ll विघ्न-भयनाशक श्रीवेंकटेश स्तोत्र ll
जयजयाजी वेंकटेशा पारलौकिका सर्वेशा
आदीदेव तू सिध्दीदायका भक्तप्रतिपालका
तुझिया कृपे मेरू हाले कृपे तव मुक्ती गजेन्द्रा
हृदयात तू ज्या धारियले त्याची पार लागे नौका
तूच ईश्वर भुतांचा तूच निर्माता कळीकाळाचा
तुझिया साक्षी ब्रम्हादीक रचिले सृष्टीस सकला
तू स्वये संकल्पे क्षणात मनोवेगे सिद्ध सर्वार्था
तूच जगन्नाथ तूच मक्षिक तूच कीटक आत्मरूपा
तुझिया श्वासे सारे घडेल उच्श्वासात अंत जाणा
तुझिया नामे भयभीत कंपित होती असुर सारा
तूच मात्र मनी येता होय सिद्ध सदैव भक्त रक्षणा
तुझी कृपा जयावर त्याचा पार ध्वज वैकुंठाला
कर्मे करती नित्य सारे सकळ कृपार्था प्राणनाथा
आद्य नित्य अंती सत्य जग संपले तरी तू उरता
होसी प्रकाश निर्मुनी सूर्य, सोम निर्मिला तू निशेला
अगणित तारे असंख्य प्राणी कित्येकाचा तू निर्माता
अत्री वसिष्ठ नारद शारद किन्नर गंधर्व त्रैलोका
अष्टवसु द्वादश सूर्य सुरवर निर्मिसी तरी त्रयस्था
चौऱ्यांशी लक्ष जीवांच्या हृदयामाजी वास करता
तूच जगनियंता सर्वभूता तूच कारण जगाच्या अंता
तुझी स्तुती काय करणे शारदा देवीचा तू निर्माता
तूच होऊनी बुद्धिदायक शब्द देसी माझिया स्तोत्रा
तू न साधिसी न होणे तू साधिसी सर्व होणे भगवंता
तू मोक्षाचा मार्ग दाविसी माझिया सारख्या मूढजना
जयायोगे पार लागे जीवननौका त्रैलोक्याच्या ईश्वरा
मज दीनानाथा शब्द दिले स्वये स्फुरुनी या स्तोत्रा
फलादेश हाची देसी जे हे पाठती नित्य द्वादश दिना
नित्य पठण करती त्यांची सकल पापे हरोत ही प्रार्थना
ll इतिश्री प्रसन्न कृत वेंकटेश स्तुती स्तोत्र संपूर्ण ll
©® शब्दप्रभूंच्या स्फूर्तीने लेखणीधारी : प्रसन्न आठवले
१३/१२/२०१९
०८:२८
Comments
Post a Comment