Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३२

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३२ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    हिच्याशी सोयरीक केल्यास लोक मला नावं ठेवतील , माझं तोंडदेखील बघणार नाहीत, असा विचार तर त्याने केला नसेल ना , कदाचित मी पत्र लिहिलं तेच चुकलं की काय, की त्या पत्रात मी शतजन्म तुझीच आहे असं न घाबरता मागणं केलं, त्यामुळे तर कृष्ण येण्याचा मानस बदलून दुसरा विचार करता झाला नसेल ना , की शिवादी देव तुझे चरणरज घेण्यास उत्सुक असतात असं लिहून मला तिकडे येण्यास सांगते आहे, पण स्वतः आळसाने काही कृती न करता तिथे बसून अश्व दौडते , असाही विचार केला असेल का,  लिहिण्यासाठी हिला मीच सापडलो आणि मला काय कमी साधक आहेत का कुणा कुणाला मी स्वये जाऊन साहाय्य करू शकेन, खरच भीमकी वेडी आहे असाही विचार करू शकेल तो ,  कदाचित असंही झालं असेल की, द्विजास कृष्णमोह होऊन, त्याने तिथेच राहण्याचा निश्चय केला असेल कारण कृष्णरुप आहेच मनमोहक म्हणूनच नावही आहे मनमोहन , त्याकडे जो जो गेला तो परतून कधीच नाही आला, कारण ते...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३१

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३१ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   शिशुपालाचे वऱ्हाड हे गावाबाहेर एक विस्तीर्ण नगरी वसवून, त्यात ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे राहण्याची उत्तम व्यवस्था रायाने केली होती. मुळात जी कन्या श्रीकृष्णाला देण्याचा मूळ विचार होता , तो बदलून शिशुपालाला देण्याचा निर्णय झाल्यामुळे, श्रीकृष्णाचे विरोधक हे एकाएकी आनंदीत होऊन मोठया उत्साहाने या कार्यात आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते. त्यांचा हर्षोल्हास हा अवर्णनीय होता. यांमध्ये प्रामुख्याने , शाल्व , जरासंध, वक्रदंत, विदूरक, पौंड्रक आदी वीर आपापल्या सैन्यासह आपलं सामर्थ्य व त्यायोगे शिशुपालाच्या पाठीशी कितीजण आहेत व आमचं एकूण सैन्यबल किती आहे याचंही शक्तीप्रदर्शन करण्यास आले होते. यामध्ये अनेक हत्ती, अश्वदल, पायदल आणि अगणित सैनिक सहभागी होते.  यथावकाश सर्व वऱ्हाड कौंडिण्यपुरच्या वेशीपर्यंत येऊन ठेपले आणि राया भीमकाला तसा संदेश गेला.  त्याप्रमाणे भीमक वऱ्हाडाला सामोरा गेला. प्रथा...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३०

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३० llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   श्रीकृष्णाने कौंडिण्यपूरनगरात प्रवेश केला. द्वारकेचा राणा, ज्याने अद्वितीय द्वारका वसवली , तोदेखील अचंबित झाला , या नगरीचं वैभव , सुबत्ता , संपन्नता आणि थाट पाहून. या राज्याचा राजा भीमक हा स्वतः श्रीकृष्णाला कन्या देण्याच्या मताचा होता, तरीही रुक्मि या आपल्या पुत्राच्या भिन्न पण अतिरेकी मत आणि दुराग्रह यापुढे असा हतबल होता जसा , मोहापुढे विवेक हतबल होतो  अथवा मायेपुढे धैर्य.  भीमकाने , मनात असूनही , पुत्राच्या दुराग्रहापुढे आपला निर्णय बदलून कन्या शिशुपालाला देण्याची संमती दिली. रायाने मनात विचार केला की जर भीमकीच्या भाग्यात योग असेल तर श्रीरंग स्वये येऊन तिला वरून घेऊन जाईल. अन्यथा जे होईल ते तिच्या भाग्याने. यापेक्षा अन्य काहीही , एक सार्वभौम राजा असूनही , भीमक करू शकत नव्हता.  श्रीकृष्ण नगरीची शोभा बघण्यात दंग होते. नगरात प्रत्येक घरात तोरणं , पताका लावून , रंगरंगोटी करून, प्र...

श्रीरुक्मिणीस्वयंवर २९

श्रीरुक्मिणी स्वयंवर २९ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   विश्वपालकाने निश्चय केला, रुक्मिणीला वरून घेऊन येण्याचा. मी स्वतः रणात उतरलो आणि शक्ती पणास लावली तर समस्त जगतास अविजेय आहे. त्यामुळे मी स्वतः एकटा जाऊन रुक्मिणीस , तिचा बंधू रुक्मि , चैद्यराज शिशुपाल आणि मगध नरेश जरासंध यांना परास्त करून आणि येणाऱ्या सर्व अडचणींना उलथवून रुक्मिणीस एका हाती घेऊन ये येण्यास समर्थ आहे.  रुक्मिणीच्या मनाविरुद्ध रुक्मिने आरंभलेल्या या विवाहात हस्तक्षेप करीन. माझा कोप झाल्यास मी श्रीपती हे नाव सार्थ करतो हे त्रिभुवन जाणते. जसे दोन काष्ठ घर्षण करून अग्नी प्रकट करता येतो, तसा मी रणी अग्निसम तळपुन शिशुपालादिक सर्वांचा निःपात करीन आणि पवित्र रुक्मिणीस , त्या अपवित्र हातात पडण्यापासून वाचवीन. तस्मात त्वरेने निघावे , हेच उत्तम. द्विजाला सिद्ध होण्यास सांगून आपण शयनगृहा बाहेर पडून सिद्ध होण्यास पातला. स्वतः महालाबाहेर जाऊन दारूक नावाच्या आपल्या विश्वासू सारथ्याला त्वर...

