उगाच का रे सोडशी मुला तू हात हा मायेचा
मातृभूमीला वंदन करण्या शीर भेट देण्या
अनेक असतील आईला या लेकरे तरीही
मी जर ना केले इति तर मग करे न कोणीही
तुझे पाय तर सोडून जातो संकटात खुशीने
तुला पहाया अनेक असती दिधली देवाने
म्हणून आई जातो म्हणणे मला प्राप्त आहे
नसे नशिबी येतो म्हणणे हा खल मज नाही
उगाच केले नाही मी तर शीर हे अर्पणी
तुमचा दिस हा गोड कराया सोडली साजणी
पाठी माझ्या रडू नका मज अश्रू नाही प्रिय
माझी शेवट ठेवा तुम्ही एकवार सय
प्रसन्न आठवले
गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...
Comments
Post a Comment