Skip to main content

कवडसा ३१


कवडसा ३१
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव ,
 तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा) 
 कहाणी एका संघर्षाची सुरु …३१

स्टाफ शीतल ला रूम मध्ये आणून सोडतो आणि आशाताई सर्व तयारी झाली याची खात्री करून मुलाला फोन करतात. इकडे शीतल थोडी उदास असते कारण आता योगेंद्रची भेट कधी होईल हे सांगता येत नव्हत. पणएक समाधान होत कि निदान त्याचा फोन नं  तरी मिळाला होता. 
याच विचारात ती असताना अचानक आईचा आवाज  तिच्या कानी पडतो.

आशाताई :  अग चल निघायचय लवकर, विचार कसला करतेस आता 
शीतल : (पटकन तन्द्रि भंग होऊन) अं अं .... हो मी तयारच आहे 
आशाताई : कसल्या विचारात होतीस. अग 3 वेळा हाक मारली मी . 
शीतल : काही नाही हे दोन  महीने कसे गेले त्याचाच विचार करत्ये.  
आशाताई : आता नको विचार करुस. आता पुढचा विचार कर
शीतल : आता आपण, ........  
आशाताई : आता तू आमच्या घरी येतेस. तिथे तू पूर्ण बरी होइ पर्यन्त राहाशील. मग तुझ्या घरी 
शीतल : अग पण......  
आशाताई तिच्याकड़े रागाने बघतात 
शीतल :(हसून) बर, (अस म्हणून कान धरते) 
आशाताई:  आता कशी शहाण्यासारखा बोललीस 
आशाताई परत एकदा पूर्ण तयारी झाली का हे चेक करतात. 

इकडे योगेंद्रच्या रूम मध्ये त्याच्याही जीवाची अशीच घालमेल चालू असते. कोणत्या तरी विचारात असलेल्या योगेंद्रला डॉ साठ्यांच्या आवाजाने अचानक जाग येते. 

डॉ : काय रे शीतलचाच विचार करतोयस ना.  
योगेंद्र आधी लाजतो मग : अहो काका नाही मी तर...  
डॉ :  अरे मी सहज म्हणालो आणि तूझ्या डोक्याने कूठला विचार करावा हे तू सुद्धा ठरवू शकत नाहीस अश्या मनस्थितित. ( अस म्हणून डॉ जोरात हसतात ) 
योगेंद्र त्यांच्या बोलण्याचा रोख लक्षात आल्याने आधी लाजतो नन्तर नजर स्थिर करून लगेच डॉ ना म्हणतो : डॉ मी  एकूणच 
सर्व 
घडामोडींचा विचार करत होतो 
डॉ : म्हणजे रे काय 
योगेंद्र : मी इकडे शीतल ला भेटायला येतो काय. माझा एक्सीडेंट होतो काय,  आणि खूप प्रयत्नानन्तर तिची भेट होते काय,  सर्वच amazing आहे.  
डॉ :  हो ते खर आहे. पण एकूण शीतलला भेटल्या नन्तर आता तूझ काय मत आहे.  
योगेंद्र : कोणत्या अर्थाने विचारता आहात तुम्ही ? 
डॉ : अर्थ वगैरे काही नाही रे जे वाटतंय ते बोल.  
योगेंद्र : मी actually तिला फक्त एका समारंभाबद्दल सांगायला आलो होतो आणि बाकी काही डोक्यात नव्हतं फक्त एवढंच माहीत होत की तीच जे झालय त्यातून आता ती सवरत्ये. इतर  काही हेतू  परहेतू न  ठेवता आलो होतो.  
डॉ : बर मग आता ?  
योगेंद्र : आता इतकंच की जाताना एक छान मैत्रीण मिळाल्याच् समाधान घेऊन जातोय.  
डॉ : वा तुझे विचार ऐकून खुप छान वाटल. 
योगेंद्र : काका तुम्ही काही भलत डोक्यात ठेवून आला नव्हतात ना? 
डॉ : नाही रे तुला judge करण्यासाठी तस बोललो. कारण जसा तुला ओळखतो लहानपणापासून तसच तिला सुद्धा खुप वर्ष ओळखतोय.  
योगेंद्र :  मग.. ? 
डॉ : दोघेही एकाच पातळीवर आहात. खूप चांगली मैत्री होईल तूमची. बर वाटल तूझे शुद्ध विचार ऐकून 
योगेंद्र : काका मुळात अश्या स्थितीत असलेल्या मूली बद्दल असा विचार करण हां  शूद्ध गाढवपणा आहे आणि तसा काही विचार करू शकणारा  टिपिकल माणूस नाही मी. 
डॉ : I know , i know.   जीवनाकड़े एका वेगळ्या नजरेने बघणारा माणूस आहेस. म्हणूनच म्हटलं कि , खूप छान फूलेल मैत्री होईल आणि एका इनोसेंट पातळीवर राहील  खात्री आहे मला.  
तेवढ्यात नर्स येते: डॉ त्या आशाताई बिलाच विचारत आहेत आणि निघायच पण.  
डॉ : ठीक आहे मी येतोच. ( योगेंद्र कड़े वळून),  चल रे येतो मी.  
योगेंद्र :sure भेटुया

                                                   क्रमशः 

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...