श्रीरुक्मिणीस्वयंवर २८

श्रीरुक्मिणी स्वयंवर २८ ( चतुर्थ प्रसंग समाप्त)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    काळा धाड तीज त्वरे हा संदेश  वरण्यास तिला येतोय द्वारकेश रुक्मिणीच्या पत्रिकेतील भावार्थ हा इतका खोलवर गेला होता की श्रीकृष्ण , प्रत्यक्ष द्वारकाधीश , सुदबुध हरवून बसले होते. शयनमंचकावर पहुडले तर होते, परंतु कुशी बदलून बघत होते, उठून बसत होते, मंचकावरून खाली उतरून येरझाऱ्या घालत होते. पुन्हा निजत होते. मोठी विचित्र भावावस्था झाली होती यदुवीरांची.  न बैसवे कोठे, न निजावे वाटे अवघे विश्व रुक्मिणीप्रेम दाटे तरंग उठले जे  वायूने  ते ते श्रीहरीच्या प्रेमाने वायूही सांगे आनंदाने पोचवा रे ते रुक्मिणीप्रत सारे अवघे विश्व रुक्मिणीप्रेम दाटे निजली अवनी अन आकाश निजले विश्व अन रवीप्रकाश निजले द्विजवरही सावकाश श्रीहरीसी का न जमे  निजणे  अवघे विश्व रुक्मिणीप्रेम दाटे वाहे चिंता विश्वाची जरी कैसी स्थिती प्रेमे भीतरी भक्त हृदयी असून श्रीहरी श्री...

श्रीरुक्मिणीस्वयंवर २७

श्रीरुक्मिणी स्वयंवर २७ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    हे जनार्दना ही पत्रिका वाचताच यातील माझ्या आर्जवा प्रमाणे तू त्वरित येणे करावेस, हा माझा जीवाचा कळवळा आहे, नव्हे अंतःकरणापासून घातलेली साद आहे. या माझ्या प्रार्थनेनुसार तू मला तारण्यास्तव येणार नसलास तर निदान मला मृत्यु देण्यास तरी यावेस. कारण तुझीच प्रतिमा मनात , तुझेच चिंतन हृदयात आणि तुझ्याच प्राप्तीची इच्छा आकांक्षा आत्म्यात असताना, मी तुझ्याव्यतिरिक्त दुसरे काहीही स्वीकारू शकत नाही.  असे अर्थहीन जगणे आणि निर्जीव देह वृथा पृथ्वीवर जीवित ठेवून मी काय करू? , अजून भूभार वाढवू?, ते अशक्य आहे. अश्या या शुष्क जगण्याला काहीही अर्थ नाही. किंबहुना तुझ्याच हातून मृत्यू आल्यास निदान परलोक तरी सुखात जाईल. परंतु तुझ्याशिवायचे जगणे आता क्षणमात्रही नको आहे यादवराया.  या पत्रिकेतील माझ्या आर्जवाचा विचार आहे, त्यानुसार न घडल्यास वा तू न घडवल्यास या देहाला अजून व्रतवैकल्ये , उपासतापास  य...

चारोळ्या 26 12 पर्यंत

चारोळ्या  देवासाठी फुले आणिली सजवून थाळी ती मांडली पूजा देवाची मी रेखीली  अनन्य भावे देवास अर्पिली 🙏🙏🙏 रंग गुलाबी नाजूक साजूक फुल एकटे मिरवे छान वाऱ्याने हलतात पाकळ्या डौलाने ते मिळवे मान पीत रंग अन फुले कितीक गुच्छ जणू निसर्गाने केला भास होतसे त्यात हळदीच्या रंगांला उधळून दिधला पक्ष्यांचा उडता थवा बघा  क्षितीजाच्या माळावर फिरतो चालला असा की जग चाले चालते रहा जगा सांगतो तबकात पूजेची फुले घेऊनी निघती ललना देवपूजेला  नमस्कार तो करुनि अर्पिती सहा शत्रू अर्पिती देवाला नाजूक साजूक शुभ्र फुल हे हिरव्या शाली मध्ये सजले देवाची ही करणी अनमोल सान फुलांना सुंदर केले छोट्या या फुलांनी घेतले लक्ष वेधून मना भावली इतकी वाटते घ्यावी वेचून लाल सानुल्या फुला रे आयुष्याचा अर्थ असे तू शक्तीचा हा स्रोत रंग रे  नाजूकतेचा साज असे तू सुवासिक अन सुंदर चाफा नागचंपा अन सोनचाफा अनेक रंगी अनेक छटांचा साज लेऊन नटतो चाफा एक अनोखे फुल हे झिपऱ्या पसरून हासते सदा रहा आनंदी तुम्ही सर्वांना हेच सांगते उरी असे अभिमान जयाचा ऐसी विमाने पाहून आले  वाघाची छाती जयांची अश्या वीरा नमुनी आले शौर्यप...

