Skip to main content

भोग आणि ईश्वर ३३४

भोग आणि ईश्वर  ३३४ 

या विश्वाची चैतन्यशक्ती ही खरतर एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक, दोन्ही दृष्टीने सत्य आहे. अध्यात्मिक या दृष्टीने की, आत्मा या चिरंतन अस्तित्व असलेल्या,अंशाला आपल्यामधून या जगतात धाडून,त्याद्वारे या विश्वाचा पसारा,खेळ चालवून आपल्या संकल्पनेतील व श्वासा तील साकारलेले विश्व, सतत चैतन्यमय ठेवून, कर्म, संचित व कर्म अश्या साखळीत त्या विश्वाला व विश्वातील अनुरेणूंना बांधून ठेवलं आहे. त्याद्वारे जगतातील आपल्या अस्तित्वाची निरंतर आठवण, प्रत्येक जीवाला, विशेषतः मानवाला रहावी, याची व्यवस्था केली. 

त्यातही माया, मोह, लोभ, काम, क्रोध, मत्सर इत्यादी व्यवधानं निर्माण करून, जीवाला जगण्याची प्रेरणा व आत्मचिंतानाची व्यवस्था केली आहे. खरतर जशी परीक्षेच्या माध्यमातून विद्या संपादन व वृद्धी केली जाते आणि त्यायोगे प्रगती साधली जाते. त्याचप्रमाणे या षड्रिपूंच्या माध्यमातून, प्रत्येक मानवी जीवाला आत्मोन्नत्ती करण्याची सूत्रबद्ध योजना, तयार करून दिली आणि त्यातून प्रत्येक मानवी आत्म्याची, या देहातून गती, प्रगती व उन्नती साधून, अंतिम मोक्षाची वाट मिळावी, याची काळजी घेतली आहे. बर हे सर्व करत असताना,अनेक माध्यमातून,या जीवाला मार्गदर्शन,सहाय्य करत राहण्याची काळजीसुद्धा तीच मूलशक्ती घेते. 

सद्गुरुतत्व हे त्यातील खूप मोठं भांडवल, विधात्याने आत्म वंचितांना, प्राप्त करून दिलं आहे. एकप्रकारे हा अमृतयोग व अमृतकुंभ जगासमोर ठेवून, अध्यात्मिक प्राप्तीची, मोक्षाच्या मार्गाची पूर्ण व्यवस्था मानवी देहात स्थित आत्म्याच्या हाती, एखाद्या गुरुकिल्लीसम, दिली आहे. म्हणजे अध्यात्मिक प्रगती साठी,योग्य ज्ञान, साधनेचे नवविधा मार्ग, नित्य आत्म चक्षूंना दिसतील व मनाद्वारे, बुद्धी व देह यांना प्रेरित करत राहतील, याची सुद्धा पूर्ण योजना मांडून, युगानुयुगे कार्यान्वित राहील, याची काळजी घेतली आहे. 

प्रत्येक भक्तिमार्गात ज्ञानी, मुमुक्षु, प्रेरक, संत महंत यां रूपातून गुरुशिष्य व्यवस्था सतत संतत राहील, हे वेळो वेळी पाहिलं आहे. त्यासाठी या परीक्षेतून उत्तमरीत्या उत्तीर्ण झालेलेच विद्यार्थी, पुढे गुरुरूपात, जगापुढे येऊन, एकप्रकारे ज्ञान भक्ती व कर्म यांच्या साठी भुकेल्या व व्याकुळलेल्या पतितांना आत्मउद्धाराची प्रेरणा देत राहतात. हे सर्व चक्रनेमिक्रमाने होत आहे. युगानुयुगे यात खंड नाही. 

