Skip to main content

कवडसा - 19



कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …१९……




ती तशीच विचार मग्न होती तेवढ्यात आशाताईनी तिला फोन लावून दिला,  हं  घे बोल तुझ्या बबडेशी.  
शीतल फोन वर बराच वेळ बोलत होती.  आशाताईनी मधेच तिचा हात धरला आणि आता बास अस खूणावल.  शीतलने फोन ठेवल्यावर आशाताई म्हणाल्या : काय म्हणाली 

शीतल: बऱ्याच तक्रारी झाल्यात करून मामा कसा वाईट आहे.  मामी किती चांगली आहे.  आज तिने डोसे केलेत.  काल माझ्यासाठी आइसक्रीम मागवल.  मामा नाही म्हणाला आधी,   पण मामीनेच त्याला डोळे वटारुन पाठवल.  

आशाताई : तो बिचारा का वाईट 
शीतल : अग काही नाही सध्या तो तिला कुठे जाऊ देत नाहिये, मी नसल्यामुळे .  सर्व मामीच्या परवानगीने चाललय,  म्हणून मधेच वृषालीशी पण बोलले म्हणाली हॉस्पिटल मधून तूला इकडेच आणणार आहोत दोन महिने. 
एवढं बोलून शीतल ला इतका वेळ दाबून ठेवालेला बांध अनावर झाला. आशाताईनी तिला बसत केल आणि तिचे डोळे पूसून त्या म्हणाल्या 
आशाताई :  अग त्यात काय एवढं वाईट वाटून घेण्या सारख किती प्रेम आहे तुमच दोघींच  एकमेकींवरवर.  अगदी मैत्रिणी वाटता. 
शीतल थोड़ी शांत झाली तेवढ्यात आशाताई म्हणाल्या मी ज़रा डॉक्टर  ना भेटून आले.   त्या गेल्या असतील नसतील एवढ्या त डॉ.  साठे च रूम मधे आले.  
डॉ : बोला शीतल ताई कस वाटतंय. 
त्यानी पूर्ण तपासून प्लास्टर नीट बघुन घेतल आणि बीपी चेक केल आणि म्हणाले 
डॉ : बोल कसल टेंशन आहे,   प्लास्टरच,  अग हे 50 दिवस असे निघून जातील.  
शीतल काहीच बोलली नाही नूसतीच  हसली ते पाहून डॉक्टरांनी  ओळखल आणि म्हणाले 
डॉ : आता आशाताई नाहियेत् काही सांगायचं असेल तर सांग.  
शीतल :(थोड़े आढ़े  वेढे घेत) 
डॉ : बोलतेस की बोलवू आशाताई ना.  
शीतल : काका कस सांगू  
डॉ : काका तर म्हणतेस,  मग का घाबरतेस बोल.  
शीतल : काका तो मघाचा पेशंट,  योगेन्द्र पुरोहित,  बहूतेक तो मला बघायला आला असावा.  
डॉ : म्हणजे तू ओळखतेस त्याला.  बर झाल.  कारण त्याचा मोबाईल सापडत नाहिये आणि पर्स पाकिट कोणीतरी मारल असाव. 
शीतल : हो म्हणजे वर्ग मित्र आहे,  तो कॉलेज मधला.  नूकतीच ओळख झाल्ये  परत.  घरचा नंबर काढ़ते मी आणि कळवण्याची व्यवस्था करते.  
डॉ : तुला त्याला बघायचय का? आम्ही पण तो शूद्धित यायची वाट बघतोय.  पण घाबरु नकोस बाजूच्याच् रूम मधे आहे  मी बघतो काही करता आलं   तर., 
आणि  मग हसून डॉ म्हणाले 
भेट बेड टू बेड होईल काय आणि काय योग योगेंद्रचा तो तुला भेटायला आलाय आणि आता तू आधी भेटणार त्याला म्हणजे दोन पेशंटची भेट घडवण्याचा योग आणि भाग्य मला मिळताय 
शीतल मात्र मनात खुश होती योगेंद्रची  भेट होईल म्हणून आणि हसू   पण  आल तिला काय योग आहे योगेंद्रच्या भेटीचा. 

क्रमशः 


Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...