तकरार और प्यार

तक़रार और प्यार मेरी यादों को चाय में डुबोके, मीठी करदी चाय तूने, कुछ इस तरह, जैसे चीनी मिलाई हो अक्सर, मेरी बातोंको याद करके खानाभी बनाती हो तुम, फिर वो और भी मीठा हो जाता है, और फिर कहती हो के, अक्सर तुम मेरे स्वाद को बिगाड़ रहे हो, भला इसमें मेरी क्या गलती है कहती हो तुम्हारी यादे, अब मुझमे बसती है, भला ये भी कोई तरीका है शिकायत का कह देती मेरी यादोंको तुम मत आना, मत सताना, बारबार मुझे आकर खैर ये क्या कम है, जो कहती हो के नींद भी नही आती पूछा जो हमने क्या वजह है इसकी , कहती हो, तुम तो ख्वाबों में भी सताते हो आकर, अब ये तो हद हो गई शिकायत की भला दिलभी तुंम्हारा और दिमागभी हम कहांसे आये इनमे, जान मेरी तब तुमने शरमाकर, नजरे झुकाकर , एक हलकिसी मुस्कान से कहा वो तो अब कहाँ रहा हमारा, उसमे तो तुम आकर बसे हो,  मेरे पास तो दिल है तुम्हारा ©® शायर :  प्रसन्न आठवले ०७/१०/२०१७

श्रीरुक्मिणीस्वयंवर २६

श्रीरुक्मिणी स्वयंवर २६ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    परंतु याचाही उपाय मी योजलाय तो तू ध्यानपूर्वक ऐक. हे यादवराया , भीमक रायाच्या म्हणजेच आमच्या घराण्यात ही एक परंपरा वा रीत आहे ज्याप्रमाणे , नववधूला साज शुंगार झाल्यानंतर , विवाहविधीपूर्व , नगराच्या बाहेर असलेल्या , ग्रामदेवतेच्या , अर्थात अंबामातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येणे अनिवार्य आहे.  याच प्रथेनुसार मीही नववधूरुपात सजल्यानंतर नगराबाहेरील मातेच्या मंदिरात जाईन. हीच संधी साधून तू मला तेथून पळवून ने. हा योग साधण्यासाठी , तू योग्य वेळी आधी पासूनच त्या स्थानाजवळ कोणासही कळणार नाही अश्या रीतीने उपस्थित रहा. मी नववधूच्या पारंपरिक साजशृंगारात असल्यामुळे तुला ओळखणे शक्य होईल. अर्थातच मयूरपुच्छमुकुटधारी कमलनयन त्रिभुवनसुंदर तुला ओळखणे मला फार कठीण नसेलच. यात एक महत्वाची गोष्ट की हे सर्व प्रातःसमयी होणार असल्यामुळे तुला योग्य ती काळजी घ्यायला फार त्रास होईल असं वाटत  नाही.  ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर २५

श्रीरुक्मिणी स्वयंवर २५ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    तू हासुद्धा विचार करशील की, हे कसले लग्न यात विधी नाही, मानपान नाही, अंतरपाट नाही, मंगलाष्टके नाहीत, सप्तपदी नाही. ज्यात काहीही धार्मिक सोहळा नाही , सरळ मुलगी उचलून घेऊन यायचे, हा कसला लग्नसोहळा हे कसलं कार्य, ही कसली रीत. बरं एवढं सगळं करून सुद्धा जनात काय सन्मान राहील अर्थात हे लौकिकास साजेसे नाही.  ह्या सर्वात मानपान तर नाहीतच उलट युद्ध प्रसंग ओढवून घेऊन आहेर म्हणून दोन्हीकडून एकमेकांना बाणाची भेट चढवतील, बाणांचेच हार घालतील आणि बाणांचाच मानपान करतील. काय अर्थ या सर्वाला आणि काय मिळणार इतकं सर्व करून. असाही विचार तुझ्या मनाला शिवू शकेल. तर त्याविषयीचे विधिविधान, जनरीती व पद्धती काय हे ही मी जाणून आहे. तुझा विचार असेल की असे विधींशिवाय झालेले विनाविधी लग्न काय संमत असेल का. तर ऐक. शास्त्र व जनरीतीनुसार पिशाच्च , गांधर्व ,  असुरी हे काही विवाहप्रकार प्रचलित आहेतच. राजे महाराजे ...

पुरुषांनी घ्यायची काळजी

घरात वावरताना वा काम करताना पुरुषांनी घ्यावयाची काळजी.!!! 😀😀😃😃😂 घरात वावरताना पुरुषांनी घ्यावयाची काळजी, मशीनगनच्या रेंजमध्ये न येण्याकरिता.  या सर्व गोष्टी गृहमंत्री (घरातले अमित शाह) निजले आहेत आणि तुम्ही काही शोधाशोध वा काम करत  आहात हे गृहीत धरून लिहिलेलं असलं तरीही गृहमंत्रीजागे असतानासुद्धा हीच काळजी घेतल्यास नुकसान ( शारीरिक व मानसिक) कमी होऊ शकते. पण गॅरंटी नाही.  (हा लेखातील गोष्टी ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर कराव्या)  १. एखादी मोठी वस्तू , जसं मोठा डब्बा, मिक्सरच भांड वगैरे, विशेषतः काही खाण्याचे पदार्थ शोधताना, डब्ब्याचं झाकण , त्या शेजारचा डब्बा वा रॅकवरील इतर वस्तू, यातलं काहीही खाली पडणार नाही याची काळजी घ्यावी. पडलीच तर  हातातील वस्तू सोडून पडणारी वस्तू धरायला जाऊ नये. अन्यथा होणाऱ्या नुकसानीला लेखक जबाबदार नाही.  २. सर्वात काळजी सकाळी चहा बनवत असाल (रविवारी, कारण आपल्याला एरवीपेक्षा जास्त लवकर चहा प्यायची तल्लफयेते  म्हणजेच किडा जागा होतो) , तर घ्यावी लागते. कोणत्याही छोट्यातल्या छोट्या वस्तूचा आवाज होता उपयोगी नाही. याबाबत कोण...