आता ही सर्व व्यवस्था आध्यात्मिक पातळीवर केली असली तरीही, यातील सुत्रबद्धता, अंतरीक्षांतील किंवा समस्त ब्रह्मांडा तील अनुरेणूंना एका नियमात बांधून, चुंबकीय शक्ती, गुरुत्वा कर्षण शक्ती, तेज, अग्नी, या सर्वांची शास्त्रीय बैठक, ग्रहतारे यांची स्थानं, भ्रमण व्यवस्था, त्यांच्यातील अंतराचा ताळमेळ, यांच्या केंद्रकात विशेषतः पृथ्वीसह अनेक ग्रहांच्या केंद्रकात प्रचंड प्रमाणात असलेली उर्जाशक्ती, यासर्वांना तारक व संप्रेरक, सुर्यासम अलौकिक शक्ती, ऊर्जा असलेला तारा,हे सर्व वैज्ञानिक जग निर्माण केलं, जे अद्भुत आहे. 

त्या दृष्टीने पाहिलं तरी एक गोष्ट निश्चित मान्य करावीच लागेल की, जे नियम, ज्ञान व विशेष ज्ञान म्हणजेच विज्ञान यातील काही भाग जाणायला, आधुनिक मानवाला हजारो वर्षे लागली, ते विज्ञान ज्याने निर्माण करून, स्वयंचलित व्यवस्थेने सुत्रबद्ध तेने संचालित राहील, यासाठी योग्य ती ऊर्जा, शक्ती निर्माण करून, ती करोडो वर्ष विनातक्रार, विनासमस्या कार्यरत राहील, हे पाहिलं, तो स्वतः किती मोठा वैज्ञानिक आहे. 

कारण बीजनिर्मिती, विर्यनिर्मिती या दोन गोष्टी निर्माण करून, देहाच्या व वृक्षांच्या माध्यमातून, हे जग आपोआप चालत राहील, हे निर्मिलं. एका रोपापासून अगणित फळं फुलं निर्माण होण्याची आणि एका देहापासून अनेक देह निर्माण करण्याची क्षमता, विधात्याच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय घडत राहील, ही खूप मोठी वैज्ञानिक उपलब्धी आहे. आज विज्ञानाने, आपल्याला, सर्व गोष्टी कळत आहेत. 

पण त्याकाळी माणूस हे सर्व जाणतही नव्हता, त्यावेळी, म्हणजे अगणित युगांपूर्वी हा सुरू केलेला खेळ व या खेळाचा पसारा ज्याने वैज्ञानिक दृष्टीने निर्माण केला, त्याच्या शक्तीची फक्त कल्पनासुद्धा रोमांचित करणारी आहे. खरतर त्याला ओळखायला, जाणायला, पुजायला ही एवढीच एक गोष्टसुद्धा पुरेशी आहे. वास्तविक, आपण काल कैलासवरील शक्तिकेंद्र अर्थात मुख्य ऊर्जा व शक्तीचं sub station यावर बोलत होतो. पण यामागील मुख्य शक्तीस्रोत व त्याची किमया जाणणं आवश्यक आहे. यासाठीच हे सर्व विस्तृतपणे मांडलं. 

आता हे सर्व वाचल्या नंतर या एवढ्या ब्रह्मांडातील पसाऱ्यात वा जडजंजाळात, मी किती अणूहून सूक्ष्म आहे, हे जाणवेल आणि तरीही या प्रत्येक सुक्ष्मातील सूक्ष्म कणाला, अर्थात सजीव व निर्जीव यांना, जो लक्षपूर्वक पाहतो, त्याची शक्ती किती अपरिमित असेल. त्या अपरिमित शक्तीच्या फक्त एका त्रिमिती जगात आपण आहोत. म्हणजे बाकीच्या मिती कशा असतील, हे कल्पनेच्याही पलीकडील आहे. तरीही त्याच्या व्यवस्थेची पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. म्हणूनच उद्या आपला sub station चा विषय पुढे नेऊ. तोपर्यंत आपण, ज्याच्या बळावर इथे आहोत, त्या चिन्मय शक्तीचं स्मरण करत राहू. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३०/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...