Skip to main content

जानकी पुनःवनवास ४०

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ४०

भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांच्या आगमनानन्तर भरत प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळा व त्याची तयारी यावर सखोल चर्चा आणि ते पूर्णत्वाकडे यशस्विपणे कसे नेता येईल याचा उहापोह करत असतानाच तिथे प्रभु श्रीराम यांच् आगमन होत. त्याना पाहुन तिन्ही बन्धु उत्तिष्ठवान नमन करतात. प्रभुनी त्यांच्यां नमस्काराचा आदरपूर्वक स्वीकार केला आणि पुन्हा सर्वाना आलिंगन देऊन बसण्यास सांगतात. तिन्ही बन्धु प्रभुना विनंती करतात की आपण आधी आसन ग्रहण कराव. ज्यावर किंचित स्मित करून प्रभु आसनस्थ होत सर्वाना बसण्याची अनुमति देतात. चारही भ्राता निःशब्द आहेत. काही क्षण जातात आणि प्रभु भरताला विचारतात

" भ्राता भरत सर्व सकुशल आह ना. सर्वाना पाचारण करण्याचे प्रयोजन आणि हेतु क़ाय आहे स्पष्ट करशील का"

भरत नमनपूर्वक वदतो की,

" आपल्या यशस्वी आगमना प्रीत्यर्थ आणि आपल्या राज्यारोहण समारंभाच आयोजन, नियोजन यावरच चर्चा करत होतो. तापली अनुमति असेल तर आपण त्याला अंतिम रूप देऊया"

" भरता तुझ्यासह सर्व बन्धु, माता, आप्त स्वकीय मंत्रीगण , सेनापति , सैनिक व प्रजाजन यांची जी इच्छा आहे त्याबाहेर मी नककीच नाही. तस्मात मला स्विकार्य आहे. अर्थात तू आचार्य महर्षि वशिष्ठ यांसह सर्व ब्रम्हवृंदाला पाचारण केलेच असशील. त्यांच्यां आगमनाआधी भरतासह तुम्हा सर्व बंधुना मी स्वहस्ते स्नानादि विधी करणार आहे. त्यांमुळे त्यासाठी सिद्ध व्हा"

हे ऐकून तिन्ही बंधुना हर्ष कसा व्यक्त करायचा तेच समजत नव्हतं. अत्यंत आनंदित असे ते तिन्ही भ्राता पुन्हा पुन्हा ज्येष्ठ भ्राता प्रभु राम याना वंदन करत होते. हे पाहून स्मितवदन प्रभु म्हणाले

"सत्यवचन आहे हे त्याप्रीत्यर्थ तयार व्हा. सर्व प्रथम भरताला मी स्नान घालीन, कारण त्याने चौदा वर्ष मुनिवेश धारण करून नंदीग्राम येथे राहून एक तपस्वी जीवन व्यतीत केलय आणि तेही आमच्या विरहात."

हे एकताच प्रफुल्लित झालेला भरत अनायासे प्रभुना आलिंगन देता झाला, ज्याचा प्रभुनी प्रेमपूर्वक स्विकार केला. आणि भरतास स्नानगृहाकडे घेऊन जाण्यास सुरवात केली. प्रभुनी भरताच्या मुनिवेशातील जटा सोडवून आधी त्यावर स्वये तेल लावून त्याना सोडवून घेतल. भरताच्या लोचनातून अश्रू बांध सोडून वहात होत्या. विलोभनिय अस हे दृश्य आहे.  भ्राता लक्ष्मण आणि शत्रुघ्न  साश्रु नयनानी हे विलोभनिय दृश्य बघत आहेत की  ज्येष्ठ भ्राता स्वतः अनुज आणि प्रिय सखा भरत याच्या जटा सोडवून त्याना तेल लावून नन्तर भरताला ही तेल व सुंगंधी सत्त्व युक्त उटण्याने आधी मालिश करतायत.

सम्पूर्ण जगताचा पालनहार स्वतः आपल्या लाडक्या बंधुना तेल व उटण लावत आहेत. भरताच्या सर्वांगावर हर्ष आणि उल्हास यानी रोमांच उभे आहेत, आणि लोचनावाटे अश्रु , अर्थातच हे आनंदाश्रु होते. भरतानंतर लक्ष्मण या कनिष्ठ बंधुला सुद्धा जटा स्वतः सोडवून आणि त्यावर तेल लावल. तदपश्चात तेल आणि उटण यानी सर्वांगाला मालिश केल. विश्वाची परमशक्ति आपल्या मानवी अवतारात आपल्या बंधुना स्वताः तेल उटण लावून स्नान घालण्यास सिद्ध झाले होते.

मनापासून आणि मनाच समाधान होईपर्यंत तेल व उटण लावल्यावर मग भगवंतानी स्वहस्ते भरताला व लक्ष्मण याना उभ करून स्नानासाठी स्नानगृहाकडे प्रस्थान केल.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...