श्रीरुक्मिणीस्वयंवर २४

श्रीरुक्मिणी स्वयंवर २४ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   त्याच प्रमाणे तुझ्या यादव सेनेतील , दैत्यांच्या मर्दनात व दैत्यांशी युद्ध व द्वंद्व करण्यात, जे निपुण आहेत , असे निवडक योद्धे पुढे घालून वा त्यांना संगे घेऊन तू पूर्ण तयारीनिशीच विदर्भाकडे निघावेस.  हे श्रीकृष्णां , समस्त जगत तुला आणि तुझ्या या रूपा तील, देहातील आणि स्वरूपातील अस्तित्वाला जाणत असल्या कारणाने, तुला या दिशेने येताना सर्व जण ओळ्खतीलच, परंतु तुझ्या शिशुपालादिक शत्रूंचे गुप्तचर हे देखील तुला पाहून, तशी चाहूल आपापल्या राजांना देतील. या कारणे तू गुप्तरुपघेऊन  व गुप्तवेषे येथे प्रकटावेस हा  माझा तुला संदेश आहे.  हे यदुनाथा , तू म्हणशील की मी प्रत्यक्ष श्रीकृष्णाला शिकवते आहे, माझ्या बुद्धीने वागण्यास सांगते आहे. मी हे पूर्ण जाणून आहे की, तू अनादी , अनंत, जगतव्यापक आणि श्रेष्ठ बुद्धी आहेस.परंतु माझ्या हृदयातील श्रीकृष्णाप्रति माझ्या आराध्याप्रति माझं प्रेम, माझी प्री...

श्रीरुक्मिणीस्वयंवर २३

श्रीरुक्मिणी स्वयंवर २३ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   पुरतेष्टदत्तनियमव्रतदेवविप्रगुरर्वर्चनादिभिरलं   भगवान  परेश: ll आराधितो यदि गदाग्रज एत्य पणिं गुह्णातु मे न दमघोषसुतादयोsन्ये ll ४ ll   हे श्रीयदुनाथ , जर मी काही भगवंताचे भजन पूजा अर्चा आदी केले असेल, द्विजवर आणि विप्रवर पूजन इत्यादी माझ्या हातून घडले असेल, तर नक्कीच आपण मला स्वीकारालं. अनेक धार्मिक कार्य जस यज्ञयाग आदी , गोदान भूदान , रत्नादी धनाचं दान इत्यादी अनेक प्रकारची दान आणि या सर्वांहून श्रेष्ठ अन्नदान जर मी केलं असेल, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठतम एकादशीचं व्रत हे मी उपासतापास आणि जागरण करून द्वादशीला ब्राम्हण भोजन घालून यथासांग केलं असेल तर आणि  इतकं सर्व धर्मकार्य जर तुजप्रत पोहोचलं असेल तर , हे गदाधारी बलरामाच्या कनिष्ठ भ्राता, तू नक्कीच येऊन माझा स्वीकार करून मला जन्मभरासाठी तुझ्या हृदयी स्थान देशील.  वैखरी , मध्यमा , पश्यंती आणि परा या चारही वाणींनी त...

श्रीरुक्मिणीस्वयंवर २२

श्रीरुक्मिणी स्वयंवर २२ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll    समस्त अवनीवरती तुझ्या सौन्दर्याने मोहित अगणित असतील ज्यांना देखील तुझी प्राप्ती अशक्य असेल, तिथे माझे काय होईल ही कल्पनादेखील करता येत नाही, अशी माझ्या मनाची अवस्था आहे.  हे नरवीरपंचानना प्राप्त काळी तुझ्यासारख्या वराला कोणती वधू वरणार नाही. हे मनमोहन श्रीकृष्णां तू म्हणशील मी ना तुला जाणतो ना तुझा सोयरा आहे. त्यातून मी काळासावळा सुद्धा आहे. मला तू विवाहाला बोलावत आहेस की काय. इतका मोठा विवाहसोहळा जमविला आहे. यास्तव मी यावे असेतर तू आमंत्रण देत नाहीस ना अशी शंका तुजप्रत आली आहे का?.  अशी कोणतीही शंका घेऊ नकोस. मला आजच्या घडीला शिशुपाल, ज्याच्याशी बळजोरीने विवाहित करण्यात येत आहे, तोच,  काळासम भासत आहे. त्याच्याशी विवाह हा सर्वस्वी माझ्या इच्छेविरुद्ध आहे हे प्रथमतः जाणून घे. त्यामुळे अधिक विलंब व विचार न करता तू यावेस आणि मला वरून घेऊन जावेस हीच माझी इच्छा आहे. माझी वा माझ्या , तुला वरण्याच्या इच्छेची, उपेक्षा न करत...

श्रीरुक्मिणीस्वयंवर २१

श्रीरुक्मिणी स्वयंवर २१  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll    त्या मयुररंगी पत्रिकेत लिहिलेला प्रत्येक शब्द फक्त आणि फक्त प्रेमभाव प्रकटत होता. डोळ्यात प्राण आणून या क्षणांची प्रतीक्षा करत असलेल्या प्रियकरासम  अस्वस्थ यदुनाथ, चर्येवर भावविहिन दाखवण्याचा यत्न करत होते, तरी अंतर्यामी भावविभोर झाले होते. उत्सुकता आणि प्रेमपूर्वक, श्रीमाधवानी पत्रिका उलगडून सात श्लोकाच्या त्या पत्रिकेतील श्लोकरूपी प्रेमसंदेश व त्या संदेशामागील भाव  वाचण्यास व जाणण्यास   आरंभ केला.                          ll श्रीरुक्मण्युवाच ll श्रुत्वा गुणान् भुवनसुंदर श्रुण्वंता ते निर्विश्य कर्णविवरर्हरतोsड्ःपांगम् ll रूपं दृशां दृष्टीमतामखिलार्थलाभं त्वय्यच्चुताविशती चित्तमपत्रपं मे ll  ओम नमोजी यदुनाथा. माझ्या मनःस्थितीचे वर्णन कवण प्रकारे करावे हे मला उमजत नाही. हे निर्विकारा तूच एक माझा आधार दिसतोस. तुला प्रेमभक्तीपूर्वक हे माझ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर २० (त्रितीय प्रसंग समाप्त )

