नाम अवतार कलियुगी - ९
गेल्या भागात आपण दोन परिणाम आणि त्यांची कारण- संगति यांची सांगड़ घालता येते हे पाहिल. पण यापुढे काही फल अशी असतात ज्यामधे फल वा परिणाम आणि त्यामागे असलेला कार्यकारण भाव अथवा त्याला कारणीभूत कर्म यांची सांगड घालण मुश्किल वा अशक्य असत,आणि इथेच
खरी मेख आहे.
कारणं माहित नसल्यामुळे मानव प्राणी अति विचारी, योग्य दिशा माहित नसल्यामुळे वा जगाच्या मायेच्या पदद्यामुळे असेल आणि आधीच्या दोन उदाहरणावरुन असेल,पण जे समोर दिसत त्यावरून कार्यकारण भाव यांची संगति लावण्याची सवय जडलेली असते, म्हणून असेल, पण ज्या परिणामाची संगति जुळत नाही वा लावता येत नाही त्यावर विश्वास ठेवत नाही अथवा नशिब या गोष्टिवर विश्वास ठेवत नाही.
पण जिथे फायदा वा सकारात्मक परिणाम दिसतो तिथे या गोष्टीचा उपयोग करून नशिब , प्रारब्ध, या पेक्षा कर्म श्रेष्ठ मानतो. परंतु जिथे गोष्ट वा परिणाम नकारात्मक अथवा मनाविरुद्ध वा दुःखदायीं आणि क्लेशकारक असेल तेथे माणूस हे कस माझ्याच बाबत घडल या प्रश्नात गुंतून पडतो आणि खरा प्रश्न इथेच निर्माण होतो. कारण घड़लेली कोणतीही गोष्ट वा हाती आलेल कोणतेही फल हे कर्माचेच फलरूप आहे. जिथे आपल्याला संगति लावता येते तिथे आणि जिथे संगति लावता येत नाही तिथेसुद्धा. कारण गणितीय नियमात असलेली कर्मफल गति अपवाद करुच शकत नाही. गणित हे पूर्ण सिद्ध झालेल आणि नियमाबाहेर कधीही न जाणारं शास्त्र आहे.
एक उदाहरण घेऊन हा प्रश्न बघुया
तुमच शुभ कर्म हे सकारात्मक वा गणितातील अधिक चिन्ह आहे आणि अशुभ वा चुकीचे कर्म हे वजा चिन्ह आहे. गणितातील सोप्पा नियम अधिक चिन्हाकित संख्या जास्त असेल तर उत्तर अधिकच येणार याउलट वजा चिन्हाकित संख्या जास्त असेल तर अर्थातच उत्तर उणे वा वजा चिन्हाकितच असेल. इतकं सोप्प शास्त्र आहे, संख्याशास्त्र नियमावर आधारित कर्मफल सिद्धांताच.
त्यांमुळे जर आपण समस्याग्रस्त आहोत अथवा आयुष्याचा कठीण काळ चालू आहे त्याअर्थी आपण आपल्याच कर्माच्या वजा उत्तरात आहोत किंवा थोडक्यात निगेटिव काळात आहोत. आणि हे गणित सोड़वण्यासाठी फक्त कर्मफल गणित सुधारण गरजेच आहे. या व्यतिरिक्त सर्व शक्यता या पळवाटा आहेत, हे नककी.
आता यांच्या पुढे काय, कस हे चक्र बदलायच, काय करणं अपेक्षित आहे ते बघुया पुढील भागात
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१०/१०/२०१७
Comments
Post a Comment