Skip to main content

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग १


गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग १

नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ||

हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु ||१||

पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु ||२||

चैत वार्‍याची वाहणी आली देहाची अंगणी
अंग मोहरुनी आले जसा का पलाशु ||३|

गीत गदिमा
संगीत सी रामचंद्र
गायिका आशा भोसले
चित्रपट संत निवृत्ती ज्ञानदेव

नकारात्मकता ज्या वेळी आपल्या मनाचा ठाव घेते आणि मग संपूर्ण मन व्यापून दशांगुळे भरून वाहते, त्यावेळी सर्वत्र निराशेचा अंधःकार पसरतो. सर्व जग जणू आपल्या विरुद्ध षडयंत्र करून उभं आहे आणि आपला कोणीही वाली उरला नाही, अगदी प्रत्यक्ष परम ईश्वर देखील आपला नाही. आता या पडत्या काळात तो सुद्धा आपल्या बाजूने उभा राहणार नाही, त्याला सुद्धा आपली दया येत  नाही.

अश्या मनस्थिती सर्वसामान्य माणूस आपल्या आयुष्यात अनेकदा येतो. कदाचित दिवसात वेगवेगळ्या मनःस्थितीतून सुद्धा जात असतो. अश्या वेळी मरुदेत जग गेलं चुलीत, मला मदत करायला कोणीच नाही अशी स्थिती खूप वेळा येते. आयुष्यातील नकारात्मक टप्पे येतात. कष्ट सर्वचजण करतात, आळशी मनुष्य सोडून सर्वच. पण कोणी मुद्दाम दुःखाला वा निराशेला अवताण म्हणजेच आमंत्रण देत नाहीत.

पण हे बऱ्याच वेळा माहीत पडतं की जे घडतंय वा घडलंय ते आपल्याच कर्माचं फळ आहे. भोगणे क्रमप्राप्त आहे. परंतु अशी सांगड खूप वेळा घालता येत नाही. मन अश्या वेळी जास्त निराश वा सैरभैर होतं. वाटतं की हे माझ्या बाबतच का घडतंय. मीच का दिसतो देवाला त्रास द्यायला. देवाला माझी दया का येत नाही. नक्की कोणीतरी काही तरी करतय म्हणूनच असं घडतंय वा घडलं.

ही सर्व स्थिती सामान्य माणसाची होतच असते. काही जण मान्य करतात वा जाणतात की सामान्यपणे असच असतं मनात चाललेलं. पण असामान्य तेच असतात की जे कोणत्याही स्थितीत मनाचा तोल ढळू देत नाहीत. त्यांनाही नैराश्य ग्रासतंच पण त्यांची निराश होण्याची कारणं भिन्न असतात आणि त्यांची त्यावेळची मनःस्थिती वेगळी असते.

क्रमशः भाग १ समाप्त
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...