Skip to main content

भोग आणि ईश्वर १५०

भोग आणि ईश्वर  १५०
 
एखादा गहन विषय घेऊन सलगपणे त्यावर १५० दिवस लिहिणं,हे केवळ माझे सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपाप्रसादाचा आंज वाचक प्रतिसादाचा परिणाम आहे. अन्यथा १ डिसेंबरला सुरू झालेला हा लेखन प्रवास पहिल्या भागाच्या पुस्तक प्रकाशनापर्यंत आणि वाचकांच्या उदंड प्रतिसदपर्यंत पोचलाच नसता. हनुमान जन्मोत्सवाला एका दिवसात  मी, सौ, मुलगी, माझी मेव्हणी आणि भाचा आम्ही मिळून जवळजवळ २०० पुस्तकाचं पॅकिंग आणि कुरियर वितरण केलं.हे सुद्धा स्वप्नवत वाटावं असं घडलं. 

काल कुरियर वाल्याने सर्व पार्सल्स नेऊन वितरणाची व्यवस्था केली आणि एका कार्याची कृतकृत्यता घडल्याचा आनंद मिळाला. आता श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ या पुस्तकावर काम सुरू केलं आहे. सर्व गोष्टी जुळून आल्यास, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यासंबंधी आगाऊ नोंदणीची सूचना इथेच पोस्ट करीन. असो.

आता विषयाकडे वळूया. मुळात आपण विषयाचा आनंद घेतो त्यावेळी,  वासनेच्या जोरावर वा शक्तीमुळे मन तिथे खेचलं जातं आणि नकळतपणे एकाग्रतेने काम होतं. या वासनांमध्ये काम क्रोध मद मत्सर इत्यादी सर्व वासना सामावलेल्या आहेत. त्या त्यावेळी त्या त्या कर्मात मन रममाण होऊन, त्या क्षणाचा आनंद घेतं. पण वास्तविक हा आनंद मन न घेता वासनारूपातील असुरशक्ती घेतात. 

यात एक गोष्ट लक्षात घ्या की,  यामध्ये नैतिकदृष्टीने योग्य आणि धर्ममान्य काम सात्विक संताप इत्यादी वगळण्यात आले आहेत. त्यामुळे त्याबाबत गैरसमज नसावा. परंतु त्याचा अतिरेक नसावा आणि एका विशिष्ट वयानंतर त्यातून हळूहळू निवृत्ती व्हावी. अन्यथा चुकीच्या वयातील एका मोहापायी आपल्या कर्तृत्ववान मुलाचा अधिकार डावलून मोहापायी तो चुकीच्या वारसांच्या हातात गेला नसता आणि पुढील सर्व महाभारत टळलं असतं. 

मूळ मुद्दा हा की त्या त्या वासनेच्या उपभोगात, मन एकाग्र होऊन चित्त त्या गोष्टींचा आनंद घेतं, त्यावेळी आपण मनाची एकाग्रता कशी काय होते, किंवा चिंता काळज्या करण्याच्या नादात आपलं भान कसं हरपतं, याचा विचारदेखील आपण कधी करत नाही. पण यातून एक नक्की लक्षात येईल की, मन एकाग्र होऊ शकतं. म्हणजेच एकाग्रता हा विषय मनाला नवीन नाही. फक्त ते त्या मनाच्या आवडीच्या, चवीच्या विषयांमध्ये नक्कीच एकाग्र होतं, आपली इच्छा असो वा नसो. 

पण आपल्याला हवं आहे त्यावेळी किंवा आत्मोन्नत्तीच्या मार्गावर, जिथे आपल्या आत्म्याचा उद्धार अवलंबून आहे, त्यावेळी हेच मन नको नको ते विचार भविष्यातील वा वर्तमानातील चिंता, भूतकाळातील चुका, प्रमाद यांना उभं करून, एकाग्रतेचा नेहमी भंग करतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे विषयाकडे, चिंतेकडे व काळजी यांकडे एकूणच असलेला मनाचा ओढा.  मागील काही लेखांमध्ये सांगितल्या प्रमाणे या नकारात्मक गोष्टी, विचार, काळज्या, विषयवासना कामक्रोधादी विकार यांच्या लहरी तीव्र असल्यामुळे मन सहजच त्याकडे आकृष्ट होतं. 

दुसरं कारण म्हणजे मनाला एकूणच श्रम वा त्रास आणि विषरहित होणं, यांची आवड नसते. त्यामुळे ते आपल्यालासुद्धा त्यापासून परावृत्त करण्यासाठी अनेक विचार, अवेळी मनात आणून, एकाग्र होण्यास एक प्रकारे असहकार करतं. यात आपला निग्रह, आपली निष्ठा, चिकाटी, श्रद्धा, यांची परीक्षा वा कस लागतो. तो तसा लागत आहे हे ध्यानात धरून जर नामस्मरण वा साधन केलं तर, अवेळी येणारे विचार आणि एकाग्रता भंग करणारे मनाचे खेळ यातून सहजी पुढे जाता येईल. प्रश्न आहे निष्ठा, चिकाटी, श्रद्धा आणि नेट यांचा.

बघूया त्यासाठी काय करता येईल. तोपर्यंत नाम घेत रहा, साधनेत रहा. शेवटी आपली साधनाच पुढील मार्ग प्रशस्त करणार आहे. 

भोग आणि ईश्वर भाग १,  या पुस्तकाची आगाऊ नोंदणी केलेल्या सर्वांची पुस्तकं रवाना झाली आहेत. 

अजूनही ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प
क्रमांकावर संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२९/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...