भोग आणि ईश्वर ४००
या सर्वच ज्ञानाचा, परमार्थाचा, साधनेचा आणि श्रीमद्भ गवद्गीता यासारख्या अनेक ग्रंथांचा व शास्त्रं पुराणं यांचा उद्देश, मनाचा ओढा देहाच्या उपभोगातून बाहेर काढून, तो ओढा आत वळवून, आत्मचिंतनाच्या माध्यमातून, सद्सद्विवेक जागा करून, चित्तशुद्धी व आत्मशुद्धी जागृत करणं हा आहे. एकदा उद्देश समजला आणि मार्ग व साधन निश्चित झालं की, मार्गक्रमण सुलभ व्हायला हरकत नसावी.
पण कलियुगातील सद्यस्थिती व अजूनच बिकट होत जाणारी परिस्थिती, लक्षात घेता. कोणत्याही अति श्रमाच्या साधनाचा उपयोग होणार नाही आणि धर्ममार्गी जन यापासून परावृत्त होऊ शकतात. हीच शक्यता जाणून, भगवंतांनी स्वमुखाने उपदेश करताना, ज्ञानमार्ग अर्थात सांख्यमार्ग, कर्ममार्ग हे सांगून, सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणून सांगितलेला भक्तिमार्ग अर्थात ईश्वर स्मरण हे सांगून, सर्वात शेवटी काहीही न जमल्यास, कर्तव्य करत असताना, फक्त मला शरण ये व तुझे मनातील सर्व विकल्प, चिंता, यांना माझ्या चरणी, अर्पण करून,मजपाशी ये, हा सल्ला दिला.
म्हणजे इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब न करता, फक्त मला शरण ये आणि माझं स्मरण कर. पण हे करताना कर्माच्या फलातील आस वा वासना सोडून दे. म्हणजे कर्म तर कर पण त्यामध्ये गुंतवलेलं तुझं मन, कर्म पूर्ण होताच काढून घे आणि पुढील कर्मात रत हो. यामध्ये तुला माझ्या नामाचं स्मरण सहाय्यकारी ठरेल, असा अप्रत्यक्ष सल्ला, स्वतः प्रभूंनी भक्त अर्जुन याच्या माध्यमातून संपूर्ण जगताला दिला आहे.
या, सर्वात सोप्प्या उपायाने, कलियुगात माणसाने, ईश्वराला सतत स्मरून, आपल्याला कर्मफलाच्या बंधनातून मुक्त केलं पाहिजे. खरतर कर्मापेक्षा त्या कर्माच्या फलात अडकलेली माणसाची आसक्ती, माणसाला कर्माच्या बंधनात बांधते. म्हणजे मन एखाद्या कर्मात म्हणजेच आपण करत असलेल्या कृतीत, अडकतच. पण त्याच्या परिणामात जास्त गुंतून, फलाची अभिलाषा मनात कर्माचा बंध निर्माण करते.
त्याचा परिणाम म्हणून, मनात फलाच्या अभिलाषेने ओढ निर्माण होऊन, त्या लहरी, अंतराळात फिरत राहतात. कर्म करत असताना,बत्या कर्मात मन गुंतलं असेल तर, त्याच्या परिणामाने इच्छाशक्ती कार्यरत होऊन, कर्मावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो.पण कर्म संपल्यावर सुद्धा, त्यात उरलेली आसक्ती, मनाला पुढे जाण्यापासून अडवते, बांध घालते.
मन हे प्रवाही असेल तरच, मानवी जीवन प्रगती करू शकते. म्हणजेच मनाच्या प्रवाही असण्याचा खूप सकारात्मक परिणाम, माणसावर होतो. घडलेल्या कर्मात अडकलेलं मन, जीवाला मागे नेऊ शकते. म्हणजेच त्याचा परिणाम, पुढील कर्मांवर होऊ शकतो. साधं उदाहरण पाहिलं तर, एका परीक्षेत मिळालेल्या कमी मार्कांनी, मन खट्टू होऊन, पुढील परीक्षेच्या तयारीवर, त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, त्याचप्रमाणे.
यावर अजूनही चिंतन आवश्यक आहे. पण नामाच्या साधनेने आपण अनेक गोष्टी साधू शकतो.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment