ईश्वर भाग ६५४ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    काल एक गोष्ट लक्षात आली असेल की, सूक्ष्म देह आणि स्थूल देह मिळून जो खेळ आयुष्यभर खेळतात, त्याच्या परिणामांची छाया पुढच्या जन्मात, त्या जन्मातील स्थूल व सूक्ष्म देहाला मिळून भोगावी लागते. आत्मा मात्र चैतन्य रूपात त्या कार्याला साक्षीत्व देतो. म्हणजे फक्त स्थूल देह नाही तर सूक्ष्म देह सुद्धा या सर्वात भागीदार असतो. मन विचार करतं, बुद्धी त्याचं विश्लेषण करून कार्य करण्यास देहाला प्रवृत्त करते. मनात येणारे सर्व विचार वृत्ती रूपाने चित्तात साठवले जातात. त्या वृत्तीचं पुढे व्यक्तिमत्वात रूपांतर होऊन, ती त्या व्यक्तीची ओळख होते. यातूनच त्या व्यक्तीला हीन दर्जाचा, लंपट, क्रोधी, तापट, शांत, सोशिक, सात्विक, राजसी, इत्यादी उपाध्या प्राप्त होतात. तो त्या व्यक्तीचा गुणधर्म होतो. तो त्रिगुणातील एक किंवा अधिक गुणांच्या मिश्रणाचा संचय होतो. या गुणांवर आपण नंतर चर्चा करूया. नंतर त्या उपाध्या त्याच्या स्वभावाचा भाग बनतात. म्हणूनच एखादा मनुष्य मूलतः रागीट, चिडचिड करणारी, शांत, मनमिळावू, सुस्वभावी, इत्यादी इत्यादी असल्याचं आपण म्हणतो....

भोग आणि ईश्वर भाग ६५३

भोग आणि ईश्वर भाग ६५३ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    मनाने, बुद्धीने आणि आत्म्याने जे काही  केलं जातं, त्याला सुद्धा कर्म म्हणतात. कारण सूक्ष्म देह आणि आत्मा, या देहात असेपर्यंत, त्या देहातील सूक्ष्म देहाने, जे काही विचार केले जातील, त्याच विचारांनी काही कार्यांना गती दिली जाते. जरी नुसते विचार केले गेले, तरीही त्या विचारांसाठी ऊर्जा, शक्ती व ओज तेज खर्च होईलच. म्हणजेच जिथे काही खर्ची पडतं तिथे नक्कीच काही निर्माण होतं. मात्र निर्माण झालेलं खर्च झालेल्या ऊर्जेने, ज्या विचारांच्या लहरी, तरंग किंवा vibrations अर्थात vibes निर्माण झाले, त्यानुसार त्या कर्माच्या बीजाची निर्मिती होते. जशी बीज निर्मिती असेल, त्याप्रमाणे त्या कर्माचं झाड आणि त्याला त्या प्रकारची फलनिष्पत्ती होणार. हे सर्व तार्किक वाटलं तरीही, सत्य आहे. आपण इतक्या सूक्ष्मात जाऊन विचार करत नाही. कारण आपण तितकं चिंतन करतच नाही. परंतु आपल्या पूर्वजांनी, ऋषी मुनी, विद्वान या शास्त्रज्ञांनी याचा खोलात जाऊन विचार, चिंतन, अभ्यास आणि तपशीलवार मांडणी केली. त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या, मनातील प्रगाढ खोलीच्या आणि ...

भोग आणि ईश्वर भाग ६५२

भोग आणि ईश्वर भाग ६५२ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    या विश्वात म्हणजे अनंत ब्रह्मांडं असलेल्या या जगतात (पूर्ण व्यापक अर्थाने आणि दृष्टीने), फक्त पृथ्वी नामक ज्ञात ग्रहावर, आपण 700 ते 800 कोटी मानव आहोत. बाकीचे प्राणी वेगळे. म्हणजेच तितके स्थूल देह, सूक्ष्म देह आणि आत्मे या पृथ्वीवर व्यक्त स्वरूपात वावरत आहेत. यामध्येच विश्वनियंत्याच्या भव्य स्वरूपाची कल्पना येईल. तितकीच व्यापक मायेची शक्ती आहे, जी या विश्वातील प्रत्येक जीवाला ब्रह्माशी बांधून ठेवून, स्वतः अज्ञात आहे.  यामध्ये प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं आहे. क्वचित एखादा माणूस संपूर्ण पृथ्वीवर दुसऱ्या माणसाप्रमाणे तंतोतंत आयुष्य जगत असेल. ही आपल्या कल्पनेतील फक्त शक्यता आहे. अन्यथा, साधारण 700 ते 800 कोटी लोकं 700 ते 800 कोटी प्रकारचं आयुष्य जगतात, असं ठामपणे सांगता येईल. म्हणजेच प्रत्येकाची lifeline अर्थात जीवनरेखा भिन्न भिन्न मार्गाने जात असते.  याचं काहीतरी कारण असणारच. वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर, तितक्या विचार लहरी, तरंग या वातावरणात उमटत असतात. त्या एकमेकांना आकर्षित किंवा प्रतिकर्षित करत असती...

