Skip to main content

जाणिवा, चेतना, संवेदना, साद व प्रतिसाद. २

जाणिवा, चेतना, संवेदना, साद व प्रतिसाद. २

म्हणजे आता सांगा की इथे सवय मनाला जडली की शरीराला.

घोळ आहे ना ?

आता थोडं वेगळं उदाहरण घेऊ कदाचित कळेल वा घोळ वाढेलसुद्धा. आपली तंद्री लागलेली असते आणि अचानक वीज चमकते वा कोणीतरी हाक मारतं अथवा कसलीतरी चाहूल लागते आणि तंद्री भंगते. पण ती भंगताना कधी कधी आपण दचकतो. तुम्ही म्हणाल झोपेतसुद्धा आपण स्वप्नातून जागे होतो दचकून. मग यात काय

सांगतो. झोपेत असताना  पूर्णतः शरीर स्थिर असतं , मन स्थिर असतं आणि अंतर्मन वा सुप्तमन जाग असतं. ह्या स्थितीत अस म्हणतात की आत्मा हा चाहुबाजूचा कानोसा घेण्यासाठी भटकत असतो  ज्यामुळे शरीराचा ताबा अंतर्मनाकडे असतो. म्हणजेच बहिर्मन अंतर्मनाच्या कब्जात असतो. परिणामी दिवसभरात वा आतापर्यंतच्या आयुष्यात घडलेल्या अनेकानेक गोष्टींची जणू उजळणी अंतर्मन करत असतं.

याच प्रक्रियेत सुप्तमन ही चाळवाचाळव वा स्मरणातील फाइल्स तपासत असताना काही वेळा त्या आठवणी वा आठवणींचा गुंता रिवाइंड वा पुनर्प्रक्षेपीत केला जातो. बहुदा याच दरम्यान बरीच स्वप्न पडतात. त्यातील बरीचशी सुप्तावस्थेत पडलेली असल्यामुळे पुनः फाइलबंद केली जातात म्हणून आपल्याला कळत नाहीत वा आठवत नाहीत. खूपवेळा आपल्याला एखादी गोष्ट पाहिल्याचं आठवतं पण कुठे ते मात्र स्मरत नाही, ते याचमुळे असावं.

हे सुप्तमनाचं गणित उलगडण हे कठीण आहे. आणि ते उलगडण्याचा प्रयत्न आधुनिक नव्हे तर पुराणकाळापासून सुरू आहे. आपल्या मनाला बांध घालुन वळवणं वा ताब्यात ठेवणं हे अनेकदा करून पाहिलं तरी जमत नाही. कारण ते काबूत ठेवू म्हणून ठेवता येत नाही. त्याला काही सवयी जाणून बुजून लावाव्या लागतात.

यामध्ये खूप मोठं योगदान समर्थ रामदास स्वामी यांचं आहे. जे आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही वा जाणवत नाही. मनाला चुचकारण्याचे, लगाम घालण्याचे , प्रेमपूर्वक समजावण्याचे, प्रसंगी धाक दाखवून कुंपण घालण्याचे अनेकानेक प्रकार शब्दा शब्दात त्यांनी मांडलेत. याबद्दल त्यांचे खरतर समस्त मराठी माणसांनी शत शत ऋणी असलं पाहिजे.

आशा, निराशा, प्रेम, वात्सल्य, सकारात्मकता, नकारात्मकता, आक्रमकता, अश्या अनेक परिस्थितीत मनाला कसं मार्गावर ठेवायचं याचा जणू नकाशाच त्यांनी शब्दात मांडलाय. यावर एक स्वतंत्र लेखमाला होऊ शकेल, बघूया सद्गुरुकृपेने शक्य झाल्यास नक्की लिहीन.

असो, थोडं विषयांतर झालं. पण मुख्य मुद्दा सुप्त मनाचं हे कोडं आहे खरं खूप अवघड. ते नक्की आत म्हणजे कुठे दडलेलं असतं आणि नेमकं कोणत्यावेळी कसं काम करतं. बघूया.

© संकल्पना व लेखक : प्रसन्न आठवले.
०५/०५/२०१९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...