Skip to main content

जानकी पुनःवनवास ७

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ७

या सर्व तयारी पासून दूर लंकेला प्रभुंची निघण्याची लगबग आणि विभिषणासह सर्व लंका वासियांचा निरोप घेऊन प्रभु स्वतः देवी जानकी , जाम्बुवन्त, सुग्रीव, यासह निवडक वानर सेना घेऊन पुष्पक विमान निघणार हे निश्चित झाल. हनुमंताना प्रभुंच्या आगमनाची सुवार्ता घेऊन अग्रदूत म्हणून पुढे धाडण्यात आल होत. ही काळजी प्रभुनी घेतली होती कारण दंडकारण्यात भरत भेटिवेळी प्रभुंकडून २ मुख्य वचन बन्धु भरताने मागून घेतली होती. एक प्रभुंच्या पादुका ज्या सिंहासनावर ठेवून भरत प्रतिनिधि म्हणून राज्य करणार होता आणि दूसर १४ वर्ष संपण्याच्या दिवशीच प्रभुनी भरताला परतून येण्याच वचन दिलेल असत. आणि यात एक पळे जरी उशीर झाला तर भरत अग्निप्रवेश करून  देहत्याग करेल. आणि प्रभु जसे वचनाचे पक्के तसच भ्राता भरत सुद्धा शब्दनिष्ठ .

यास्तव प्रभु धास्तावले होते आणि निघण्याची लगबग सुरु होती. माता सीता समस्त अयोध्यावासी आणि तिनहि माताना भेटण्यास उत्सुक होत्या. आणि हे जाणूनच प्रभुसुद्धा  लवकरात लवकर निघण्याची तयारी करण्यात मग्न होते. या सर्व तयारित राजा विभीषण आता प्रभु आपल्याला सोडून जाणार म्हणून चिंताग्रस्त मनस्थितित असतात, आणि हिच गोष्ट प्रभुना जाणवते. ते विभिषणाच्या जवळ जाऊन त्याला मीठी मारून
मित्रवर्य अनावश्यक चिंता नको मी कुठेही असेन तरीही सदैव आपल्या हॄदयात नककीच असेन. तसहि आपली लगेचच ताटातूट होणार नाही ,कारण मी आपल्याला माझ्या सोबत आयोध्येला येण्याच आमंत्रण देत आहे, त्याचा स्वीकार करावा.
साश्रु नयनानी   नमस्कार करण्यासाठी प्रभुंच्या पायावर झुकणार इतक्यात प्रभु विभिषणाला आलिंगन देतात आणि म्हणतात मित्रांची जागा सदैव हॄदयात असते.

त्याच भाववस्थेत विभीषण म्हणतात प्रभु माझ अहोभाग्य , सहस्त्र जन्मीच पुण्य म्हणुन आपला सहवास लाभला. हे ऋण कदापि न फेडता येणारे आहेत भगवन .

उत्तरादाखल प्रभु हसतात आणि म्हणतात चला प्रस्थानाची तयारी करूया.  विभीषण आणि इतर सर्व जण सम्मतिदर्शक मान डोलावतात.

सुग्रीव आपल्या राज्यात परत जाणाऱ्या वानरसेनेला काही महत्वाच्या सूचनां देण्यास निघुन जातात, प्रभुना सांगतात की मी काही पळानी येतोच.

कदाचित जी स्थिति वा अवस्था प्रभुंची आहे तीच तिकडे अयोध्येत भरताची झालेली आहे. अश्या विविध भावानी भरलेल आणि भारलेल मन घेऊन प्रभु स्वयम, माता जानकी, भ्राता लक्ष्मण , राजा विभीषण, सुग्रीव आणि निवडक लोक. आयोध्येकडे प्रस्थान ठेवण्यास  आतुर आहेत. आणि हे  अलौकिक दृश्य स्वये पाहण्यासाठी तिन्ही लोकांचे देव , गन्धर्व सर्व आकाशमार्गात दाटि करून जमलेले आहेत आणि लंकेतुन पुष्पक विमान निघण्याच्या तयारित आहे.

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
२१/०१/२०१८

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...