Skip to main content

जानकी पुनःवनवास १०२

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास १०२

हे लक्ष्मणा एवढे सांगून आणि आपल्या पुत्र व परिवाराचे सांत्वन करून राजा नृग तयार करण्यात आलेल्या गुहेत शाप भोगण्यासाठी प्रस्थान करता झाला. या कथनानंतर लक्ष्मणा तुला अजून काही ऐकायचे असेल तर अशीच एक रोचक कथा मी तुला सांगू इच्छितो. "

यावर लक्ष्मण त्वरित उत्तर देता झाला.

"हे नरश्रेष्ठ राजा आता आपण ऐकवली ती कथा अद्भुत आहेच पण राजधर्माचे पालन राजाने न केल्यास काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण देखील आहे. म्हणून हे राजन मला अश्या धर्मोपदेशक कथा ऐकायला नक्की रुची येईल. किंबहुना अश्याच धर्मपरायण संस्कारी कथा कितीही ऐकल्या तरी मन भरणार नाही. त्यामुळे अजून एखादी कथा आपण जर सांगणार असाल तर मला ती ऐकायला नक्कीच आवडेल. "

लक्ष्मणाचे हे बोल ऐकल्यावर प्रभू श्रीराम पुढे सांगू लागले.

"हे लक्ष्मणा आपलेच पूर्वज महान राजा ईक्षवाक, ज्यांच्या नावाने हा वंश सुरु आहे, त्यांचा  बारावा  पुत्र ज्याचे नाव राजा निमी होते, ते अत्यंत पराक्रमी आणि धर्मनिष्ठ होते. याच राजा निमी यांनी महान तपस्वी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ , देवलोकासम , किंबहुना त्याहून अद्भुत अशी वैजयंत नावाची एक नगरी वसवली होती. ज्या मध्ये महापराक्रमी राजा निमी यांनी वास करण्यास सुरवात केली. तिथे राहात असताना राजा निमी यांच्या मनात विचार आला कि, माझ्या पिताश्रीना प्रसन्न करण्यासाठी मी एक असा यज्ञ करिन जो अनेक वर्षांपर्यंत चालेल.

असा विचार मनात येताच राजा निमी याने आपले पिताश्री अर्थात महाराजा मनू यांचे पुत्र महाराज इक्षवाकु यांना त्याविषयी विचारणा केली. महाराज इकश्वाकु यांनी सहर्ष त्यास अनुमती दिली.  पिताश्रींची अनुमती प्राप्त होताच, राजा  निमी यांनी सर्वप्रथम यज्ञासाठी कुलगुरू ब्रम्हर्षी वसिष्ठ यांना आमंत्रण पाठवले. हे लक्ष्मणा तदनंतर राजा निमी यांनी ऋषी अत्री , ऋषी अंगिरस आणि ऋषी तपोधन यांनाहि आमंत्रण दिले. या आमंत्रणावर ब्रम्हर्षी वसिष्ठ यांनी निमीला सांगितले कि,

"हे राजन तुझ्या आमंत्रणाआधी मला स्वर्गाधिपती इंद्र याचे आमंत्रण आले आहे आणि ते मी स्वीकारलं असल्यामुळे मला प्रथम तिकडे जाऊन इंद्रालोकीचा यज्ञ पूर्ण करावा लागेल. तो यज्ञ पूर्ण करून मी तुझ्या प्रासादी यज्ञ पार पाडण्यास येईन. "

एवढे बोलून ब्रम्हर्षी वसिष्ठ स्वर्ग लोकी इंद्रदेवाकडे यज्ञासाठी प्रस्थान करते झाले. ब्रम्हर्षी वसिष्ठ ऋषींच्या गमनानंतर गौतम ऋषींनी आपल्या अधिपत्याखाली यज्ञाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. राजा निमी याने  सर्व ऋषी आचार्य गण यांना  सोबत घेऊन हिमालयाजवळील  आपल्या नगराबाहेर एका पवित्र अश्या विस्तीर्ण स्थानी यज्ञास प्रारंभ केला. जवळ जवळ पाच हजार वर्षे पर्यंत यज्ञ करत होते. याच कालावधीत पाच हजार वर्षांनंतर इंद्राकडचा यज्ञ पूर्ण करून ब्रम्हर्षी वसिष्ठ पुन्हा राजा निमिकडे परत आले आणि  येऊन  पाहिलं तर गौतम ऋषींनी यज्ञ संपन्न केला होता.

हे पहिले मात्र, ब्रम्हापुत्र ब्रम्हर्षी वसिष्ठ कोपायमान झाले आणि राजा निमीची प्रतीक्षा करू लागले. दुर्दैवाने यज्ञ पूर्ण होत आलेला असल्यामुळे  राजा निमीला निद्रा येत असल्यामुळे राजा निमी निद्राधीन झाले. हे समजल्यावर क्रोधयुक्त ब्रम्हर्षी वशिष्टांनी राजा निमी याला शाप दिला कि तू माझ्या येण्याची प्रतीक्षा न पाहता यज्ञ पूर्ण केलास आणि आता मला न भेटताच तू निद्राधीन झालास, याकारणे मी तुला शाप देतो कि, तू शरीरहीन होशील अर्थात तू मृत्यू ला प्राप्त होशील."

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...