श्रीरुक्मिणी स्वयंवर ३२ llश्रीगणेशाय नमःll llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll llश्रीएकनाथ महाराज कि जय ll हिच्याशी सोयरीक केल्यास लोक मला नावं ठेवतील , माझं तोंडदेखील बघणार नाहीत, असा विचार तर त्याने केला नसेल ना , कदाचित मी पत्र लिहिलं तेच चुकलं की काय, की त्या पत्रात मी शतजन्म तुझीच आहे असं न घाबरता मागणं केलं, त्यामुळे तर कृष्ण येण्याचा मानस बदलून दुसरा विचार करता झाला नसेल ना , की शिवादी देव तुझे चरणरज घेण्यास उत्सुक असतात असं लिहून मला तिकडे येण्यास सांगते आहे, पण स्वतः आळसाने काही कृती न करता तिथे बसून अश्व दौडते , असाही विचार केला असेल का, लिहिण्यासाठी हिला मीच सापडलो आणि मला काय कमी साधक आहेत का कुणा कुणाला मी स्वये जाऊन साहाय्य करू शकेन, खरच भीमकी वेडी आहे असाही विचार करू शकेल तो , कदाचित असंही झालं असेल की, द्विजास कृष्णमोह होऊन, त्याने तिथेच राहण्याचा निश्चय केला असेल कारण कृष्णरुप आहेच मनमोहक म्हणूनच नावही आहे मनमोहन , त्याकडे जो जो गेला तो परतून कधीच नाही आला, कारण ते...