Skip to main content

२३ वर्षे मैत्रीची - १

२३ वर्षे  मैत्रीची -  १  

कथा सूत्र 
 
२३ वर्ष गाढ मैत्री असलेल्या दोघांची म्हणजेच त्याची आणि तिची हि कथा मालिका आहे 
 
 
हां भाग 23 वर्षा नंतरचा  आहे म्हणून तो आणि ती असा उल्लेख संवादा आधी करणार नाही.  इतक्या वर्षानी हे भेद उरलेच नसतील.  खरतर हां शब्दांविना असा प्रवास, पण अंतिम टप्प्यावर बरच बोलायच असेल तर आणि बरच राहील असेल म्हणुन ख़ास एका बागेत ते दोघ् रोज भेटतात त्यामुळे त्यांचा हा असलेला गोड संवाद रोजच आपल्याला टिपता येईल. 

किती वर्ष झाली नाही. 

हो रे बघता बघता 20 22 वर्ष झाली

अग राणी 23 वर्ष झाली

राणी… ,  काय हे रे

तुला नाही आवडला का राहुदे

तस नाही रे पण आधी आडून कवितेतून म्हणतोसच आज डायरेक्ट म्हणालास

असू दे मला वाटल

बर बोल

कशी गेली ना इतकी वर्ष

हो रे पण तू किती अनमोल साथ दिलीस आयुष्यभर कोणतीही अपेक्षा न ठेवता.  कसा आहेस रे तू,  खरच,  विश्वातल आठवं आश्चर्य आहेस तू.

झाली का सुरु स्तुति सुमन

आज बोलू दे ना रे.  किती काळ आत ठेवू हां भार.  व्यक्त पण करू दिल नाहीस कधी.  का रे निदान व्यक्त केल असत तर तेवढच मनाला.

बर बोल ऐकतो पूर्ण

किती निर्मळ,  निष्कलंक,  निष्पाप,  खरच कधीच काही सुद्धा मागावस वाटल नाही का रे एक माणूस म्हणून आणि .......
आणि एक पुरुष म्हणून असच ना

अरे .... हो म्हणजे एक आश्चर्य म्हणून रे प्लीज ..
अग अजुन काय प्लीज् वगैरे

पण तस कधी सुद्धा मनात आल नाही रे फक्त असा माणूस सॉरी देवच रे तू

कायग हे

आज मी बोलणार

बर बोल
 

कसा रे असा इतका छान तू कदाचित एका वळणावर वाटल असत तुला तर राग नसता आला.  हो मर्यादा ओलांडली नसती मी.  पण तू तसा सुद्धा मोका येऊ दिला नाहीस.

अग वेडे तसा विचार जरी आला असता तर ........
तर काय सांग saaaaang सांग रे

तर स्वताला संपवल असत इतका ठाम होतो

अरे निदान ........
अग नाही मी तुझ्या आधी नाही जाणार हे ठरलय ना

कोणाच

माझ आणि त्याच.  तुला आधी त्याच्या जवळ पोचवण्याच ठरल होत . अग तुला आयुष्यभर मी त्याची अमानत मानत आलो

ते जाणते रे त्याच साठी इतका विश्वास आंधळेपणाने पूर्ण टाकला रे
I know it डिअर……  सॉरी …।

नाही तुला आहे रे तो हक्क कधीच दिलाय तुला . कारण तुझा प्रत्येक शब्द आवडतो त्यात भाव शुद्ध असतो.  खरी शुद्ध मैत्री आहे.  मित्र या शब्दाचा किती छान अर्थ सांगितलास इतक्या वर्षांपूर्वी. 

क्रमशः 
 


Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...