Skip to main content

नवरात्री २०१९ माळ १

नवरात्री २०१९ निमित्त नऊ काव्य माळांचा संकल्प.आज प्रथम माळ. आई शैलपुत्री कथा आणि स्तुतिगीत.

वन्दे वांच्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम्‌ ।
वृषारूढ़ां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्‌ ॥

आई शैलपुत्री हे नवरात्रात पुजले जाणारे देवीचे प्रथम रूप।आहे. देवीचं वाहन वृषभ आहे. म्हणूनच देवीला वृषारूढा या नावाने देखील ओळखतात. देवीच्या उजव्या हातात त्रिशुळ व डाव्या हातात कमळ आहे. याची कथा थोडक्यात अशी.

एकदा दक्ष प्रजापती यांनी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यावेळी समस्त देवी देवता यांना पाचारण केले. परंतु भगवान शंकर व देवी सती यांना बोलवण्यात आलं नाही. देवी सतीची इच्छा होती की आपल्या माहेरी संपन्न होत असलेल्या या यज्ञात सहभागी व्हावं. शिवानी तिला समजावून पाहिलं. पण तिची तीव्र इच्छा पाहून जाण्याची अनुमती दिली.

अर्थातच भगवान शिवशंकरांनी म्हटल्या प्रमाणे तिथे देवी सतीचं स्वागत न होता अपमान मात्र झाला. तिच्यासह पती भगवान शंकर यांचा देखील अपमान झाला जो देवीला सहन झाला नाही आणि क्रोधवश योगाग्नी निर्माण  करून त्यात देवीने उडी घेऊन स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केलं.

अर्थातच भगवान शंकरांनी ही वार्ता कानी येताच प्रजापतीच्या यज्ञात जाऊन यज्ञाचा विध्वंस केला. हीच सती नंतर हिमालयाच्या घरी जन्म घेऊन शैलपुत्री नावाने प्रसिद्ध झाली. देवी साक्षात शक्तीचं रूप म्हणून ओळखली जाते. देवी शैलपुत्रीची कथा वाचल्यानंतर देवीच्या प्रार्थनेस्तव एक रचना नवरात्रातील पहिली माळ.

आई शैलपुत्री देवी तुझी आरती करतो
पावसी तू भक्तालागीं गुणगान मी करतो

भक्त गांजलेत फार
कष्ट जाहले अपार
कलियुगी आई थोर
तुझा महिमा अपार
तुझ्या कृपेसाठी आई नऊ रात्री जागवतो
आई शैलपुत्री देवी तुझी आरती करतो

तुझे रूप हे अद्भुत
दैत्य होती भयभीत
त्रिशुळ तुझे हातात
दुष्ट शक्ती दूर जात
खल रणी तू मारसी हे ब्रीद मी जाणतो
आई शैलपुत्री देवी तुझी आरती करतो

तू अष्टसिद्धी दायी
या लेकरांची आई
भक्तांचे दुःख पाही
निवारणा धावून येई
नवरात्री नऊ माळा आज सुरू मी करतो
आई शैलपुत्री देवी तुझी आरती करतो

प्रसन्न होसी तू देवी
चिंतामणीसुत विनवी
आठवले शब्द ठेवी
गोड मानून यश दावी
सिद्धी कार्या नेसी, शुद्ध भावे मी भजतो
आई शैलपुत्री देवी तुझी आरती करतो

©® कवी : प्रसन्न आठवले
२९/०९/२०१९
माळ प्रथम अर्पण !!!  🚩🚩🚩🌷🌷🌷

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...