भोग आणि ईश्वर भाग ६५१

भोग आणि ईश्वर भाग ६५१  ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    आपल्या मनात येणारे विचार किंवा येणारा प्रत्येक विचार हा कुठेतरी कर्माशी निगडित असतो. किंबहुना आपण घेतलेल्या पहिल्या श्वासापासून सुरू झालेला या देहातील, हा प्रवास, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, या जन्मात, संकेतात्मक किंवा संदेशात्मक असतो. आपल्या मनात आलेला विचार कृतीत येऊन, त्यातून घडणारं प्रत्येक कर्म हे कुठेतरी आधीच्या कर्माशी निगडित असतं.  त्याची शंभर टक्के संगती जोडणं, हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अशक्य असतं. अर्थातच ही संगती जोडून, त्याचा नेमका अर्थ लावणं हे अद्वितीय, अलौकिक ऊर्जा, शक्ती असलेल्या भूतलावरील, काही दिव्य सत्पुरुषांना शक्य असतं. त्यांना एखादी व्यक्ती पाहिल्यावर, त्याच्या आत्म्याचा इथवरचा प्रवास दिसतो आणि या देहातील आत्म्याची परतीची वाट कुठे चुकली, हे त्यांना समजतं. त्यानंतर ते सांगतात त्याप्रमाणे आपण केल्यास, पुढील मार्ग सुकर होत जातात. या मधे एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे त्यांचं मार्गदर्शन ही एक दिशा असते. उदाहरणार्थ आपण नवीन जागेचा पत्ता नवीन शहरात, गावात शोधत असताना, एखाद्या ...

भोग आणि ईश्वर भाग ६५०

भोग आणि ईश्वर भाग ६५० (पुन्हा सुरू) ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले ही लेखमाला पुन्हा सुरू करत आहे. महाराजांची इच्छा असेल त्याप्रमाणे पुढे जाईल.  आपण प्रारब्ध, नशीब, luck, bad luck इत्यादी शब्द वापरतो. मुळात प्रारब्ध म्हणजे काय. कधीकधी ईश्वरेच्छा बालियसी सुद्धा म्हणतो. पण याचा नक्की अर्थ आपण न समजून घेता, हे शब्द वापरून, वास्तविक ते बोथट किंवा अर्थहीन केले आहे. त्याचप्रमाणे आपण ते सोयीनुसार सुद्धा वापरतो. मी सुद्धा मला यामध्ये मोजलेलं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी आपलं सर्व चांगलं होत असतं, त्यावेळी आपण माझ्या कष्टाला फळ मिळालं. किंवा देवाने माझ्या कष्टाचं चीज केलं असं म्हणतो.  कधीकधी आपण देवाला सुद्धा यात मधे आणत नाही. त्याऐवजी आपण म्हणतो. माझ्या कष्टाचं चीज झालं. पण हेच ज्यावेळी आपण नकारात्मक काळातून, वाईट घटना घडतानाच्या काळातून जातो, त्यावेळी मात्र, देवाचं माझ्याकडे दुर्लक्ष आहे, देव सुद्धा वेळेनुसार पाठ फिरवतो, देवाला माझ्याबद्दल काहीही प्रेम आस्था उरलेली नाही, मीच सापडलो / सापडले का देवाला त्रास द्यायला, माझं नशीबच फुटकं आहे. ही एक दुसरी बाजू आपलीच असते....

