Skip to main content

जानकी पुनःवनवास ९

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ९

आता ती घटिका समीप आली आहे. आणि त्या समयाला प्रभुंचे आगमन झाले नाही तर मी अग्निप्रवेश करीन असा माझानिश्चय सुद्धा त्याना ज्ञात आहे. परंतु माझा माझ्यापेक्षा प्रभु वचनावर अधिक विश्वास व दॄढ श्रद्धा आहे"

"भ्राता असा एकहि  क्षण गेला नाही गेल्या चौदा वर्षात की प्रभुना आपली आठवण नाही. किंबहुना समस्त विश्वात त्यांची आपल्यावर माया जास्त आहे. आणि तसे भ्राता लक्ष्मण विनोदाने चिडवतात देखील त्याना"

"ख़र सांगतोस श्रेष्ठ भक्ता हनुमंता"

"प्रभुकृपेने मिथ्या वचन मी कधीही करत नाही अगदी प्रत्यक्ष रावणासमोर सुद्धा नाही. हेच पूर्ण सत्य आहे भ्राताश्री. आणि त्यांच्याच आग्रहानुसार मी त्यांचा एक दूत बनून त्यांचा निरोप घेऊन आलो आहे"

" हनुमंता क़ाय आहे तो निरोप. माझे सारे प्राण कर्णात आणून मी ऐकण्यास अधीर आहे."

" त्यांचा सांगावा असा आहे की प्रभु लंकेहुन प्रस्थान ठेवते झालेत आणि अतिशीघ्र  त्यांचे अयोध्येत आगमन होईल. म्हणुन अग्निची नव्हे तर सुस्वागताची तयारी करा. "

" हनुमन्ता आज माझ्या हर्षाला सीमा नाही आज तू प्रत्यक्ष पृथ्वीसह तिन्ही लोकांच राज्य मागितलस तरीही ते देवेंद्राकडून जिंकून तुला देईन. तू फक्त सांग क़ाय हवय , फक्त मागणी कर, हा भरत प्राणाचीही पर्वा न करता ते पूर्ण करेल अगदी क्षणाचाहि विलंब न करता"

" भ्राता आपल्या आनंदाची कल्पना माझ्याव्यतिरिक्त अन्य कोण करू जाणे. परन्तु आपल्या हर्षापेक्षा आणि आनंदाश्रुव्यतिरिक्त मला काहीही नकोय. तेवढे अश्रु या दासाच्या ओंजळीत द्या. त्यातील रामनाम मी हॄदयात जपून ठेविन"

या क्षणी भ्राता भरत साश्रु नयनानी हनुमंताच्या पायावर आपले मस्तक ठेवून म्हणतो, "आज उमगले की श्रीराम तुला सर्वश्रेष्ठ भक्त का संबोधतात. अरे ज्याला या जगात नव्हे समस्त ब्रह्याण्डामधे फक्त श्रीराम दिसतात तो श्रेष्ठ भक्तच असु शकतो"

हनुमंत मात्र या सर्व स्तुतिपासुन अलिप्त राहून भ्राता भरताला पुढील तयारी करण्यासाठी प्रव्रुत्त करतो. भरत त्वरित आज्ञा देता जहाला

"सर्व राज्यात गुढया तोरणे उभारा, मंगल वादये वाजुद्या, हर्षोल्हास करा , नृत्य गायन होऊ द्या. प्रभुंच्या आगमनासाठी काहीही कमतरता राहता कामा नये. आणि अयोध्येत श्रीराम आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली.

आता प्रतीक्षा प्रभुश्रीराम यांच्या आगमनाची ,  राजप्रासादाला, सर्व रघुवंशाला, राज्याला, समस्त प्रजाजनाना, समस्त ब्रम्हाण्डाला आणि तुम्हा आम्हा सर्वानाच.

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
२७/०१/२०१८

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...