Skip to main content

लढत


लढत

तू राहा खंबीर जग घाव घालेल वर्मी
उफाळून येतील पूर वासनेच्या बैलांचे ।।
तुझ्या पाठीशी लागतील ढूशी  देवून
कळप लाज सोडलेल्या सापांचे ।।
खूप होतील प्रयत्न दबाव आणून
तुझे मत परिवर्तन करण्याचे ।।
तू राहा ठाम कायम चट्टाणासारखी
बळ तुला अतूट लढण्याचे ।।
घेतील जरी पिशाच्चे घास तुझ्या
साऱ्या पुण्याईच्या अनुरूपाचे ।।
पूरुन उरशील त्याना तुझे आहे
जिगर जिगरबाज लढवय्याचे ।।
कोणी नसेंल  यात पण मी असेंन
तुझ्या पाठी उभा खात्री बाळग ।।
उड़ेल धूळ  धूक्याची जेंव्हा
  असेल एक सावली खात्री  बाळग।।

कवी : प्रसन्न आठवले

Comments