ऑपरेशन सिंदूर ४

India's Military and Political achievements of Operation Sindur 2025.  Pls understand one thing, Its apparantly clear that USA n china are playing with us. Both don't want india to grow. India is poised to take 3rd position very fast and both are very much confident of this. USA which is economically destabilized and in shocks, is going out of world superpower race. All that Trump is doing, is to being back old legacy of The America, back on track.  The world knows, till the Modiji makes any mistake, India will surely climb to 3rd position by 2028, as per world bank reports. This is about economic front. They want Modiji to commit a mistake. Modiji, till date have not done a single mistake in any subject or matter. Modiji is purposely moving very slow, in all his actions. Because he wants to know, who are the real players behind.  Turkey was till date lonely supporter of Pak in this entire period. Through IMF USA has shown their true colour. Due to the fact that, they a...

ऑपरेशन सिंदूर ३

रणनीती, युक्ती आणि मोदी, Try and understand !!  सर्वात प्रथम  मला सुद्धा घरी आपल्यावर ही बातमी समजली. मग शांत बसून विचार केला, त्यावेळी जे सर्व लक्षात आलं, ते खाली मांडतो. पटल्यास पुढे पाठवा.  एक लक्षात घ्या की सध्यासाठी मिलिटरी ऍक्शन थांबवण्यात आलेली आहे. त्यासाठी विनंती पाकिस्तानी पंतप्रधान यांनी अमेरिकेच्या माध्यमातून केली. पाकच्या संसदेत त्यांनी केलेल्या भाषणात भारताची मिलिटरी पॉवर, संपूर्ण जगत भारताच्या बाजूने असल्याची गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितली आहे. क्लिप कॉमेंट मधे पोस्ट केली आहे.  दुसरी गोष्ट, अत्यंत दर्पोक्तीपूर्ण भाषा आणि कृती करणाऱ्या पाकला फक्त 2 दिवसात वठणीवर आणून, गुडघ्यावर आणून उभं केलं आहे. सध्या फक्त मिलिटरी ऍक्शन थांबली आहे. पण या युद्धाबंधीच्या अटी आणि शर्ती काय असतील, हे आता भारत ठरवणार.  इथेच खरी रणनीती आणि इतिहासाची पुनरावृत्ती न होण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वावर आहे. त्याबाबत मोदी खूप सक्षम, कणखर व दृष्टे आहेत आणि तितकेच बुद्धिमान  सुद्धा आहेत, यात शंका नाही. इथे एकच उदाहरण देतो, 370 रद्दबादल करताना, त्याला सर्व बाजूंनी कायमस्वरूप...

ऑपरेशन सिंदूर २

रणनीती, युक्ती आणि मोदी, Try and understand !!  सर्वात प्रथम  मला सुद्धा घरी आपल्यावर ही बातमी समजली. मग शांत बसून विचार केला, त्यावेळी जे सर्व लक्षात आलं, ते खाली मांडतो. पटल्यास पुढे पाठवा.  एक लक्षात घ्या की सध्यासाठी मिलिटरी ऍक्शन थांबवण्यात आलेली आहे. त्यासाठी विनंती पाकिस्तानी पंतप्रधान यांनी अमेरिकेच्या माध्यमातून केली. पाकच्या संसदेत त्यांनी केलेल्या भाषणात भारताची मिलिटरी पॉवर, संपूर्ण जगत भारताच्या बाजूने असल्याची गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितली आहे. क्लिप कॉमेंट मधे पोस्ट केली आहे.  दुसरी गोष्ट, अत्यंत दर्पोक्तीपूर्ण भाषा आणि कृती करणाऱ्या पाकला फक्त 2 दिवसात वठणीवर आणून, गुडघ्यावर आणून उभं केलं आहे. सध्या फक्त मिलिटरी ऍक्शन थांबली आहे. पण या युद्धाबंधीच्या अटी आणि शर्ती काय असतील, हे आता भारत ठरवणार.  इथेच खरी रणनीती आणि इतिहासाची पुनरावृत्ती न होण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वावर आहे. त्याबाबत मोदी खूप सक्षम, कणखर व दृष्टे आहेत आणि तितकेच बुद्धिमान  सुद्धा आहेत, यात शंका नाही. इथे एकच उदाहरण देतो, 370 रद्दबादल करताना, त्याला सर्व बाजूंनी कायमस्वरूप...

