Skip to main content

सागर



सागर

त्या निळ्या सागरा पाशी
 कूणी वाट पाहते माझी
त्या सुंदर लाटांवरती
प्रेमाची नक्षी होती 


 मोजून पाहू त्या लाटा
क्षितिजाच्या रंगीत रेषा
 बहार फुल बनूनी
आली ती निळ्या जलाने


 वाटे हा वाळू किनारा
मज खूणावतो का आहे
का कोणी येण्याची हा
मज चाहूल देतो आहे 


 यावे तू शब्दांमधुनी
मज न्यावे ओढून आत
त्या लाटांवरती बसुनी
क्षितिजाच्या पुढती पार
क्षितिजाच्या पुढती पार 


कवी : प्रसन्न आठवले 

Comments