Skip to main content

कवडसा - 18



कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …१८……



आशाताई परत आल्या तेंव्हा शीतल झोपलेली होती. 
आशाताई आवाज न करता त्या बेडच्या बाजूला बसल्या.  
तेवढ्यात दोन तीन वार्ड बॉयज आले आणि नर्सला सांगून गेले की मैडम या पेशंटला  तयार करा याला हलवायचय शेजारच्या रूम मध्ये . नर्स हो म्हणून तयारीला लागते. चला आता हां पेशंट हलणार म्हणून आशाताई पण थोड्या खूश झाल्या. 
साधारण अर्ध्या तासाने पेशंटला तिथून हलवल जात. सर्व सामसूम झाल्यावर पुन्हा शीतल पूर्ण जागी होते.  आता तिलाबरच फ्रेश वाटत असत. अचानक काही आठवल्यासारख ती आईला विचारते 
शीतल : अगआई तो पेशंट i mean योगेन्द्र पुरोहित कुठे आहे ग 
आशाताई : त्याची सोय केली दुसरीकडे त्याला रूम मिळाली सेपरेट. पण तू का विचारतेस.  ओळखतेस का नाव कस लक्षात इतके आणि तेहि तू अर्धवट झोपेत होतीस तेंव्हा जाता जाता बोलले होते मी . 
शीतल : अग नाव कुठेतरी ऐकल्या सारख वाटतंय. लक्षात येत नाहीये.   
कदाचित चेहरा पाहिल्यावर आठवेल..  बर माझा फोन कूठे आहे देशील का ज़रा
आशाताई : शीतल अग केवढ़या मोठ्या दुखण्यातून जात्येस खेळ वाटतोय का आता पूर्ण बरी होइ पर्यन्त फोन वगैरे काही नाही कळल.  
शीतल : काही नाही अग शर्वरीची  आठवण येत्ये.  तिच्याशी बोलले असते.  
आशाताई एकदम ओशाळून म्हणाल्या 
आशाताई : अग या गडबड़ित तिचा कसा विसर पडला कळत नाही.  आता माझ्या फ़ोन वरुन बोल.  मग उद्या मागवते तुझा फोन अवि कडे आहे.  
आईच्या या वाक्याने शीतलचा प्रफुल्लित झाला.  कशाने ते तिलाच ठाऊक. पण अचानक तिच्या चेहऱ्यावरी भाव बदलले, 
शीतल खरच एका विचित्र मनस्थितित होती.  कारण आपल्याला बघायला योगेन्द्र इथपर्यन्त आला, याच आश्चर्य, कौतुक, आनंद, त्याला अपघात झाला, याच दुःख अणि एक गिल्ट आणि आता त्याची भेट होऊ शकेल का नाही ह्याच टेंशन कोणती भावना  व्यक्त करावी आणि काय हेच तिला कळत नव्हतं त्यामुळे तेच्या चेहऱ्यावरील भाव क्षणाक्षणाला बदलत होते. आणि ते ती आईपासून लपवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत होती .  

क्रमशः 

Comments