Skip to main content

शहाणपण आणि प्रेम


शहाणपण आणि प्रेम 

शहाणपण हे जन्मतः मिळावं लागतं आणि प्रेम हे यौग्य वयात करून व्यक्त व्हावं लागतं . ते नाही जमलं तर पन्नाशीत काय होतं  ते मांडण्याचा प्रयत्न केलाय 

उपजताच जे आले नाही पन्नाशीत मिळेल कसे 
तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे 

रांजण शहाणपणाचे आमुच्या 
जन्मतः रितेच होते 

म्हणून गद्धे पंचविशीत आमुचे 
सूत  कुठेच जमले नव्हते 


शहाणपणाचे सोडा जाऊदे 
त्याने काही अडले नाही 

पंचविशीतही मग गद्धे राहिलो 
म्हणून काही जमले नाही 

आता पन्नाशीमध्ये यातील काय जमेल कसे 
तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे 


तरुणपणी केला विचार तरी 
व्हावे शहाणे जमवून अक्कल 

फुकाचे ते मंत्र घेऊनि कधीतरी 
हाती शेवटी फक्त उरले टक्कल 

न्हावीदेखील चकित व्हायचा 
केसाचे हे तुमच्या नुसते जंगल 

जाऊ दे ते शहाणपण मग 
प्रेमात तरी होऊया पागल 

खाते हे शहाणपणाचे रिते राहिले  ते भरेल कसे 
तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे 

म्हटले आता जावे दुसऱ्या वाटे 
बघावे प्रेम जमते का मज 

खूप मारल्या चकरा उद्यानी  
कॉलेजातील शोधले मी जग 

कुठेच शिजली नाही डाळ ती 
नशिबातच नाही जमेल कसे मग 

कळेपर्यंत प्रेमाचा मार्ग आम्हाला 
पंचविशीचे कधीच सरले ते जग. 

पटण्यासाठी काहीच नाही कोणी आम्हा पटेल कसे 
तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे 

आता शोधात फिरतो दोन्ही गुण 
मिळणे कठीण तरी विजेरी घेऊन 

पन्नाशीत अनुभवाने कथिले मज  
शहाणपण आहे बक्कळ बघ शोधून 

म्हटले त्याला आता करू काय मी 
हे शहाणपण अन प्रेम शोधून 

ज्या गावाचा रस्ता  न ठाऊक मज 
करू काय माहिती मी घेऊन 

अनुभवाचे सार कवितेत सांगतो, हेतू इतुकाच असे 
तरुणपणी जे जमले नाही पन्नाशीत जमेल कसे 

  
कवी : प्रसन्न आठवले 
३०/०६/२०२०
०८:०६











Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...