ऑपरेशन सिंदूर १

दोन दिवसात गुढग्यावर आणले. भारताची शक्ती !!  गेल्या दोन दिवसातील प्रत्यक्ष युद्धाची नुसती चाहूल लागताच आणि भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तराने पाकचं अर्ध कंबरडं मोडल्याचं पहायला मिळत आहे. पण त्यामागे प्रचंड शांत, संयत भारतीय पंतप्रधान मोदींनी, गेल्या दोन दिवसात ज्या प्रकारे शक्ती, युक्ती आणि धडाका चालवला आहे, त्यावरून त्या चेहऱ्यामागे किती गंभीर, गूढ, प्रखर तेज, प्रचंड बुद्धिमत्ता पण तितकाच शांत मेंदू असलेलं व्यक्तित्व लपलेलं आहे, याचा प्रत्यय सुद्धा आता जग घेत आहे. जगातील सर्वात शक्तिमान, बुद्धिमान आणि संयत राजकीय नेतृत्व आज जर कोण असेल तर, ते फक्त आणि फक्त नरेंद्र दामोदरदास मोदी, या मानवी देहातील अद्वितीय व्यक्तीत पहायला मिळेल.  अकरा वर्ष त्या माणसाने इतका संयम ठेवला, तो का ठेवला आणि भारताला आर्थिक, राजकीय, विदेशी, संरक्षण व्यवस्था, या सर्वच क्षेत्रात अशा उंचीवर का नेऊन ठेवलय, याचं उत्तर सध्या गेल्या दोन दिवसात मिळालं असं मी छातीठोकपणे सांगू शकतो. आमच्या पाठिंब्याची, मतांची किंमत या दोनच दिवसात पूर्ण वसूल झाली. बाकी जे मिळालं ते बोनस समजू. अत्यंत शांतपणे मोदीजी आपल्या लक्ष्याच...

आनंद !!

आनंद !!  आपणची आपणास मारिले अन् हे दिव्य तेज पाहिले टाकियली सर्व कर्मे उधळून नामांकुराच्या रोपट्याने  इतकेच करणे राहिले आता की साक्षीभूत प्रभू स्वये  पाहतो नीज रुपास सर्वत्र तैसे आता जाहले आहे  जाणावे काय, कशासाठी कारण ज्यासी जाणावे तो नित्य उभा दिसे पाहताना म्हणून निश्चिंत मीही जाहलो हा मी म्हणजे नव्हे अहम  नव्हे हा भूचाही प्रांत कोणी पाहताना वैकुंठ पतीसी  दिसतो मीच मला क्षणोक्षणी गोकुळ अयोध्या अन् पंढरी काय पहावी वेगळी होवोनी पाहता नीज हृदयी आत्मनी तीच क्षेत्रे दिसती त्रिभुवनी ©® कवी: प्रसन्न आठवले  9049353809 9960762179 २३/०१/२०२५

कालाय तस्मै नमः ३

कालाय तस्मै नमः ३ ©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.   ९. या सर्वात ईश्वराने दिलेली सर्वोच्च देणगी म्हणजे मन. कारण हे मनच माणसाला त्याच्यातील प्राणी या संकल्पने पासून वेगळं करतं. हे मन माणसाला , त्या उच्च कार्यासाठी विचार प्रवृत्त, सक्षम आणि साधक बनवतं. १०. याच मनात देहाशी तादात्म्य पावणारी भावोत्कट वृत्ती, भौतिकता आणि देहापासून परावृत्त होऊन देवापर्यंत जाण्याची साधू वृत्ती मिळवून देते. त्यासाठी या मनाला चिंतनासाठी प्रवृत्त करावं लागतं.  ११. म्हणजेच प्रवृत, आवृत्त, परावृत्त अशा वृत्तीच्या सर्व अवस्था याच मनाच्या माध्यमातून आत्मा साधू शकतो. त्यातच भगवंतांनी स्वतः, आपलं अस्तित्व सांगताना म्हटलं आहे की, इंद्रियांमधे मी मन आहे.  १२. जरी आपण या देहाला संगणक किंवा भ्रमणध्वनी स्वरूप मानलं, तरीही या उपकरणांमध्ये नसलेली, self realisation and self upgradation ची किमया आणि गुणवत्ता, या मन असलेल्या देहात विधात्याने भरून ठेवली आहे.  १३. याच गुणवत्तेला ओळखून, तिला तावून, सुलाखून पुढील मार्गासाठी घेऊन जाणं, हीच प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक जन्माची इतिकर्तव्यता आहे....

