ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ६२
सारा सभागार " प्रभु रामचंद्रांचा विजय असो" या घोषणानी पुनःश्च दुमदुमुन गेला.
वसिष्ठ मुनिवर पुढे सांगू लागले.
"रामा नन्तर भरताचा जन्म देवी कैकई यांचे उदरी झाला. तदनन्तर लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म देवी सुमित्रा यांच्या उदरी जाहला. राज्यात याचा जन्मोत्सव कित्येक दिवस पर्यन्त साजरा करण्यात अयोध्यावासी मग्न होते. लक्ष्मणाची एक आठवण सहज लक्षात राहिलेली ती अशी. जन्मानन्तर बराच वेळ लक्ष्मण रडत होता. अनेक उपाय करून झाले, जसे उदरी वातप्रकोप असेल वा भूक लागली असेल असे वाटुन ते सर्व उपाय झाले पण ह्याचे रडणे थांबेचना."
या वाक्याला उर्मिलेसह सर्व लक्ष्मणाकड़े हसुन पाहात आहेत.
" तर सरते शेवटी माताना प्रश्न पडला आता याला शांत कसा करावा. त्याच वेळी राजा दशरथानी उचलून सहज रामाशेजारी ठेवला आणि क़ाय आश्चर्य याचे रडणे त्वरित थांबले. त्यानन्तर पुढे अनेकवेळा आणि नित्य रात्री निजते समयी याला रामाशेजारी आणून ठेवण्याचा नियम झाला."
" म्हणून यांची नेहमी एकत्र राहण्याची सवय आहे तर" उर्मिला म्हणाली
"होय "महर्षि उत्तरले.
प्रभुरामासह सर्वजण हास्यात सामिल झाले. सुमंतानि प्रभुना व गुरुदेवाना राज्याभिषेकानिमित्त राज्यातील प्रजेला द्यावयाच्या भेटवस्तुंची आठवण करून दिली.
प्रभुंची आज्ञा होताच सभागृहात अनेक , भेटवस्तुंची तबक आणण्यात आली. प्रभुनी स्वतः आमंत्रिताना त्यांच्यां आसनासमोर जाऊन नम्रपणे भेटवस्तू स्विकारण्याचा आग्रह केला. उपस्थित आमंत्रित सुग्रीव, अंगद, विभीषण, जाम्बुवन्त , नल नील आदि सर्व भेटवस्तू स्विकारण्यास तयार होईना. शेवटी प्रभुनी त्याना ही रघुकुलाची परंपरा आहे आणि माझीही मनीषा आहे असे सांगितले.
तदपश्चात सर्वानाच विविध वस्त्रे, सोन्या चांदिचे अलंकार , आभूषणे या स्वरुपात प्रभुनी स्वहस्ते,विधिवत, देऊन सन्मानित केले.
सभागृहातील सर्व उपस्थिताना अनेक वस्त्रालंकार यानी उपकृत करण्यात आले. प्रत्यक्ष प्रभुनी आज्ञा केली की आज या अयोध्येत कोणीही याचक व अतृप्त राहणार नाही या योगे दान केल जाव. प्रभुंच्या अर्थात महाराजा श्रीराम यांच्या आज्ञेप्रमाणे राजप्रसादाबाहेर खजिन्यातून उत्तमोत्तम अलंकार सोन चांदी, सुवर्ण मुद्रा , रेशमी, भरजरी विविध वस्त्रे हे बाहेर काढून ठेवण्यात आले होतेच. सर्व सेवक वर्गाने त्याचे यथोचित वाटप केले. राज्यात एकहि याचक राहणार नाही यांचीच समस्त सेवक वर्गाने खास खबरदारी घेतली. स्वतः प्रभु श्रीराम, देवी जानकी व तिन्ही बन्धुनसह तिन्ही राजकन्या यानी स्वतः जातीने सेवकवर्ग व राज्यातील प्रजा याना अनेक भेटवस्तू व अलंकार यानी उपकृप केल. समस्त अयोध्या याचकरहित झाली प्रभुंच्या आज्ञेप्रमाणे. सम्पूर्ण अयोध्या कित्येक दिवस या हृद्य आणि नयनमनोहर राज्याभिषेक सोहळ्याचे गुणगान करण्यात दंग होती.
आणि अतिथींच्या गमनाचा दिवस आला .
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment