Skip to main content

भोग आणि ईश्वर ३३६

भोग आणि ईश्वर  ३३६ 

वैज्ञानिक पातळीवर माणूस जसजसा प्रगती करत जाईल, तसतसं या ज्ञानाचं महत्व आणि सनातन संस्कृतीत मांडलेल्या शास्त्रीय व वैज्ञानिक गोष्टी किंवा त्याकाळीसुद्धा वापरात असलेल्या अस्त्र, शस्त्र, ज्ञान व विज्ञान यांची  एकत्रित घातलेली सांगड, कर्म, ज्ञान व भक्ती या माध्यमातून ईश्वरी शक्तीपर्यंत पोचण्याच्या साधनांचं व मार्गाचं या भूमीत असलेलं सखोल ज्ञान, नुसतं ज्ञानच नाही तर ते ज्ञान प्रत्यक्षात सिद्ध केलेल्या अनेक विभूती, 

सद्गुरू परंपरेने, हे ज्ञान, युगानुयुगे प्रसारित व प्रवाहित ठेवण्यासाठीची तळमळ व व्यवस्था, त्या व्यवस्थेतील प्रत्येक आत्मा यांचं योगदान हे सर्व बहुमूल्य या भूमीने जपलं याची महती ही वैज्ञानिक प्रगती जशी होत जाईल, तसं अधोरेखित होत जाईल. तरीही या वैज्ञानिक प्रगती नंतरसुद्धा सनातन धर्म, संस्कृती व त्यातील मूल्यांचं महत्व जास्त प्रकर्षाने लक्षात येईल. कारण ऋषीमुनी, गुरुशिष्य परंपरा या माध्यमातून हे ज्ञान विशेषतः या ज्ञानाचं पावित्र्य, सात्विकता जपून व तमोगुणी होण्या पासून व तमाकडे जाण्यापासून, ज्या प्रकारे जपलं गेलं, ते अलौकिक आहे. 

कारण सुर असुर व मानव या तिन्हींना हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी करावं लागणारं जपतप, योगयाग, अष्टांग साधना,नवविधा भक्ती इत्यादी मागील विचारधारा व तत्व व  हे सर्व राबवण्याची कणखर व निःपक्षपाती वृत्ती हे युगानुयुगे जपून, या भूमीने, या कलियुगावर उपकार केले आहेत. कारण विज्ञानाच्या प्रगती बरोबर, त्या ज्ञानाचा अति व गैरवापर हा कालानुरूप वाढतो आहे.  त्यामुळे त्याचं अपरावलंबित्व जास्त उघडपणे जगासमोर येत जातंय. 

त्यातून हे नक्की प्रकर्षाने जाणवतंय की, आपण आत्मनाशाकडे किंवा स्वविनाशाकडे वाटचाल करत आहोत. यातून वाचण्याचा किंवा या सर्व जंजाळात वा गुंत्यात डोकं शांत ठेवून ही अधोगती थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याचा मार्गदेखील, याच ज्ञानातून कर्म ज्ञान भक्ती, ध्यान धारणा, योगसूत्र इत्यादी अनेक मार्गा तूनच मिळू शकतो, हेदेखील जगाला लक्षात आलंय आणि पटायला लागलंय. पटलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत योग, ध्यान धारणा यांना जीवनाचा अविभाज्य भाग बनवून, त्यासह जीवन जगण्याची सुरवात, पाश्चात्यांनी केली आहे. 

या ज्ञानातून, विज्ञानाची सांगड घालत व जे घातक ते त्यागून व इष्ट ते धारण करून पुढे जाण्यातच या जगता सह आपलं कल्याण आहे, हे नक्कीच. म्हणून ऐहिक व शारीरिक सुख व सुखोपभोग हे एका बिंदूनंतर आत्मनाश व विनाश यांच्याकडे नेतात, हे लक्षात आल्यानंतर आणि करोना सारख्या साथीच्या आजारात, मानवी मूल्यांची अधोगती आणि त्याचवेळी या मूल्यांची केली जाणारी  जपणूक, ही दोन्ही विरुद्धार्थी दृश्य जगासाठी प्रेरणादायी आहेत. 

परंतु या सर्वांमागची प्रेरक शक्ती सुजन व सज्जन गोष्टींसाठी सूर वा देव शक्तीची आणि वाईट, दुर्जन व दुष्ट भावनांमागची प्रेरणा असुर शक्तीची आहे आणि असेल, हे नक्कीच. मायेच्या प्रभावा तून व त्या माध्यमातून या दोन्ही शक्ती जगतात,आपापला उद्देश्य सध्या करू इच्छितात. माणूस हा या शक्तीतील एकाचा हस्तक बनून, त्यातून भरडला वा उपयोगी आणला जातो.  पण यातून थोडा स्वार्थ साधून आत्मोन्नती साधण्यासाठी या संघर्षाचा उपयोग करत गेल्यास किंवा करून घेत गेल्यास, जन्मोजन्मी करावा लागणारा कर्मांचा आटापिटा निश्चित संपेल. 

यावर विवेचन अजूनही अपूर्ण आहे, ते उद्याच्या भागात सुरू करू. तोपर्यंत आपल्या साधनेचा मार्ग कसा प्रशस्त व सुलभ होईल, हे आपणच पाहिलं पाहिजे, म्हणून नाममार्गात राहण्याचा प्रयत्न सुरूच ठेवूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...