Skip to main content

जानकी पुनःवनवास ९९

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ९९

" ऐक. खुप पूर्वी सत्ययुगात एक राजा नृग होऊन गेला. तो चक्रवर्ती सम्राट होता. तो स्वतः लोकांच्या तक्रारी ऐकून न्यायनिवाडा करत असे. त्याने एकदा महायज्ञ करून हजारों लोकांना गायी  , अन्न, वस्त्र व अलंकार दान केले. त्या दान केलेल्या गाईमधे एक गाय एका विप्राची होती. ती गाय चुकुन दुसऱ्या एका विप्रवराला दान करण्यात आली.

ज्या विप्रवराची ती गाय होती तो विप्रवर आपल्या गाईला शोधू लागला. अनेक गाव पालथी घालुन शेवटी तो हरिद्वार मधे पोचला. तिथे त्याला आपली गाय दिसली. त्या गाईचे वासरू सुद्धा तिच्यासोबतच होते. त्याने आपल्या गाईचे नाव शबरी ठेवले होते. त्याने त्याच नावाने गाईला हाक मारताच दावा उखडून ती गाय वासरासहित त्या विप्राजवळ आली.

इकडे ज्या विप्राला ती गाय दान दिली होती, तो विप्रहि गायी मागोमाग धावत आला आणि मग दोघांच्यात वाद सुरु झाल. तंटा विकोपाला गेल्यावर एकमताने दोघानी ठरवलं की राजा नृग याकडे जाऊन,  आपले गार्हाणे राजाला सांगुया आणि राजा जो निर्णय देईल तो दोघानीही मान्य करूया.

त्याप्रमाणे दोघही राजाकडे पोचले. पण तिथे गेल्यावर समजले की राजा बाहेर गेला आहे आणि पर्यायी व्यवस्था काही नाही. दोघानीही खुप दिवस राजाची वाट पाहिली आणि अनेक दिवस राजा न आल्यामुळे रागाने दोघानीही राजा नृग याला शाप दिला की, हे नृग राजा तू आमच्या तक्रारीकडे  बघण्यास देखील आला नाहीस, या तुझ्या उद्दामपणाबद्दल तुला शाप देतो की, तू सरडा होऊन एका गुहेत वास करून राहशील आणि द्वापारयुगात भगवान जगन्नाथ जेंव्हा श्रीकॄष्ण रुपात अवतार घेतील तेंव्हा त्यांच्यां योगे तुझी या शापातून मुक्तता होईल.

अश्या तर्हेने शाप देऊन दोन्ही विप्रानी ती गाय एका गरजु विप्रास दान केली आणि आपापल्या गृही परत गेले. इकडे राजाला आल्यावर शापाची कथा समजल्यानन्तर राजा खुप दुःखी झाला आणि आपल्या पुत्रास राज्यावर बसवून तो बांधून घेतलेल्या एका गुहेत शाप भोगण्यास्तव निघून गेला. म्हणून लक्ष्मणा राजाला लोक हिताची नेहमी पर्वा केलीच पाहिजे अन्यथा प्रारब्धी नरकवास येतो. "

इतक सांगून प्रभुनी लक्ष्मणाला राजसभेतील कामकाज बघून कोणी तक्रारदार आहे का याच्या चौकशीसाठी पुढे धाडले. राज्यकारभार सुराळीतपणे सुरु झाला. हॄदयातील दुःख बाजूला ठेवून प्रभुनी कामात लक्ष द्यायचे ठरवले. त्याचप्रमाणे माता जानकिचा त्याग केल्यापासून ऊंची पलंगावरील निद्रा सोडून प्रभू भूमिवर निद्रा करू लागले.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...