श्रीरुक्मिणी स्वयंवर २० (त्रितीय प्रसंग समाप्ती)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   श्रीकृष्णाचे हे मधुर वाणीतील वचनबोल ऐकून द्विजवर अति संतोष पावला. हर्षाने त्याचा गळा दाटून आला. कंठातून स्वर बाहेर पडेना, इतुके अश्रू त्याच्या लोचनातून ओघळू लागले. पण कार्य महत्वाचं आणि शीघ्र आहे हे जाणून , आपले अश्रू आपल्या उपरण्याला पुसत श्रीकृष्णास वदला. " हे प्रभू आपल्या वाणीने मी संतोषलो आहे.  विदेह अर्थात विदर्भ देशाचे राजे भीमक हे अत्यंत नितीवान, गुणवान व पुण्यवान आहेत. प्रत्यक्ष प्रजपतीसमान कर्तव्यदक्ष, बृहस्पतीसमान ओज, तेज व बुद्धिमत्ता आणि शतसुर्याला देखील लाजवेल अशी प्रभा. त्यांच्या गुणांचे वर्णन करण्यास शब्द कमी आहेत. वैराग्य आणि विवेक यांचा अनोखा संगम, भागवतधर्माच्या कार्यात सदैव तत्पर आणि सात्विकतेची मुर्ती , असे राजा ज्या भूमीवर राज्य करत आहेत त्या भूमीतून मी आलो आहे.  हे श्रीकृष्ण , त्यांची कन्या , जी पांचा बंधूंच्या पाठीवर जन्माला आलेली,  प्रत्यक्ष श्रीमहालक्ष्मीसम तेज आणि स...

श्रीरुक्मिणीस्वयंवर १९

श्रीरुक्मिणी स्वयंवर १९ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll    त्या द्विजवराला स्नानापश्चात पितांबर नेसवून प्रभूंनी स्वये द्विजासाठी मोगऱ्याची फुलं आणि कळ्या यांच्या आच्छादनाने शयन तयार करून दिले. त्यावर ब्राम्हणदेवतेस निजावयास सांगितले. भगवंताच्या इच्छेनुसार द्विजवर शय्येवर निजता जाहला आणि श्रीकृष्णांनी स्वये त्याचे चरण चुरण्यास सुरवात केली. या प्रकाराने द्विजवर लज्जित होऊन आपल्या शय्येवर उठून बसता झाला आणि त्याने भगवंताला हात जोडून विनवले " हे प्रभू आपण आमच्या हृदयस्थानी विराजित आहात. आपली दिगंत कीर्ती ऐकून एकमात्र वेळा आपले दर्शन घडण्याचा योग यावा ही इच्छा मनात होतीच. परंतु आपण ती पुरवून माझ्या पूर्वपुण्याईला शतोगुणीत केलेत. माझे अवघे जीवन पुण्याईने भरून व भारून टाकलेत. आपले ब्रीद मी ऐकून आहे की आपण भक्तांना आपल्या हृदयमंदिरी स्थापित करता आणि सदैव भक्त तिथेच वास्तव्यात असतात.   मग आता आपण माझे चरण चुरून मला या पापाचा धनी का बरं करत आहात. मी या लायक नाही भगवंता. आपण सर्व प्राण्यात...

श्रीरुक्मिणीस्वयंवर २० (प्रसंग तिसरा समाप्त)

श्रीरुक्मिणी स्वयंवर २० (त्रितीय प्रसंग समाप्ती)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   श्रीकृष्णाचे हे मधुर वाणीतील वचनबोल ऐकून द्विजवर अति संतोष पावला. हर्षाने त्याचा गळा दाटून आला. कंठातून स्वर बाहेर पडेना, इतुके अश्रू त्याच्या लोचनातून ओघळू लागले. पण कार्य महत्वाचं आणि शीघ्र आहे हे जाणून , आपले अश्रू आपल्या उपरण्याला पुसत श्रीकृष्णास वदला. " हे प्रभू आपल्या वाणीने मी संतोषलो आहे.  विदेह अर्थात विदर्भ देशाचे राजे भीमक हे अत्यंत नितीवान, गुणवान व पुण्यवान आहेत. प्रत्यक्ष प्रजपतीसमान कर्तव्यदक्ष, बृहस्पतीसमान ओज, तेज व बुद्धिमत्ता आणि शतसुर्याला देखील लाजवेल अशी प्रभा. त्यांच्या गुणांचे वर्णन करण्यास शब्द कमी आहेत. वैराग्य आणि विवेक यांचा अनोखा संगम, भागवतधर्माच्या कार्यात सदैव तत्पर आणि सात्विकतेची मुर्ती , असे राजा ज्या भूमीवर राज्य करत आहेत त्या भूमीतून मी आलो आहे.  हे श्रीकृष्ण , त्यांची कन्या , जी पांचा बंधूंच्या पाठीवर जन्माला आलेली,  प्रत्यक्ष श्रीमहालक्ष्मीसम तेज आणि स...

