ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ६३
आणि अतिथींच्या गमनाचा दिवस आला .
राज्याभिषेकाचा सर्व सोहळा मोठा दिमाखदार आणि दृष्ट लागण्यासारखा झाला. ज्याचं गुणगान अयोध्यावासी कितीतरी दिवस गात होते, साजरा करत होते. इतकं की अस वाटाव दीपावलीचाच सण चैत्रात आला आहे. सोहळयासाठी
आलेले सर्व अतिथि अयोध्याच अतिथ्य घेऊन आणि आता अंगावर लेऊन तृप्त झाले होते. प्रत्येकाला आता गमनाचे वेध लागले होते आणि त्यात तथ्य सुद्धा होते. कारण त्याना घर सोडून बरेच दिवस झाले होते. किंबहुना महीने म्हटल्यास योग्य ठरेल.
म्हणून प्रभुजवळ राजा सुग्रीव यानी विषय काढला की आता आम्हाला परत जाण्यास अनुमति द्यावी. प्रभु सर्वांची मानसिक स्थिति जाणत होते. म्हणून ते म्हणाले आपल्या निघण्याची सर्व व्यवस्था करण्याची आज्ञा मी देतो आपण आपल्याकडून तयारी सुरु करावी. अस म्हणून त्यानी सेवकाना तशी व्यवस्था करण्यास सांगितल. जाण्याचा दिवस आला. प्रभु सर्वाना व्यक्तिगत भेटले. सुग्रीवाला म्हणाले
" सुग्रीवा तुझ अनमोल योगदान आहे या सर्वात, त्यातही अजून एक जबाबदारी दिली तुझ्याकडे, जी खरतर वालीने माझ्यावर सोपवली होती. ती सुग्रीवा मी तुझ्यावर सोपवत आहे. अंगदा तुझ हित अहित सर्व तुझे चुलते या नात्यान आणि किश्किन्धानरेश या नात्यान देखील ते पूर्णपणे निभावतील यात मला कोणतीही शंका नाही. "
" विभिषणा तुही एक उत्तम प्रशासक व राजा म्हणून नककीच नाव मिळवशील यात मला साशंकता नाही. "
"सर्वाना पुन्हा एकदा विनंती की जेंव्हा जेंव्हा अयोध्येवरुंन निमंत्रण असेल।आपण नक्की उपस्थित असाल हा विश्वास आहे."
सर्वांस पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आणि बहुमूल्य भेटि सोन चांदी देऊन निरोप दिला. सर्व अतिथि, निघताना अत्यंत भावुक झाले. प्रभुंचे लोचन सुद्धा भरुन आले. या सर्वांच्या पोचण्याची व्यवस्था भरत शत्रुघ्न याना करायला सांगून प्रभु अन्तःपुरात गुरुदेव वसिष्ठ यांच्याशी राजकीय चर्चा करण्यास गेले.
अन्तःपुरातील खाजगी कक्षात गुरुदेव महर्षि वसिष्ठ स्वतः श्रीराम आणि भ्राता लक्ष्मण सद्य स्थिति, आयोध्येची राजकीय व भौगोलिक परिस्थिती यावर चर्चा करण्यात मग्न झाले. त्यात पुढील राजकीय हालचाली , सैन्याची माहिती, आवश्यक खर्च , सैन्यासाठी आवश्यक शस्त्रे अस्र यांचे व्यवस्थापन व नवीन उत्पादन याचा देखिल उहापोह करण्यात आला. अर्थातच या वेळी ज्येष्ठ मंत्री सुमंत सुद्धा उपस्थित होते.
यावेळी सर्वानाच प्रभुंचे राजकीय, सामाजिक व आर्थिक बाबीनवरिल प्रभुत्व लक्षात आले. गुरुदेव खुप प्रसन्न झाले आणि मनोमन म्हणाले की आता अयोध्येत पुन्हा सुगिचे व वैभवाचे दिवस सुरु झाले.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment