Skip to main content

कवडसा - 24




कवडसा 

(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , 
तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  

कहाणी एका संघर्षाची सुरु …२४


शीतल : चला डॉक्टर आई येईल त्याच्या आत जाऊया 

योगेंद्र : या वयात पण आईला घाबरतेस. 

शीतल : प्रश्न घाबरण्याचा नाहीये योग पण तिला माहित होण्याचा आहे 

योगेंद्र : ओह ओके . आणि शोर्ट फॉर्म छान आहे 

शीतल : कसला 

योगेंद्र : माझ्या नावाचा 

शीतल : मी कधी म्हटल 

योगेंद्र : आता म्हणालीस ना योग बोलतांना . डॉक्टर आहेत विटनेस 

शीतल : ओह ते अचानक निघाल, पण छान असेल तर ठीकच. 

डॉक्टर : चला आधी शीतल ला नेतो 

डॉक्टर नर्सला बोलावतात आणि शीतलला तिच्या रूम मध्ये शिफ्ट 

करतात आणि त्यानंतर लगेचच आशाताई येतात. शीतल बराच वेळ 

विचार करत असते. नक्की काय बर चालल असेल तिच्या मनात. बघुया 

प्रयत्न करून डोकावण्याचा . तिची भेटी आधीची मनस्थिती अशी होती 


एक अनामिक ओढ़ जाणवे 
खेचून काही नेते मज का 
का वाटे ही हुरहुर नुसती 
नसता माझ्या मनात शंका


का व्हावी  ही भेट वाटले 
का वाटे हा मोद भेटुनी 
असे अचानक का व्हावे
 भासे काही गेले निसटूनी 

उरात होते का ही धडधड 
का होई हा श्वास जलदही   
का पाउल हे पडते अडते 
का भासे हे फिरते जगतही

पुन्हा कधी का होईल हेही 
नच जाणवले कधी कसेही 
मृदुल मनाची जाणीव नव्हती 
कि हे रम्य जणू  स्वप्न असेही  

विसरून गेले जाणीव सगळी 
वाटे आता काही न उरले 
फक्त एक काळोखी मिणमिण 
बाकी सारे स्वप्नी सरले 

का रे मजला ओढ जाणवे 
तुझा मनाच्या कडे कपारी 
का हे आहे असेच स्पंदन 
आहे का मी उगा बावरी 

निशा भासते गेली संपून 
उरे उगवती उषा जणू हि 
रंग बदलले दिशा दिशातील 
 जणू मनातील संपून  तीमिरही 

तिच्या मनाची अशी अवस्था आधीची तर भेटी नंतर तिची मनस्थिती काहीशी अशी होती 


तुझ्या भेटीची का आस मजला कळेना
ही उर्मी कशाचि मला हे कळेना
मी आनंदी का आज मजला कळेना
तू येशिल हा ध्यास का हे कळेना


हे काहुर का आज मनी या उधाले
तुझी भेट व्हावी हां विश्वास होता
तूला पाहुनी आज मज काय झाले 
तुझ्या पावलांचा मला ध्यास होता


किती काळ गेला की वर्षे ही झाली
तुझ्या भेटीची भूक का जागली रे
तू कोणी नसुनी ही का अर्तता रे
तुझी याद स्वप्नात का वाहिलि रे


ग्रीष्मात धरणी जशी तापलेली 
तशी मी आतुर नव्हते कधीही
तू यावे असे वाटले का कळेना
मनाला तुझी आस नव्हती कधीही


मी का आज माझी न राहे कळेना
तू यावे हे का आज मजला कळेना 
तुझ्या जागण्याची मला काय इच्छा
मी का धावते काय होते कळेना


तुझी भेट झाली मनाला उभारी
तुला पाहिले मना धुंदी आली
तू  भेटूनी  जाशी तरीही 
पुन्हा भेटीची आस ही जागलेली
पुन्हा भेटीची आस ही जागलेली

क्रमशः 



Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...