कालाय तस्मै नमः २

कालाय तस्मै नमः २ ©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.  मागील लेखातील एक एक उदाहरण पुढे नेऊ. गोलाकार संरचना काळाची सुद्धा असणार, हे आपण सोदाहरण मागील लेखात जाणलं. मुळात या विश्वातील किंवा आपल्या सूर्य मंडळातील सर्व ग्रह वर्तुळाकारच आहेत. कोणत्याही ग्रहाबद्दल कोणतीही शंका किंवा विपरीत माहिती किंवा पुरावा नाही. या गोल आकाराचं इतकं महत्व किंवा मांडणी मी करत आहे कारण, जर काही विशिष्ट कालावधीत कोणत्याही गोष्टीची, गणितीय सूत्राने पुनरावृत्ती घडवायची असेल तर, गोलाकार रचना हेच एकमेव उत्तम परिमाण आहे.  याचा अजून एक अर्थ असा निघतो की, विधाता किंवा नियंता हा किती मोठा गणितज्ञ, खगोलशास्त्री, वैज्ञानिक, तत्ववेत्ता आणि सर्वज्ञ असला पाहिजे. त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, सर्वकाही वर्तुळाकार रचनेत मांडणारा निर्माता, काळ निर्मिती करताना काही चूक करेल हे संभवत नाही. म्हणजेच काळाची रचना सुद्धा वर्तुळाकार आहे, हा निष्कर्ष आपण काढू शकतो.  पण जितकं आकर्षण, कुतूहल, गूढ, उत्सुकता काळ या एका शब्दाबद्दल आहे, तितके क्वचितच कोणत्या शब्दाबद्दल असेल. अर्थात यालाच जोडून येणारा दुसरा भाग म्...

कालाय तस्मै नमः १

कालाय तस्मै नमः १  ©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले. सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने ही एक नवीन लेखमाला लिहायची प्रेरणा प्राप्त होत आहे. यामध्ये विषयाच्या ओघात काय काय येईल, हे फक्त माझे सद्गुरू जाणतात. त्यामुळे जे प्राप्त होईल ते मांडणं, इतकंच माझं काम आहे. ते काम निमूटपणे, प्रामाणिकपणे आणि भक्तिपूर्ण अंतःकरणाने करणं हा माझा धर्म असेल. म्हणून प्रेरणा सद्गुरूंची आणि लेखणी माझी. असो. आज आपण विषयाची ओळख करून घेऊया.  काळाचा महिमा अपरंपार आहे. तो वेद, उपनिषद्, श्रुती, स्मृती, पुराणं, धर्मग्रंथं, संत महंत, लेखक, कवी यांनी अनेक प्रकारे आणि अनेक पद्धतीने मांडला आहे. हा एक असा विषय आहे, जो देह समाप्ती नंतरच अनुभवता येतो आणि एकदा अनुभव घेतला तरी मागे येऊन जगाला सांगता येत नाही. संत महंत, ज्ञानीजन यांनी जे लिहिलं आहे किंवा जे काही आपल्याला अनेक ठिकाणांहून माहीत झालेलं आहे, ते प्रत्यक्षाच्या अत्यल्प प्रमाणात आहे आणि ते त्यांच्या अंतःप्रेरणेचा भाग आहे.  त्याला जाणण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळणं हे महद् भाग्य आहे. याआधी ज्यांना ज्यांना अशी प्...

Spirituality within you -4

Spirituality within you -4  On knowing much on negativity, lets go ahead. 1. Three things need tackled, if one needs to break the negativity layer or to remove the curtain. Will to do so i e WILL, equating mind n brain i.e. CONCENTRATION , creating positive vibrations or vibes i.e. STEP BY STEP TOWARDS AATMASHUDDHI. 2. Initially, one needs to concentrate on the moment, when you get Negativity or you are caught in negative vibrations. Many even don't know or are unaware about the state of own mindset. 3. So utmost important is behaviour study of own mind, thoughts, thinking process, pattern and changes occuring at different times and in situations. 4. It's understanding self, a basic step towards Aatmashuddhi. It is basically the purification of mind.  Lets move one by one a step forward to it.  ©® Prasanna Athavale 9049353809/9960762179 22/02/2024

