भोग आणि ईश्वर ३९८
काल पाहिलं त्याप्रमाणे, सूर व पितर या दोघांना, त्यांच्या आवश्यकतेनुसार, त्यांच्या ऊर्जा व शक्तीचा पुरवठा, मानव करतो. आता याचा अजून खोलात जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं की,यासाठी मानवी देहात आवश्यक equipments instruments अर्थात इंद्रिय व अवयव व्यवस्था विधात्याने मानवाला जन्मतः दिली आहे. बरं ही व्यवस्था पुढे पुढे सुरू राहावी, म्हणजेच एका स्वयंचलित व्यवस्थेतूनच दुसरी स्वयंचलित व्यवस्था निर्माण होईल, हे सुद्धा पाहिलं आहे.
म्हणजे एकदा या भूतलावर आल्यावर, कोणत्याही जीवाला, हा देह योग्य त्या कार्यासाठी वापरण्याचं विज्ञान देहातच आहे. Signal receiving व transmitting system आतच आहे. ती सक्षम करण्यासाठी बुद्धी मन आणि आत्मा यांचा संयोग साधणं जरुरी आहे. त्यातूनच ही सिस्टिम activate होऊन, आपण केलेल्या शुद्ध सात्विक कर्माचे सिग्नल्स वरील व्यवस्थेपर्यंत पोचू शकतील.
म्हणून सर्व साधन, ध्यान, धारणा योगयाग, नामस्मरण इत्यादीचं ज्ञान मानवापर्यंत पोचवण्याची व्यवस्था ईश्वर अनेक मार्गांनी करतो.ज्याला ईश्वरीय ज्ञान वा अध्यात्मिक ज्ञान म्हटलं गेलं. म्हणजे देहाचा वापर करून, आतील चैतन्यशक्तीला, तिच्या निर्मात्याशी जोडून द्यायचं. म्हणजे हा देहरुप संगणक परम संगणकाला जोडून द्यायचा. त्यांनंतर या संगणकात, परम संगणकातून येणाऱ्या सर्व आज्ञावली कार्यरत होतील.
अशी व्यवस्था कार्यरत असलेले संगणक म्हणजेच ईश्वरीय कृपा प्राप्त झालेल्यानां आपण ऋषीमुनी, ज्ञानी, मुमुक्षु, संत महंत या विशेषणांनी संबोधतो. त्यांनी आपली चित्तशुद्धी करून, या देहातील आत्म्याला,परम आत्म्याशी जोडून, त्या आज्ञेनुसार जीवनकार्य केलं. हे त्यांचं जीवन कार्य बहुतांच्या गरजेचं आणि लाभासाठी होतं आणि ईश्वराची तशी इच्छा होती.
म्हणजेच या देहाच्या माध्यमातून, आत्मतत्वाला परमात्मतत्वाला जोडल्यास अनेक कार्य सिद्ध होऊ शकतात. पण याची प्रक्रिया जी अनेक युगांपासून अनेक मार्गांनी कार्यरत आहे, त्यातील ईश्वरस्मरण सोडून अर्थात नामभक्ती सोडून, बाकी सर्व मार्ग या काळासाठी निरुपयोगी आहेत. याचं खूप महत्वाचं कारण हे आता लक्षात येईल, ते म्हणजे, इतर अनेक मार्गांना यशस्वी करण्यासाठी व त्याचा लाभ घेण्याइतका कार्यकालावधी या युगात अशक्य आहे.
कारण आधीच्या इतर युगांप्रमाणे या युगात, आत्म्याच्या एका देहातील कालावधीची मर्यादा अत्यंत कमी आहे. त्यामुळे एकाच देहात राहून, अष्टांग योग वा तपसाधना करण्याइतका वेळ, देहाकडे पण नाही आणि आत्मा ते प्राप्त करू शकणार नाही. कारण तोपर्यंत देह संपलेला असेल.
याचं पुढील चिंतन उद्याच्या भागात करूया, पण ईश्वर स्मरण करत राहूनच.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment