Skip to main content

कवडसा 2

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)


काळीज सुन्न करणारा तो दिवस आयुष्यात विसरायच म्हटल तरी या जन्मी शक्य नाही. चार वर्षांपूर्विचा तो काळा दिवस दुर्दैव घेऊन आलाय हे खरच कल्पनेत सुद्धा नव्हत. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी मन उगाचच बेचैन होत सकाळ पासून. आज जाणवतोय अर्थ नियतीच्या संकेताचा, कारण वातावरण सुद्धा विचित्रच होत त्या दिवशी. आणि समरच्या इछेविरुद्धच  मी त्याला शहराबाहेरुन भाजी आणि इतर खरेदी करायला पाठवल. आणि तो नाखुशीनेच बाईक घेऊन  गेला. खरतर त्याला त्या दिवशी मस्त आराम करायचा होता सुट्टी असल्यामुळे . खरच मी नाही पण काळाने त्याच ऐकल आणि . . . . .
तो घरातून बाहेर गेला असेल आणि अर्ध्या तासात सर्व जग इकडच  तिकडे झाल. अचानक वीज अंगावर कोसळावी तसा तो फोन एका अज्ञात व्यक्तिचा आणि मीच फोन उचलल्यामुळे कानावर झालेला तो बातमीचा आघात माझ किंचाळण, ते ऐकून धावत आलेल्या शेजारच्या  काकू आणि त्यापुढल मन सुन्न करणार ते दृश्य........
नंतरचे दोन दिवस काय घडल काही केल्या लक्षात येत नाही. अर्थात कस लक्षात येईल, कारण आपण दोन दिवस सुन्न होतो.  काय घड़तय हे कळण्याची मनस्थिति
तरी कशी असेल , जेंव्हा मनाचा अर्धा कोपरा कोणी करवतीने कापावा ,तसा काढून घेतला होता माझ्या जीवनाचा सुखाचा  सर्व हिस्सा , काळ नावाच्या कुण्या निष्ठुर आणि अज्ञात शक्तिने.
आज चार पाच दिवस झाले, पण अजूनही मन सत्य स्विकारायला तयार  होत
नाही,  आई पासून सर्वानी आपल्या परिने समजावल, पण अजूनही मन हे भीषण आणि कटू सत्य स्विकारू शकत नव्हतं. शर्वरी १०/ १२ दिवस आइकडेच होती. तेराव्या  पर्यन्त मी  थोडी भानावर आल्याच आठवतय.
सर्व जण आपापल्या घरी पांगले आणि माझी खरी लढाई चालू झाली अस्तित्वाची  , 
दु:खाची, प्राप्त  परिस्थितीशी. 

क्रमश:


Comments

  1. कवडसा या प्रदिर्घ ब्लॉग कादम्बरीचा लेखक प्रसन्न आठवले ः जे हि कादम्बरी वाचतात त्याना हि विनंति कि त्यानी क्रूपया आपले मत नोंदवावे जेणे करून मला कळेल कि वाचक प्रतिसाद कसा आहे. हि एक प्रदिर्घ कादम्बरी आहे आणि ति रोज या स्वरूपात ब्लॉग वरच प्रसिद्ध होइल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...