Skip to main content

परिस प्रेम

 
परिस प्रेम 
 
एक कोपरा होता एके काळी
तिच्या साठी तिच्या साथी साठी
तिचा हात हातात घेऊन जाव दूर
 क्षितिजा पर्यन्त लांब तिथे
जिथे फक्त वाट असेल प्रेमाची
आणि फक्त शपथ तुला साथ देण्याची
जिथे फक्त तुझे उडणारे केस असतील
 अलगद तुझा हात हातात असेल आणि मग
तुझा हळूवार नाजुक आवाज असेल
  त्या आवाजात तू एक प्रेम गीत म्हणशील
  मी एखादी कविता एकवीन
तू नंतर म्हणशील की का रे
 अशीच साथ देशील ना रे मला
कायम उद्या कदाचित हे रूप रंग
 काही नसेल पण हां हात असाच असेल ना रे
मी म्हणेन अग वेडे तुझ्यारूपा पेक्षा तुझ्या वर प्रेम करतो मी
कस सोडेन तुला आणि तुझ्या हाताला
  अगदी दांत नसतील तुझ्या बोळक्यात तरी मी
 तुझ्या जवळ असेन असाच कायम
पण शंका का घेतलिस ग
अरे सहज पण तू पास होणारच हे माहीत होत रे राजा
म्हणून आणि म्हणून विचारल मी
  आणि मग असमंत भारावालेला असेल
 फक्त प्रेमाने आपल्याला  अलगद उचलून घेईल
हां प्रवाह प्रेमाचा दोघाना आयुष्य भर
 किती काळ गेला असेल दोघाना पण कळणार नाही
 आणि कदाचित काळ पण थांबला असेल बघत
दोघाना आणि नोंदवत असेल प्रीतीची एक अनमोल कहाणी
 दोघांच्या प्रेमाची एक सुंदर कथा
जी फक्त तु मी  आणि हां काळ यानाच माहीत असेल
 या गडद वातावारणात नसेल काही
शंका पाप काळजी किंवा कोणतीही नकारात्मक गोष्ट
  पण त्या साठी हवी फक्त तू तुझी साथ विश्वास प्रेम सर्व
 असेल ना
अरे असेल का काय राजा आहेच
आणि असणारच रे आपण
हो असेल ग राणी अगदी आपण असू किंवा  नसु सुद्धा या जगात
 अरे का अस बोलतोस  तू
जा मी बोलणार नाही तुझ्याशी
  अग तस नाही ग प्रिये पण विश्व सत्य आहे ते
  ए प्रिया परत महण ना  तुला आवडल तर कायम  म्हणीन प्रिया
  माझी प्रिया
तो तिचा हात अलगद हातात् धरतो आणि छाती जवळ नेतो
धक् धक् येते का ऐकू
ती आधी  लाजते
नंतर हो म्हणते
काय आवाज येतोय
ती म्हणते लाजुन फक्त माझ नाव ऐकू येतय
तो फक्त उत्तरा दाखल हसतो
ती शांत पणे त्याला विचारते की हे अस किती दिवस भेटायच
तो म्हणतो मी तर युगानु युग तैयार आहेती त्याला एक फटका मारते
खर खर सांग
तो  म्हणतो लग्न करे पर्यन्त
ती घाबरुंन म्हणते
कोणाच
तो हसतो जोरातती परत एक फटका देतेतो म्हणतो सॉरी गआपल
मग दोघे थोड़ा वेळ शांत बसतातछान वारा सुटलेला असतोकुठून तरी मन्द सुगंध येत असतोआणि दूर वर किशोर आशाच गाण लागलेल असतये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल  हवाया धुंद गाण्यावर त्या दोघांची मन तशीच धुंद होऊंन नाचत असतात
आणि साक्षिला  असतो काळ
तो फक थांबलाय
त्या धुंदी आणाणाऱ्या वातावरणात हरवून गेलेल्या दोन प्रेमी मनांचा साक्षीदारफक्त ते त्तिघेच
दोन हरवलेले आणि एक साक्षीदार तटस्थ
दोन व्रतस्थ एक तटस्थ
 
 

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...