ll विघ्न-भयनाशक श्रीवेंकटेश स्तोत्र ll

ll विघ्न-भयनाशक श्रीवेंकटेश स्तोत्र ll  जयजयाजी वेंकटेशा पारलौकिका सर्वेशा आदीदेव तू सिध्दीदायका भक्तप्रतिपालका तुझिया कृपे मेरू हाले कृपे तव मुक्ती गजेन्द्रा हृदयात तू ज्या धारियले त्याची पार लागे नौका तूच ईश्वर भुतांचा तूच निर्माता कळीकाळाचा तुझिया साक्षी ब्रम्हादीक रचिले सृष्टीस सकला तू स्वये संकल्पे क्षणात मनोवेगे सिद्ध सर्वार्था तूच जगन्नाथ तूच मक्षिक तूच कीटक आत्मरूपा तुझिया श्वासे सारे घडेल उच्श्वासात अंत जाणा तुझिया नामे भयभीत कंपित होती असुर सारा तूच मात्र मनी येता होय सिद्ध सदैव भक्त रक्षणा तुझी कृपा जयावर त्याचा पार ध्वज वैकुंठाला कर्मे करती नित्य सारे सकळ कृपार्था प्राणनाथा आद्य नित्य अंती सत्य जग संपले तरी तू उरता होसी प्रकाश निर्मुनी सूर्य, सोम निर्मिला तू निशेला  अगणित तारे असंख्य प्राणी कित्येकाचा तू निर्माता अत्री वसिष्ठ नारद शारद किन्नर गंधर्व त्रैलोका अष्टवसु द्वादश सूर्य सुरवर निर्मिसी तरी त्रयस्था चौऱ्यांशी लक्ष जीवांच्या हृदयामाजी वास करता तूच जगनियंता सर्वभूता तूच कारण जगाच्या अंता तुझी स्तुती काय करणे शारदा देवीचा तू  निर्माता  तूच होऊनी बुद्ध...

ll श्रीमहाविष्णुस्तुती ll

🌷🌷🚩ll श्रीमहाविष्णूस्तुती ll 🚩🌷🌷 मकरंद जया रंध्रात पूर्ण, त्या कमळांचा तुज हार पुष्पे, परिमळ दिव्य जयांचा, वाहियली चरणांवर कल्पनातीत शक्ती अजोड ती गदा, एका हाती एका नादाने विश्व हादरे तो पांचजन्य दुज हाती रिपू खंड खंड उध्वस्त होय, ते सुदर्शन त्रिज हाती त्या कमलनयन श्रीलक्ष्मीसम कमलपुष्प तव हाती अशी चतुर्भुजा ही मूर्त साजिरी  तेज नेत्री अलोट गंधर्व सर्व गाती भूपाळी प्रतिदिनी होऊनी भाट सूर लक्ष लक्ष वाहती पखाली तव नामाच्या  देवा क्षीरसागरात करी वास तरी जगत तुझ्या निजभावा नभी कोटी कोटी तारका प्रकाशित तुझेच वाहती तेज रवी चंद्र, जयाने दिवस रात्र, ते दिपतील पाहून ओज अजानुबाहु मूर्त तुझी अन वर्ण निळसर नभ हे  प्रतिबिंबित सारे संकल्पात प्रकटले क्षणात जग हे मुख चंद्र तुझा पाहण्यास आतुर भक्त उभा हा द्वारी सावली तुझ्या कृपेची असुदे प्रसन्न साधक हा वारी ©® कवी : प्रसन्न आठवले १४/१२/२०१९ १०:०९

श्रीरुक्मिणीस्वयंवर १

ll श्रीगणेशाय नमः ll मार्गशीर्ष मासानिमित्त नवीन लेखमालेला सुरवात करतोय. विषय खूप महान लोकांनी हाताळलेला आहे. पद्यात मांडणी झाली आहे अनेकदा झाली पण गद्यात मांडणी माझ्या वाचनात आली नाही. म्हणून सद्गुरुकृपेने हा प्रयत्न करत आहे. चुकभुल क्षमस्व. ____________________________________________ श्रीरुक्मिणी स्वयंवर १  llश्रीगणेशाय नमःll      llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी रुक्मिणी नमोनमः ll जनार्दन स्वामी शिष्य, संतश्रेष्ठ  श्री एकनाथ महाराज यांनी पुण्यकृपेने ज्या अमूल्य ग्रंथाची निर्मित केली, ती सुद्धा प्रत्यक्ष श्रीयोगेश्वराच्या  आज्ञेवरून, त्या अद्भुत अश्या विषयाची ओढ एक लेखक व कवी म्हणून लागली नसती तरच नवल वाटलं असतं. अश्या चिरतरुण विषयावर लिहायला खर तर गुरूआज्ञा असावी लागते. पण आपल्या बुद्धीला मिळालेली सदवर्तनाची प्रेरणा हीच गुरूआज्ञा मानून आणि या कार्यात ते प्रत्यक्ष श्रीकृष्ण रुपात पाठीशी आहेतच , हे मनात योजून या विषयावर माझ्या अल्पमतीने लिहायला सुरुवात करतोय. मुळात हा विषय इतका मनोवेधक आणि चित्ताकर्षक आहे की माझ्यातील कलाकार या विषयावर ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर २

