Skip to main content

जीवन मुक्त छंद


जीवन मुक्त छंद

हळूवार फुंकर घातली कि खपली काढली ते माहित नाही  
पण प्रयत्न फुंकर घालण्याचाच होता ।।
अनाहूत  खपली निघाली असेल या जाणीवेने काहूर माजलय 
तप्त वाळूचे चटके सहन केलेल्या तुझ्या सारख्याचे मन 
शीतल वर्षावात उभा असलेल्या मला कस समजणार ।।
पण नकळत चूक घडली असल्यास तू नक्की पोटात घेशील हे माहित आहे 
कारण अनुभवांनी तुझ्या जाणीवा प्रगल्भ आणि मन विशाल बनलय 
आणि माझ्या नजरेत तू आभाळासमान आहेस ।।

माझ्या अंतरात्म्याचा आवाज तुझ्या अंतरात्म्यात पोचवण्याचे साधन म्हणजे हे शरीर 
या व्यतिरिक्त ते शरीर आपला वेगळा आवाज पोचवेल हे संभवणार नाही ।।
सोज्वळतेच्या  मुखवट्या आडून वेगळा विचार करण  हि समाजाची रीतच 
पण माझा प्रवास वेगळा असेल आणि त्यात घातपात संभवणार नाही ।।

जीवन जगणे म्हणजे लहान ओढ्याचा प्रवास वादळ, उन्ह, पाऊस काही आल तरी,
शांतपणे वाहात राहाणे हा एकच धर्म तो ओढा जाणतो आणि तेवढेच अपेक्षित असत ।।
मनाचही तसच आहे सर्व साक्षित्वाने पाहात जीवन  प्रवास  संथ पणे सुरु ठेवणे 
मागे जाणाऱ्या  प्रत्येक प्रसंगाचा हात सोडून पुढे चालणे, फक्त तेवढेच अपेक्षित असत ।।

जगण्यासाठी शरीर कि शरीरासाठी जगण ह्यातील काय योग्य ते आता पक्क 
वासनांसाठी कुंथण कि त्यांना मारून ताठ पणे उभ राहाण हे आता पक्क ।।
अष्टदिशाना  फिरणं कि सर्व दिशा आत्म्याभोवती स्थिर करणं हे आता पक्क 
क्षणिक जगणं कि प्रत्येक क्षण जगून तृप्त करण हे आता पक्क ।।


प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...