Skip to main content

कवडसा २८


कवडसा २८


(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , 
 
तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
 

कहाणी एका संघर्षाची सुरु …२८


आशाताई निघाल्या आणि योगेन्द्रच्या खोलीत येऊन डोकावून बघत असताना योगेन्द्रच लक्ष गेलं. त्याने आशाताईंना बोलावलं या ना काकू , शीतल कशी आहे आता. 

आशाताई : ती बरी आहे आता बहुतेक उद्या डिस्चार्ज मिळेल आम्हाला.  तुझं कस आहे आता. 
बर घरच कोणी येऊन गेलं का.                 

योगेंद्र : नाही डॉक्टर साठे माझे लांबचे नातेवाईक आहेत. एक काका आहेत मुंबईत. बाकी कोणी नाही सख्ख. आणि इकडे नाशिकात कोणीच नाही, शीतल शिवाय. 

आशाताई : अरे आता आम्ही आहोत ना, मग असं का बोलतोस. 

योगेंद्र : तो तुमचा चांगुलपणा आहे. पण 

आशाताई : म्हणजे तू आम्हाला परकं मानतोस का. 

योगेंद्र : अहो नाही काकू माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. तुम्ही एका भेटीत आपलं म्हटलत हा तुमचा चांगुलपणा असं. 

आशाताई : बर  आम्ही गेलो तरी मी किंवा शीतलचा भाऊ कोणीतरी येऊन जाऊ रोज काळजी नको करुस. 

योगेंद्र : हो चालेल. शीतल ला काळजी घ्यायला सांगा आणि माझी काळजी करू नकोस तुला बर होऊन घर उभं करायचंय. मी माझा काळजी घेईन सांगा तिला. 

आशाताई : हो सांगते (असं म्हणून त्या योगेन्द्रच्या हातावर थोपटतात ), बर येऊ मी. 

योगेंद्र : हो चालेल. शीतल चा किंवा तुमचा फोन नं. देऊन ठेवता का , काही लागलं तर उपयोगी येईल. 

आशाताई : बर , माझा आणि ....... शीतल चा पण देते. 

आशाताई योगेन्द्रला दोन्ही नं  देतात आणि निघतात.  त्या आपल्या खोलीत येतात आणि तेवढ्यात 

शीतल : कसा आहे तो , काय म्हणाला , त्याला नं  द्यायला हवा होता किंवा त्याचा घ्यायला हवा होता. 

आशाताई : हो हो अग  किती प्रश्न एकदम. सर्व केलाय मी त्याचा नं  घेतलाय आणि तुझा माझा नं  दिलाय त्याला. 

शीतल : किती छान आहेस ग आई. सर्व माझ्या मनासारखं  केलंस. 

आशाताई : असूदेत. आता खरंच झोप 

शीतल : (हसते) हो मग आता पण मी झोपलेच होते. (आईच्या चेहऱ्याकडे पाहात ) बर  आता नक्की झोपते . 

आशाताई थोड्या चिंतीत झालेल्या दिसल्या. कसली चिंता होती त्यांना ते बघूया कळेल लवकरच. 

क्रमशः: 
























Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...