Skip to main content

भोग आणि ईश्वर २४०

भोग आणि ईश्वर  २४०

काल आपण पाहिलं की, विशाल विश्वरूप ईश्वराच्या सुक्ष्मरूपातील नामाच्या द्वारे,  त्या विशाल ईश्वराला  प्राप्त करताना, सतत, एकाग्रतेने, एकतानतेने, त्याच्या नामाचा उच्चार करत गेल्यास, विशालरूप ईश्वराची प्राप्ती, अर्थात त्या विशाल ईश्वराची फाईल उघडू शकतो, ज्याप्रमाणें झिप फाईल अनझीप करू शकतो त्याप्रमाणे. आता यात एकच प्रश्न येतो की सतत व एकाग्रतेने का नाम घ्यायचं.

मुळात एक लक्षात घ्या की कोणताही प्रोग्रॅम वा सॉफ्ट वेअर संगणकावर सुरू असताना, विजेचा पुरवठा अर्थात ऊर्जा, तो प्रोग्रॅम सुरू असेपर्यंत असणं गरजेच असतं. त्याचप्रमाणे जर ते सॉफ्टवेअर सुरू असताना इतर फाईल्स उघडलेल्या असतील तर, त्या सॉफ्टवेअरच्या कार्याला मर्यादा येतात. त्याशिवाय जर त्या सॉफ्टवेअर चालवायला जास्त स्पेस अर्थात रॅम किंवा कार्यपटल म्हणूया, लागणार असेल तर, इतर प्रोग्रॅम्स वा आज्ञावली या तात्पुरते बंद ठेवावे लागतात. 

म्हणजेच जर एखादा प्रोग्रॅम अतिविशाल व जास्त वेळ घेणारा असेल तर, संगणकतज्ञसुदधा इतर फाईल्स उघडायला मज्जाव करतो किंवा तसे केल्यास अकार्यक्षम होतो किंवा वेगावर मर्यादा येतात. मग अंदाज घ्या, नामाच्या झिप फाईलमधून विशालरूप ईश्वराच्या फाईलला हृदयातील आत्ममंदिरात उतरवून अर्थात डाउनलोड करताना, जर इतर प्रोग्रॅम्स, मनाच्या रॅमवर अर्थात कार्यपटलावर चालू असतील तर आधीच विशाल असलेल्या ईश्वराला, नाम या सुक्ष्मरूपातील फाईलवरून प्राप्त करणं किती कठीण होत असेल. 

म्हणजे संगणकतज्ञ सांगतो त्याप्रमाणे जर एखादा मोठा प्रोग्रॅम वा सॉफ्टवेअर वा आज्ञावली सुरू असेल तर, इतर सॉफ्टवेअर आणि हे मोठं सॉफ्टवेअर यामध्ये कार्यपटल अर्थात रॅम व ऊर्जा अर्थात त्या संगणकातील चैतन्य विभागलं जाऊन, त्या संगणकाची कार्यक्षमता मर्यादित होते व कधी कधी संगणक आपोआप पुन्हा सुरू होतो, अर्थात रेस्टार्ट होतो. 

मागे आपण बघितलं त्याप्रमाणे मानव हा ईश्वरनिर्मित एक सुपर कॉम्प्युटर अर्थात महत्तम संगणक आहे. याची निर्मिती आत्मरूपातील ईश्वरांशाला परम रूपातील पूर्णांशामध्ये संमिलीत अर्थात merge करणं यासाठी झाली आहे आणि हेच आपलं अंतिम उद्देश आहे. त्यासाठीच ईश्वरनामाच्या सतत एकाग्र व शुद्धचित्त स्मरणाच्याद्वारे ही संमिलीत करण्याची प्रक्रिया साध्य करता येते. 

म्हणजे हा देहरुप संगणक वापरून आत्मरुप चैतन्याला परम संगणकाशी जोडायला दिलेलं तंत्र, नाम नावाच्या एका सूक्ष्म आज्ञावलीत गुह्यरूपात बांधून, त्या सततच्या स्मरणाने, आपल्या मनःपटलावर स्थापित करून घेण्या साठी हा देह प्राप्त झाला आहे. हे संमिलन साधणं हाच या देशप्राप्तीचा मुख्य उद्देश आहे. कारण कोणतंही कार्य करायला संगणक, आंतरजाल अर्थात नेट, ऊर्जा यांची जरुरी असते, त्याप्रमाणे या देहाला ईश्वररूप परम संगणकाशी जोडायला पुरेश्या एकाग्रतेने नामरूप आज्ञावली चालवणं गरजेचं आहे.

हेच सर्वात मोठं गुह्य आहे. जे वेदांपासून आतापर्यंत अनेक तज्ञानी वेगवेगळ्या परिभाषेत अर्थात आज्ञावलीत सांगून ठेवलं आहे. पण हे विसरून,  यासर्वांमध्ये आपण संसार, इच्छा, आकांक्षा, वासना, त्याचं कर्म यामध्ये या देहाला गुंतवून, मुख्य आज्ञावली चालवायची विसरून जातो.  यामार्गाने आपण आपलं निहित कार्य लक्ष जन्म पुढे ढकलतो आणि लक्षप्राप्ती अशक्य वा दुष्प्राप्य करतो. हे म्हणजे कसं झालंय की, आपण संगणकावर एखाद्या कामासाठी बसलो आहोत. पण ते विसरून आपण खेळ खेळण्यात वेळ घालवतो आणि ज्या कामासाठी आपण संगणक सुरू केला, ते पार विसरून जातो. 

तोपर्यंत तो संगणक नादुरुस्त होतो आणि पुन्हा  संगणक निकामी करून, दुसरा संगणक घेतो. त्याही संगणकावर तेच करतो. असे अनेक देहरुप संगणक बदलत बदलत इथपर्यंत आलो आहोत. आता हीच प्रक्रिया किंवा हेच कार्य अजून किती संगणकात करायचं आणि किती संगणक बदलायचे ते आपणच ठरवू शकतो. पण यामध्ये एक मदत वा सहाय्याची व्यवस्था, आपल्याला ईश्वराने करून ठेवली आहे. काय ती व्यवस्था यावर उद्या विचार करूया. 

पण तोपर्यंत ईश्वराच्या समीप जाण्यासाठीचा राजमार्ग असलेलं नाम, नित्य घ्या आणि ईश्वराशी संमिलीत होण्याच्या मार्गात पुढे रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...