Skip to main content

गोग्रासवाडी आणि चित्रपट गोपाळकृष्ण  (१९३८).


गोग्रासवाडी आणि चित्रपट गोपाळकृष्ण  (१९३८).

गोग्रासवाडी म्हटलं की आठवतो प्रभात चित्र मंदिरचा चित्रपट "गोपाळकृष्ण". मे १४, १९३८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा सेट प्रभात चित्र संस्था पुणे येथे उभारला होते. पण बाहेरचं म्हणजेच आऊटडोअरच चित्रण गोग्रासवाडीत झालं होतं. एक उल्लेख सापडतो की त्या काळी रेल्वे गाड्या डोंबिवलीत थांबत नसतं. म्हणून प्रभात कंपनीने स्टेशन मास्तरना विनंती करून गाडी डोंबिवली येथे थांबायला लावली.

यावर मास्तरांनी अट घातली की फत्तेलाल आणि दामले या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना भेटण्याची परवानगी त्यांना मिळावी. ही अट सहज साध्य असल्यामुळे मान्य करण्यात आली. गाडी डोंबिवलीला थांबली. पुण्यावरून आलेलं पूर्ण युनिट आणि  सर्व मंडळी मग उतरली आणि गोग्रासवाडीत चित्रीकरणासाठी पोचती झाली. चित्रपटात १०० ते १५० पेक्षा जास्तं गायी व अनेक बैल वापरण्यात आलेत. ते सर्व गोग्रासवाडीतील आहेत.

या चित्रपटाचं दिग्दर्शन शेख यासीन फत्तेलाल आणि विष्णू गोविंद दामले यां प्रभातच्या भागीदारांनी केलं होतं.  ज्येष्ठ गायक राम मराठे , यांनी बालकृष्णाची भूमिका आणि शांता आपटे यांनी राधेची भूमिका केली होती. चित्रपटाला संगीत मास्टर कृष्णराव या त्याकाळच्या दिगग्ज संगीत दिग्दर्शकाने दिलेलं होतं. हा मराठी व हिंदी दोन भाषांमध्ये तयार करण्यात आला होता.

गोग्रासवाडीत अशी वदंता होती त्याकाळी, ( म्हणजे आम्ही लहान असताना सत्तरच्या दशकात की गायींना नियंत्रित करण्यासाठी गोग्रासवाडीतील एका गुराख्यालासुद्धा कृष्ण सवंगड्याची भूमिका देण्यात आलेली होती).  या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोग्रासवाडीची संस्थेची जी मदत घेण्यात आली होती, त्याबद्दल प्रभात चित्र संस्थेने मुंबई गोग्रास भिक्षा संस्था गोग्रासवाडीला १९३८ साली रु.२,०००/- दिले होते. आज गोग्रासवाडीत कृष्णमंदिरात गेलो होतो, त्यावेळी त्या संगमरवरावर कोरलेल्या आठवणींची प्रतिमा भ्रमणध्वनीत बंद करून आणू शकलो.

खास आपल्यासाठी या लेखसोबत देत आहे.

© माहिती संकलन व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०२/२०१९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...