नाम अवतार कलियुगी - १४
मुख्यतः जीव हा या पृथ्वीतलावर म्हणजेच भूलोकि आल्यानन्तर , जडतत्वाचा अर्थात गुरुत्व शक्तिचा प्रभाव असेल पण, अनन्तातुन आल्याचा त्याला विसर पडतो. बुद्धि , मन, आसक्ति, इच्छा, आकांक्षा यांच्या खेळात अड़कून विचारांची दिशा हरवून बसतो. प्रत्येक गोष्टीत या विश्वात समोर घडणाऱ्या म्हणजेच फक्त भौतिक वस्तु, गोष्टी, परिणाम यावरच भरवसा, विश्वास व श्रद्धा ठेवतो. सर्व गोष्टी समोर दिसतील त्या व तश्याच योग्य, बरोबर व बिनचुक मानतो. पण खुपवेळा जे समोर दिसत तस असतच अस नाही. त्या मागची कारण मीमांसा करत बसत नाही.
काही काही गोष्टी, घटना व त्यांची संगति तर्काने करावी लागते. तर योग्य दिशेने विचार जातात आणि मार्ग सापडतो. उदाहरण म्हणजे गुन्हा तपासताना पोलिस सर्व शक्यता गृहीत धरतात खूपवेळा काहीही गृहीत न धरता तपास करतात, आणि मार्ग मिळतो. पण जड़बुद्धिचा प्रभाव मानवाला तस करू देत नाही. त्यांमुळे मार्ग भरकटतो आणि पुन्हा जन्म मृत्यु चक्र सुरु, आणि इच्छित स्थळापासून जीव वा आत्मा अनेक जन्म दूर जातो.
भूतलावर वा भौतिक जगात आत्मा परम आत्म्यापासून विलग होऊन येतो तेंव्हा त्याच अंतिम ध्येय पुन्हा परम् आत्म्यात विलीन होऊन मोक्षाप्रत जाणे हाच असतो. मग वाटेत तो मार्ग चुकतो भरकटतो. त्याला इच्छित मार्गावर येण्यासाठी खुप मेहनत, इच्छाशक्ति, प्रचंड आत्मिक ऊर्जा व चेतना यांची जोड़ लागते, साधने बरोबर.
म्हणजे इच्छित स्थळी पोचण्याचा मार्ग खड़तर आहे असच वाटतंय. मुळात का, कुठे, कस, जायच हेच माहित नसल्यामुळे आणि मायेचा प्रभाव असल्यामुळे जीव फक्त जन्मतो, जगतो आणि वेळ झाली की या जगातून नाहीसा होतो. पुढे काय मागे काय हे दिसत, समजत व कळत नसल्यामुळे फक्त जीवन साखळीत स्वतःला जखडून टाकतो
हे सर्व भेदण्याचा मार्ग म्हणजेच इच्छिले ते साधण्यासाठी योजावे लागणारे उपाय म्हणजेच साधन ज्याला साधना म्हटल जात, ती करण जरूरी असत. जे विधात्याने इच्छिले आणि जड़जीवास उमगले ते साधण्याचा मार्ग म्हणजे साधना.
साधना म्हणजे काय हे अजून खोलात शिरून तिच्या गाभ्या पर्यन्त पोचण्याचा यत्न पुढील भाग्यात करूया
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१५/१०/२०१७
Comments
Post a Comment