श्रीरुक्मिणी स्वयंवर २ llश्रीगणेशाय नमःll      llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll द्वारकेत मदनराव शर्मा नावाचे एक विप्रवर भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाचा लाभ व्हावा या हेतूने प्रेरित होऊन तपश्चर्येला बसले होते. एक तप पूर्ण होऊन गेल. एके दिवशी माता रुक्मिणी प्रत्यक्ष मदनराव शर्मा यांच्या स्वप्नात जाऊन , त्यांना दृष्टांत देती झाली. रुक्मिणीमातेने त्यांना सांगितलं, की आपण ज्या श्रीकृष्ण भगवंत यांच्या दर्शनाप्रित्यर्थ तप करीत आहात, ते स्वतः याकाळी द्वारकेत नाहीत.," मदनराव मातेला म्हणाले "माते ते द्वारकेत नाहीत, मग कोठे आहेत ते. कारण त्यांच्या दर्शनाची आस धरून व तोच संकल्प मनी दृढ करून मी आज एक तप झालं, तपश्चर्या करत आहे. आता आपणच माझी माय होऊन मला मार्गदर्शन करावे." इतकं बोलून मदनरावानी रुक्मिणी मातेच्या चरणांवर लोळण घातलं आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. श्रीकृष्ण विरहाचं दुःख अजून किती काळ भोगाव लागणार , या विचाराने , त्यांना अकल्पित दुःख  झालं. अर्थातच मातेने त्यांना हाताला धरून उठवलं आणि रुक्मिणी माता म्हणाली " या समयी भगवान श्रीकृ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३ llश्रीगणेशाय नमःll      llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll  कित्येक दिवसांच्या यात्रेनंतर विप्रवर पैठणच्या पवित्र भूमीत पोहोचले. अर्थातच नाथांचं घर सापडायला अजिबात अवकाश लागला नाही. नाथांच्या घरी नित्य अतिथी येणं जाणं असल्यामुळे, २,४ माणसं सहज खपून जात.  नाथानी आपल्या परंपरेनुसार विप्रवरांची पाद्यपूजा करून त्यांना स्नानादी आन्हिके उरकून त्वरेने भोजनास येण्यास विनंती केली. नाथानी सांगितल्या नुसार मदनराव सर्व नित्य कर्मे उरकून भोजनासाठी आले खरे, पण आल्यापासून त्यांचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं. नाथानी त्यांना विनंती केली की, आपल्या साठी संपूर्ण पंगत खोळंबली आहे. तेंव्हा आपण त्वरित भोजन सुरू करा, जेणेकरून इतर अतिथी आणि समस्त गृह भोजन सुरू करेल. पण विप्रानी नाथांना भलताच आग्रह धरून आश्चर्यात पाडलं होतं. आचार्य म्हणाले " यजमान आपल्याकडे श्रीखंड्या नामे असलेल्या व्यक्तीची आम्हास भेट घडवून द्या त्यानंतरच आम्ही भोजनास प्रारंभ करू" यावर नाथमहाराज म्हणाले " विप्रवर आपण आधी भोजन करून घ्या, आधीच भोजनाची वेळ टळून चालल...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४ llश्रीगणेशाय नमःll      llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll  विप्रवर मदनराव शर्माआणि नाथमहाराज दोघेही साश्रु अवस्थेत आहेत. समस्त अतिथीवृंद आणि घरातील मंडळी जमा झालीत. विप्रवर सांगत आहेत. " मी मूळ महाराष्ट्र प्रांतातील, वऱ्हाड मधील ब्राम्हण आहे. भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाची आस मला द्वारकेत घेऊन गेली. तिथे काही काळ राहिल्यानंतर मी श्रीकृष्ण दर्शनासाठी अंतःप्रेरणेने बारा वर्षे उग्र तपःसाधना केली. बारा वर्षे सरली आणि काही काळापूर्वी माता रुक्मिणी यांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि आज्ञा केली की, भगवंत श्रीखंड्याच्या रुपात, श्रीएकनाथ महाराजांकडे, एक तप लोटलं वास्तव्य करून आहेत. तू त्यांच्याकडे जा तुला श्रेकृष्णांच दर्शन होईल." हे ऐकलं मात्र नाथानी टाहो फोडला. अक्षरशः हंबरडा फोडला आणि नाथमहाराज लहान मुलाप्रमाणे रडू लागले. हे पाहून प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर नेत्रातील अश्रूंनी पूर काढला. नाथांना विप्रवर म्हणाले " पण आपण का दुःखी होताय. आपण तर माता रुक्मिणीहून भाग्यवंत आहात. एक तप भगवन्त आपल्या गृही पाणक्याचं काम कर...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५ llश्रीगणेशाय नमःll      llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll आता नाथाना देखील काळजी वाटू लागली आणि त्यांनी निष्ठापूर्वक भगवंताचा धावा सुरू केला आणि काही क्षणात जगतपालक, महाविष्णुअवतारी, शंख चक्र गदाधारी पद्म पितांबर परिधान केलेले साक्षात भगवान श्रीकृष्ण  प्रत्यक्ष नाथांच्या समोर गृहात प्रकट झाले. नाथानी आणि विप्रवरानी प्रभूंच्या चरणांवर लोटांगण घातलं. भगवंतानी त्यांचे अश्रू पुसत दोघांनाही आपल्या जवळ घेतलं. अशक्यातलं शक्य होऊन समोर दृश्यमान स्वरूपात घडत होतं. त्यावेळी नाथांच्या घरी उपस्थित असलेल्या लोकांच भाग्य थोर, ज्यांना प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन नाथांमुळे याची देही याची डोळा घडलं. भगवंतांना पाहून नाथ म्हणाले "भगवंत आपण आमच्या घरी चाकरी केलीत आणि या पापाचे मला भागीदार केलेत. " भगवन्त म्हणाले " एकनाथ महाराज आपणच आम्हास  आपल्या चाकरीचा लाभ फार काळ लाभू दिला नाहीत. या गोष्टीची कायम स्वरूपी खंत मात्र राहील आम्हास." नाथ आणि विप्रवर हात जोडून  म्हणाले " भगवंता पण आपल्याला श्रीखंड्याच्या रुपात बघण्याची इच्छ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६ llश्रीगणेशाय नमःll      llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll  संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज यांच्या श्रीरुक्मिणी स्वयंवराच्या लिखाणाची गोडी, शब्दरचना, शब्दमाधुर्य, मांडणी, हे जणू कमळफुलातील मधुरस प्रत्यक्ष भ्रमराच्या रुपात नाथानी आपल्या हातावर द्यावा आणि तो मधुरस विरघळता विरघळत नाही आणि त्याची गोडीदेखील कमी होत नाही असा आहे.  जितका आस्वाद घेत जावा तितकी गोडी अजून अवीट होत जावी.  नाथांच्या भारुडादी प्रकारात अध्यात्म ज्ञान देता देता नाथ, आसूड देखील ओढतात. पण श्रीरुक्मिणी स्वयंवरात त्याच नाथांच्या परिसस्पर्शी भाषेला केशरयुक्त ज्ञानामृत परिमळ मिश्रित, श्रद्धेचा स्वाद आहे आणि त्याचा आस्वाद घेणं ही अध्यात्म सुखाची परमावधीच आहे. म्हणजे शरदाच्या रुपेरी चांदण्यात चंद्राच्या शीतल प्रकाशात आटीव शर्करायुक्त क्षीर म्हणजे दूध पिण्यासारखं आहे.  नाथांचं अंतिम उद्देश्य हे अध्यात्मिक ज्ञान प्रसारित करणं. त्याला भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी यांच्या कथेचा किनारा म्हणजे फुलपाखराच्या पंखानी जग पाहणं.  बोध तो सुद्धा श्री...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७ llश्रीगणेशाय नमःll     llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   विद्येचे , वाङ्मयाचे , शब्दांचे , बुद्धीचे दैवत श्रीगजानन आणि देवी श्रीशारदा यांना सादर वंदन. परमपावन, मंगलमय, जगतकारण, जगतपालक आणि मनातील अधिष्ठाता भगवान श्रीकृष्ण यांना प्रणिपात. माझे सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी माझ्या अल्पमतीतुन हे कार्य करवून घेण्याचे योजिले आहे, त्यांनाही साष्टांग दंडवत.  हे तिन्ही लोकांतील देव ऋषी, गुरूवर आपण स्वये येऊन माझ्या लेखणीत अध्यात्मिक रसनिष्पत्ती करावी. त्यायोगे श्रोते व वाचक यांचे नेत्र व कर्ण तृप्तीप्रत न्यावेत. पण त्यातील तृप्तता पुढील वाचनाची अतृप्ती वा अभिलाषा जागृत करेल हे सुद्धा योजावे, ही नम्र प्रार्थना. ज्यायोगे आपले अस्तित्व आणि  या कथेतील आपलाही सहभाग, कथेच्या संपूर्ण यात्रेत, निश्चित राहील आणि वाचकांना यातील शब्द, अर्थ, गहनार्थ, काव्यात नाथांनी मांडलेली अद्भुतता, रसाळता यांचे यथार्थ दर्शन या गद्य प्रवासात  प्राप्त होईल.  हे काव्य वाचताना नाथांचा ए...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८ llश्रीगणेशाय नमःll     llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   अर्थातच जशी कनकासवे कांती आणि सुर्यासवे त्याची दीप्ती ही येतेच. तद्वत श्रीकृष्णांसमवेत त्यांची शक्ती अर्थात कृष्णशक्ती, देवी महालक्ष्मी भूलोकी प्रकटली. हे परीक्षित राजा, भूलोकी असलेल्या श्रद्धावान, विवेकी, अनुभवसंपन्न नितीवान व गुणवान असूनही निगर्वी राजांमध्ये राजा भीमकाची गणना त्याकाळी होत असे. त्याची भार्या अर्थात राणी श्रद्धा ही देखील शुद्धमती होती. दोघेही, राजा भीमक व राणी श्रद्धा, हे  सात्विक , सत्शील आणि सुजाण होते.  राणी गर्भ धरिती जाहली. याच गर्भात कृष्णशक्ती अर्थात देवी रुक्मिणी उदरात प्रकट झाली. यथावकाश नऊ मास नऊ दिवस पूर्ण होताच एका रूपवान ओजयुक्त कन्येने राजाच्या गृही जन्म घेतला. हीच ती कृष्णाची चितशक्ती. पाच भावाच्या पाठीवर जन्मलेली कन्यका असल्यामुळे राजाची सर्वात लाडकी झाली. पाचही भावांपेक्षा अधिक स्नेह राजा भीमकीला करू लागला. पाचही भावांइतकंच , नव्हे तर काकणभर जास्त विद्या राजा रुक्मिणीला शिकवू लागला....