मनाचिये गुंती, जाणिवांच्या जागृती -१

मनाचिये गुंती, जाणिवांच्या जागृती -१ माणसाचं संपूर्ण आयुष्य, कर्म, फल आणि सर्व व्यवहार हे, मन बुद्धी आणि देहाची वासना ठरवतात. त्यातही सर्वात श्रेष्ठ आणि अग्रस्थानी म्हणजेच नेतृत्व मनच करतं. कारण तोच ड्रायव्हिंग फोर्स असतो, प्रत्येक निर्णयात बुद्धी व देह यांना कार्याला जंपणारा.  म्हणजे मन हे इंद्रिय किती महत्वाचं आहे. याबद्दल अनेकांनी लिहून झालंय. पंचमहाभूत स्वरूपात तत्वांचं देहातील प्रतिनिधित्व बघितलं, तर मन हे आकाश स्वरूप असतं. म्हणजे आकाशाला कसं वारा इकडून तिकडे नेतो. उष्णता एखाद्या भागात जास्त वाढली की, त्याचा ताळमेळ राखायला सृष्टी कर्त्याने अशी व्यवस्थाच निर्माण करून ठेवली आहे की,  त्या ठिकाणी मेघ पाठवून, वातावरण आल्हाददायक करायचं. म्हणजेच जिथे ज्या गोष्टीची कमतरता असेल, तिथे ती गोष्ट पाठवायची आणि जगण्याचं संतुलन आणि ताळमेळ राखायचा. याचाच अर्थ निसर्गाने मूलतः नियम असा केला आहे की, ज्या गोष्टी जिथे गरजेच्या आहेत तिथे त्या निसर्गाला जितकं शक्य आहे तितकं पाठवून, सुव्यवस्था राखणं. मनाच्या बाबत असं घडतं का याबाबत विचार करताना, हे लक्षात येईल की, ज्यावेळी मनात काही आंदोलन होत अ...

Spirituality within you -2

Spirituality within you -2   1. Negative vibrations or Vibes, are highly concetrated at centre. Not only they have gravity force, but are vibrant. Also it has hypnotic effects too. 2. Its hypnotic effect is so forceful that, even the persons standing nearby, do get affected by that force, unless they are independent thinkers..It's like an evil power.  It has tremendous controlling abilities and unimaginable speed too. 3. Most important task, at that moment, is to control effectiveness and efficiency of the force, from taking  control of your entire mindspace.  ©® Prasanna Athavale 9049353809/9960762179 20/02/2024

Spirituality within you -1

Spirituality within you -1  1. Negativity within you, has magnetic efficiency and catche equal amount of negativity, from outside.  2. Scientifically, negative mind is a strong crop to multiply it further. Negative mind is weak, but very strong to make wrong perceptions to cause further decay. 3. So removing negativity, has to be a first goal in itself. Lets learn it step by step, on a regular basis. ©® Prasanna Athavale 9049353809/9960762179

#आत्मचिंतन_बोध भाग १०

#आत्मचिंतन_बोध भाग १० ©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले एका देहात स्थित झालेला हा आत्मा, सहसा, देह सोडून जाण्यास तयार नसतो. किंबहुना कोणताही जीव, अश्या तयारीत सहसा नसतो. त्याला त्या देहातून बाहेर काढणं, ही देखील एक मोठी जिकिरीची प्रक्रिया आहे. याचसाठी मृत्यू या व्यवस्थेची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. एका भुलोकी, (कदाचित या ब्रम्हांडात अनेक भुलोक आणि इतर सप्त लोक असू शकतील), करोडो देहातील एका देहात असलेला आत्मा, काढून न्यायचा. त्याचा हिशोब करायचा आणि त्याला पुन्हा दुसऱ्या देहात, जन्मात, जाण्यासाठी, नेऊन त्या त्या लोकात स्थापित करायचा.ही सर्व व्यवस्था, शतका नुशतके, युगानुयुगे सुरळीत, नियमबद्ध रीतीने सुरू आहे. हाच एक अद्भुत चमत्कार आहे. अगदी संगणकीय भाषेत सांगायचं तर, कृत्रिम बुध्दिमत्ता असलेल्या व्यवस्थे प्रमाणे, सुरू आहे. या सर्व विवेचना वरून, लक्षात आलं असेल की, आपण इथे बसून फक्त या देहात असलेल्या भोग व उपभोग या चक्राचा, स्वतःच्या भाग्य दुर्भाग्य, दुर्दैव याचा विचार करण्यात मग्न असतो.  पण हे करताना, आपण, आपल्याच या आणि पुढील जन्मांची व्यवस्था सुरळीत करतो, की, त्याला अजून समस्येत...