Skip to main content

काश्मीर भाग २

दुसरा सरदार पटेल अर्थात गृहमंत्री श्री अमितभाई शाह अर्थात मोटाभाई - भाग २ पुढे

४. योग्य माणसांची साथ. इथे मोदीजी, अमितभाई, डोवाल यांच्याबरोबर एक नाव जोडावं लागेल, ते म्हणजे काश्मीरचे मुख्य सचिव श्री सुब्रमण्यम,  ज्यांनी या मोहिमेच्या तयारीत डोवाल व मोदीजी यांना गेले वर्षभर साथ दिली. या व्यतिरिक्त सर्व अनामिक माणसं ज्यांनी हे इप्सित साध्य व्हावं म्हणून आपली आपली कामं चोख बजावली, ती सर्व शाब्बासकीस पात्र आहेत.

यात काही नाव वा संस्था मुद्दाम अनुल्लेखित आहेत. कारण त्या नेहमी गुप्तस्वरूपी कार्यरत असतात किंबहुना तो त्यांच्या कामाचाच एक भाग असतो. तरीही त्यांचं कर्तव्य स्तुत्यच आहे.

५. पुढला मुद्दा जो मी पहिल्या भागात लिहिला होता तो म्हणजे वरच्या व्यक्तीचा वरदहस्त. याबाबत आपण खर तर बोलायला सक्षम नाही. कारण वरची व्यक्ती म्हणजेच नमो. त्यांचा विश्वास मिळवणं हे सात नव्हे कित्येक जन्मांच्या पुण्याईचं फल आहे वा असेल आणि ते त्या दोघांनाच माहीत. सर्जिकल स्राईकच्या वेळी आणि एअर स्राईकच्या वेळी मुख्यतः अजित डोवाल सर्व सूत्र सांभाळत होते. हाताशी काही मोजकी विश्वासू माणसं होती.

दोन्ही वेळी एखादी बारीकशी चूक घातक तर ठरली असतीच पण जी बदनामी झाली असती त्यात मुख्य नाव मोदींजींचं गेलं असतं. हे सर्व माहीत असून १००% यशस्वी कार्य करायला अनेक गुण संबंधित व्यक्तीच्या अंगी असलेच पाहिजेत. अश्या काटेकोर मशीन प्रमाणे कार्यक्षमता असलेली माणसं हेरून त्यांना बांधून ठेवून त्यांना कार्य प्रेरणा देणं, कार्य सोपवणं  हेच मोदींजींचं मुख्य यश आहे. काय जादू त्या माणसात आहे माहीत नाही, पण एकदा जोडलेली माणसं आयुष्य उधळून  देण्यास तयार असतात. हे दैवदुर्लभ आहे. अशी माणसं छत्रपती शिवाजी महाराज यांना लाभली. 

अर्थात मी यात कोणत्याही प्रकारे मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत नाही. मी फक्त साथ देणाऱ्या माणसांच्या अंतःप्रेरणेबद्दल बोलतोय. कारण महाराज हे एक अलौकिक,  एकमेव आणि अद्वितीय व्यक्तित्व होते, हे नक्कीच. पण मुद्दा इतकाच अशी माणसं मिळणं हे अलौकिक आणि दैवी आहे. या ३७० प्रकरणात पडद्यामागे अमितभाई आधीपासूनच असतील. फक्त अधिकृतपणे यात ते अर्थातच ३० मे, २०१९ , नंतर आले. पण इतक्या कमी वेळात  अधिकार वापरून व जमलेल्या माणसांमधून उत्तम सहकारी निवडून त्यांच्याकडून तितकंच उत्तम काम करून त्यांना प्रोत्साहित करणं व आत्मविश्वास देत राहणं, हे एका उत्तम नेत्याचं वा सेनानायकाचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये अर्थातच मोदींजींइतकेचं अमितभाई हे देखील वाकबगार आहेत.

पण तरीही मोदींचा एक प्रमुख म्हणून आणि वरिष्ठ म्हणून मागे पाठिंब्याचा भक्कम हात असणं हे अहोभाग्य अमित भाईचं. यात अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. वरिष्ठ म्हणून कनिष्ठ माणसांवर असलेला विश्वास, याआधी मोदींजीं साठी , पक्षासाठी अमितभाईनी केलेली कामं, यशस्वीपणे पार पडलेल्या मोहिमा , ज्यात अमितभाईची कार्य कुशलता पदोपदी मोदींना जाणवली असेल, त्यांची दीर्घकाळ असलेली मैत्री , त्या मैत्रीतून निर्माण झालेला एकमेकांवरचा सार्थ विश्वास , दोघांची जमलेली वेव्हलेंथ, या साऱ्यातून देशहितासाठी हे अत्युच्च महत्वाचं काम निर्विघ्नपणे , तितक्याच हुशारीने आणि सर्वात महत्वाचं गुप्तपणे करणं हे अमितभाईसारखा वजीरच करू शकेल , हा मोदींचा असलेला विश्वास, अमितभाईनी सार्थ ठरवला.

यात एक मुद्दा मुद्दाम मांडतो. अश्या प्रकारच्या कार्याला लागणारी कुशलता, नियोजन व गुप्तता फक्त आणि फक्त संघाच्या मुशीतून तयार झालेली माणसंच करू शकतात. याचं अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे सुनीलजी देवधर यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला त्रिपुरा विजय आणि पश्चिम बंगालमधील अभूतपूर्व यश. संघशक्ती युगे युगे.

खरतर हा विषय दोनच भागात संपवायचा होता पण विस्तारपूर्वक सांगताना लेखन वाढत गेलं, म्हणून अजून काही बाबी, अमितभाईशी निगडित,  पुढील भागात बघूया.

भाग २ समाप्त
© लेखक : प्रसन्न आठवले
०७/०८/२०१९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...