भोग आणि ईश्वर २४३ खरतर आपण ज्या गोष्टी करतो त्या प्रत्येकात अपेक्षा ठेवून करतो. ती अपेक्षा किंवा त्या कर्मात किंवा कर्माच्या फलात गुंतलेलं मन हा त्या कर्मामागील भाव आहे. ज्या प्रमाणे भाव असेल त्याप्रमाणे त्या त्या कर्माचं फल प्रत्येकाला प्राप्त होतं. म्हणजेच कर्मफल भावात्मक आहे. जिथे जशी जितकी भावाची गुंतवणूक तितका व तसा कर्मफलाचा हिस्सा योग्यवेळी प्रत्येकाला मिळतो. असे भावबंध कर्मात असतात, त्यानुसार फलप्राप्ती, हे व्यावहारिक पातळीवर सत्य आहे. पण अध्यात्मिक पातळीवर याचा उलट संबंध आहे. म्हणजेच भाव ठेवून साधना भक्ती वा नामस्मरण करत गेल्यास, मिळणारा लाभ हा क्षीण क्षीण होत जातो. याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे व्यवहारात अपेक्षे प्रमाणे तरंगलहरी निर्माण होऊन, त्या कर्मफलाला तुमच्या पर्यंत पोचवायला मदत करतात. याचं एक सहज सोप्प तार्किक कारण म्हणजे भौतिक जगताचा मुख्य संबंध हा, पंचमहाभूतरुप तत्वांशी असल्यामुळे, त्यांना सर्व सर्व भौतिक नियम व गणितं लागू होतात आणि कार्य त्याप्रमाणे घडत जातं. पण अध्यात्मिक बाबतीत मुळातच संबंध, अश्या ईश्वरी चैतन्य शक्तींशी आहे, की ज्या, प...