Skip to main content

प्रेम स्वप्न

 
प्रेम स्वप्न  
 

मी तूला जग मानिले तूही मनी हे जाणिले
समजून हे सर्वस्व माझे मी तूझ्यावर वाहीले ।
मग काय आता बोच ही देसी मला तू  भंग हां ।।
 
मी तूला ……. 
 
 
 
नाही पुढे जर जायचे तर पाऊले का टाकली
तूही किती माझ्यात अन मीही तूझ्यातच मग्न रे
होते कसे ते कालचे पण स्वप्न ते का भंगले ।।


मी तूला ……. 

दोघे कुठे आहोत हे फासे असे का सांडले
मीही तूझी आहे परी तू का मला अव्हेरले
कालच्या वाटेवरी तू भेटशी मजला कधी

मी तूला ……. 

 हे मानूनी मी वाटेवरी आहे कधीची थांबलेली  
 मला तो शब्द आणि प्रेम ही मज का दिले
ते शब्द तर आहेत रे पण भावना का संपली ।।

मी तूला ……. 

मीही तूला आता कधी भेटिन हे ना ठाऊके
तरीही तूझी आहे परी ही आस तू का सोडली
हे शेवटी मी सांगते माझे तूझ्यातच जग सख्या ।।
 
मी तूला ……. 

 
 
कवी : प्रसन्न आठवले 

Comments