श्रीरुक्मिणीस्वयंवर ९

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   त्या अंगुळीची शोभा पाहण्यास व त्या चरणांचे रस अर्थात पियुष सेवन करण्यास स्वये चंद्र लुब्ध होऊन उभा ठाकला आहे. वक्राकार सुडौल बाक असलेल्या पोटऱ्या ज्याला आहेत असे सुंदर पाय त्या कृष्णाच्या निळ्या सावळ्या तनूला लाभलेले आहेत. अस्तमानाला चाललेल्या रवीराजाच्या सूर्यकिरणांच्या पीतकेशरी रंगाला लाजवेल असा रंग असलेला पितांबर त्याने परिधान केलेलं आहे.  त्या कृष्णाच्या चरणातील दागिन्याचा मान प्राप्त झालेली वाकी, आपली शोभा अवकाशा पर्यंत पोचवत आहेत. तीचे सौंदर्य आणि शोभा या पुढे वेदऋचा देखील उण्या भासत आहेत. प्रत्यक्ष वेदसुद्धा शांतपणे त्या साजातून येणारा कृष्णनामाचा गजर ऐकण्यात दंग आहेत. त्याच्या पायातील नुपूरे सोहंभावाचे नाद त्रिखंडात पोचवत आहेत. त्या नादाने आणि त्याच्या ध्वनीने, ज्ञानाने एकाग्र होऊन समत्वाकडे पोहोचलेले, मुमुक्षु देखील मोहित झाले आहेत. त्यामुळे त्यांचंही ध्यान या आवाजाकडे आकृष्ट झाले आहे.  पायातील तोडर आपल्या फक्त नादाने,...